Get Mystery Box with random crypto!

उत्पादन संघटना उत्पादन संघटना :- नैसर्गिक साधनसामग्रीव | MPSC Economics

उत्पादन संघटना

उत्पादन संघटना :-
नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य वस्तूंचे किंवा त्यांच्या निर्मितीस उपयुक्त अशा मालाचे उत्पादन, ही आधुनिक अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे; कारण सर्व आर्थिक व्यवहारांचे अंतिम उद्दिष्ट- ग्राहकांच्या गरजा भागविणे-कितपत साध्य होऊ शकेल, हे उत्पादनावरच अवलंबून असते. आवश्यक ते उत्पादक घटक इष्ट प्रमाणात वापरून ग्राहकांच्या गरजा भागविणाऱ्या वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती उत्पादनसंस्था करीत असतात. त्या अनेक प्रकारच्या असतात; काही लहान, काही मध्यम तर काही प्रचंड प्रमाणावर उत्पादन करतात. प्रत्येक संस्थेमध्ये अनेक व्यक्ती एकत्र येऊन काम करीत असल्यामुळे अशा संस्थांना संघटनेची गरज असते. प्रत्येक उत्पादनसंस्थेस आपली उद्दिष्टे कमीतकमी वेळ व पैसा खर्च करून साधणारी उत्पादन संघटना निर्माण करून ती कार्यवाहीत आणावी लागते.