Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 142

2021-07-31 07:26:08 https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
139 views04:26
ओपन / कमेंट
2021-07-31 07:26:08 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

३१ जुलै इ.स.१६५७
छत्रपती शिवरायांनी "दंडाराजपुरी" स्वराज्यात दाखल केले.
आदिलशहाच्या कारकिर्दीत नागोठाण्यापासून सावित्री नदी पर्यंतचा मुलुखाची सत्ता जंजिरा किल्ल्याच्या सिद्दीकडे होती. त्यांचे मुख्य ठाणे होते दंडा राजपुरी.सन १६१८ मध्ये सिद्दी सुरुलखान हा जंजिऱ्याचा पहिला हबशी सुभेदार होता.इसवीसन १६४२ मध्ये जंजिऱ्याचा सुभेदार सिद्दी अंबर मृत्यू पावल्यावर १६५५ पर्यंत सिद्दी युसूफ जंजिऱ्याचा सुभेदार होता.त्यानंतर सिद्दी फतहखान अधिकारावर आला. जंजिऱ्याच्या प्रदेशात पक्के पाय रोवलेले सिद्दी हे धर्मान्ध व अत्यंत क्रूर होते.दुबळ्या कोकणी प्रजेवर अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली होती. जावळी पाठोपाठ उत्तर कोकण शिवाजी महाराजांनी जिंकल्यावर स्वराज्याची सीमा सिद्दीच्या मुलखाला जाऊन भिडली होती. प्रजेला जाचक ठरणाऱ्या या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी १६५७ च्या ऐन पावसाळ्यात महाराजांनी सिद्दीवर मोहीम काढायचे ठरवले. या मोहिमेसाठी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांची नेमणूक केली.त्यानुसार ५ ते ७ हजार सैन्यासह ते दंडा राजपुरीवर चालून गेले.रघुनाथपंतांनी दंडा राजपुरीवर हल्ला केला व जिंकून घेतले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

३१ जुलै इ.स.१६८३
(श्रावण वद्य ३, नृतीया, शके १६०५, रुधिरोद्वारी संवत्सर, वार मंगळवार)

सुरतकर इंग्रजांचे मुंबईकर इंग्रजांना पत्र !
सुरतकर इंग्रजांचे मुंबईकर इंग्रजांना लिहीलेले एक पत्र उपलब्ध असून त्यात, छत्रपती संभाजी महाराज स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंग्यांशी बिघाड केला. रेवदंडा यासी वेढा घातला. या आशयाचे हे पत्र असून या सुमारास छत्रपती संभाजी महाराज स्वतः युद्ध नेतृत्व करत असल्याचे निदर्शनास येते.



३१ जुलै इ.स.१८५७
१८५७ च्या प्रथम स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राचा सहभाग
कोल्हापूर:इथल्या २७ व्या नेटिव-देशी पायदळ तुकडीतील २०० सैनिकांनी ३१ जुलै १८५७ ला उठाव करून इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले करून तिघा अधिकाऱ्यांना ठार मारले.नंतर स्थानिक जनता पण ह्या उठावात सामील झाली.ह्या उठावाचे नेते कोल्हापूर महाराजांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे होते.



३१ जुलै इ.स.१९४०
क्रांतिकारी उधमसिंग बलिदान दिन
लंडनमधल्या कोर्टात खटला चालून क्रांतिकारी उधमसिंगांना ३१ जुलै १९४० रोजी लंडनमधल्या पेंटॉनव्हिले तुरुंगातच फाशी झाली आणि त्यांचे प्रेतही तुरुंगाच्या आवारातच पुरले गेले.
१३ मार्च १८४० रोजी लंडनमधल्या कॅक्स्टन हॉलमध्ये ब्रिगेडियर जनरल सर पर्सी साईक्सचं अफगाणिस्तानबद्दल भाषण चाललं होतं. भाषण संपल्यावर भारतमंत्री लॉर्ड झेटलंडने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. ह्या कार्यक्रमाला मुंबईचा पूर्वीचा गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन आणि पंजाबचा पूर्वीचा गव्हर्नर सर लुईस डेन हेही उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला अजून दोन लोक उपस्थित होते - ते म्हणजे पंजाबचा पूर्वीचा अजू एक गव्हर्नर सर मायकेल ओ’ड्वायर आणि ‘मोहम्मद सिंग आझाद’ हे नाव (नाव नीट वाचा म्हणजे गंमत कळेल!) घेऊन तिथे आलेला भारतीय क्रांतिकारी उधम सिंग!

