Get Mystery Box with random crypto!

आंतरराष्ट्रीय चलन निधी :- (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड | MPSC Economics

आंतरराष्ट्रीय चलन निधी :-

(इंटरनॅशनल मॉनेटरी फंड. आय्. एम्. एफ्.). ही आंतरराष्ट्रीय चलन-विनिमय-दरांत स्थैर्य आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संलग्न संस्था आहे. आंतरराष्ट्रीय चलन निधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक ह्या दोहोंची स्थापना करण्याच्या करारावर जुलै १९४४ मध्ये न्यू हँपशरमधील ब्रेटन वूड्स परिषदेत सह्या झाल्या. निधीचे कार्यालय वॉशिंग्टन येथे आहे. मार्च १९४७ पासून निधीच्या प्रत्यक्ष कार्यास प्रारंभ झाला.