कसेबसे पैसे जमा करून फक्त जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी लंडनमध्ये आलेल्या उधम सिंगांनी इथे लंडनमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी अनेक फुटकळ कामे केली. गाड्या दुरुस्त करणे, रंगारीकाम, सुतारकाम वगैरे. एक सहसा माहीत नसलेली गोष्ट म्हणजे त्यांना अभिनयाचेही अंग होते. त्यांनी लंडनमध्ये असताना ‘द फोर फेदर्स’ व ‘एलिफंट बॉय’ या दोन इंग्रजी चित्रपटांत कामही केले होते. (‘एलिफंट बॉय’ ची लिंक खाली देतोय.) पण हे सगळं वरवरचं होतं. त्यांचा लंडनला यायचा मूळ हेतू जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेणे हाच होता आणि ते संधीची वाटच पहात होते.

कॅक्स्टन हॉलच्या सभेचं आमंत्रण त्यांना मिळालं. मग त्यांनी तयारी सुरु केली. बोर्नमाऊथला जाऊन एका इंग्रज शिपायाकडून जाऊन एक जुनं पिस्तूल आणि गोळ्या विकत घेतल्या. एका पुस्तकात त्या पिस्तुलाच्या आकाराची पोकळी बनवून त्यात ते लपवलं. सोबत खिशात एक चाकूही घेतला.

१३ मार्च रोजीच्या सभेला उधमसिंगांनी मोहम्मद सिंग आझाद ह्या नावाने मस्त सूट - टाय - ट्रिल्बी हॅट वगैरे त्यावेळचा टिपिकल इंग्रजी पोशाख घालून हॉलमध्ये ऐटीत एंट्री केली. वर सांगितलेले साईक्सचे भाषण संपताच त्यांनी पुस्तकातून पिस्तुल काढून सहा गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या ओ’ड्वायरला लागल्या आणि तो तिथेच गतप्राण झाला. दोन गोळ्या लॉर्ड झेटलंडला चाटून गेल्या. एक गोळी सर लुईस डेनच्या मनगटावर लागली तर एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टनच्या हाताला लागली. दोन लोकांनी लगेच झडप मारून उधमसिंगांना पकडले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर
123 views04:26
ओपन / कमेंट
2021-07-30 15:24:01
276 views12:24
ओपन / कमेंट
2021-07-30 15:23:43 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

३० जुलै इ.स.१६७७
"दक्षिण दीग्विजय मोहीम"
छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटकुर" चा हवालदार नेमले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

३० जुलै इ.स.१६८२
कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
"मोगल बादशहा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी (किमॉश) खाली उतरली आणि शपथ घेतली की, छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याशिवाय किंवा राज्यांतून हाकलून दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही. अशी प्रतिज्ञा केली आहे. औरंगजेब बादशहाला दक्षिणेत येऊन एक ते दीड वर्ष झाले. प्रचंड सेनादल, भक्कम दारुगोळा, कसलेले सेनानी, अमाप पैसा पणाला लावणाऱ्या औरंगजेब बादशहाला डोक्यावरचे "किमॉश " खाली टाकावयास लावून बोडके व्हावे लागले. यातच छत्रपती संभाजी महाराजांच्या, मराठा सेनेच्या औरंगी अजस्त्र आक्रमणास तोंड देणाऱ्या विजिगीषू वृत्तीची कल्पना आल्यावाचुन रहात नाही.



३० जुलै इ.स.१६८२
कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद !
"छत्रपती संभाजी महाराजांना जोराचा हल्ला करून दंडाराजपुरी घेईन अशी फार आशा होती. दादाजी प्रभू व इतर सेनापती व आपले निधड्या छातीचे ४ हजार लोक घेऊन, त्यांच्याकडे वेढा घालविला. या दुर्घट कामासाठी उत्तेजित व्हावे म्हणून त्यांस अर्धा शेर सोने किंवा चांदीची कडी बक्षिस दिली. परंतु यश आले नाही. बरेच लोक मारले गेले अवघे ५०० लोक वाचले.



३० जुलै इ.स.१७३३
अंजनवेलच्या गोपालगड मोहीमेदरम्यान रघूनाथ हरींनी बाजीराव पेशव्यांना पत्र पाठवले त्या पत्रात रघूनाथ हरींनी लिहलं होतं कि प्रतिनिधी मला मोहीमेतून बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत आहे.



३० जुलै इ.स.१७८७.
महादजी शिंद्यांना इ.स.१७८४ मध्ये मोगल बादशाहने आपला वकील-इ-मुतालिक नेमले व बादशाहीचे अतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पण मराठ्यांवर आली. तसेच बादशहाचे वसुलीचे अधिकार पण मराठ्यांना मिळाले. राजपूत संस्थानिक मोगल बादशहाचे मांडलिक असल्याने ते त्याला खंडणी देत. त्याशिवाय मराठ्यांना चौथ व सरदेशमुखी पण ध्यावी लागायची. दिल्लीच्या बादशहाची स्थिती-खमक्या वा ढिला, सुस्त बघून राजपूत खंडणी देत किंवा थकवित असत. ज्या वेळी महाद्जीनची मुतालिक म्हणून नेमणूक झाली त्या वेळी स्वतः बादशाह व महादजी ह्या दोघांची आर्थिक स्थिती फारच गंभीर होती. एकादशीच्या घरी द्वादशी अशी दोघांची परिस्थिती होती. मग महाद्जीने आपला मोर्चा जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी राजपुतांकडे वळविला.जयपूर संस्थांन चा राजा पृथ्वीसिंग १७७८ मध्ये मेला व त्याचा भाऊ प्रतापसिंग जो अत्यंत बेजबाबदार होता, राज्यपदी आला. पण त्यावेळी जयपूर दरबारचा मांडलिक असलेला राव राजा प्रतापसिंग जयपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने पृथ्विसिग चा मुलगा मानसिंग ला जयपूरच्या गादीवर बसविण्यासाठी महाद्जींची मदत मागितली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
299 views12:23
ओपन / कमेंट
2021-07-30 15:23:00
211 views12:23
ओपन / कमेंट
2021-07-30 15:22:49 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२९ जुलै इ.स.१६५७
२२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली.



२९ जुलै इ.स.१६७९

मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
"दिलेरखान विजापुरला ढिला पडला पण तोही काटशह देण्यात पटाईत होता. त्याने युवराज शंभुराजेंना घेऊन मराठ्यांच्या मुलुखात किल्ले पन्हाळ्याला वेढा घालण्याचा बेत केला. दिलेरखान आणि युवराज शंभुराजे यांनी पावसाळा संपताच विजापुरचे वजिरास चालून येण्यास भाग पाडून किल्ले पन्हाळ्याखाली युद्ध देण्याची तयारी चालविली. "छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सरहद्दीवर १२ हजार घोडेस्वार आणून ठेवले आहेत व पावसाळा संपताच उभयपक्षी हालचालींना सुरूवात होईल असे मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना कळविले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२९ जुलै इ.स.१६८७
कर्नाटकांत १६८६ नंतर हरजी महाडिकांना मुघलांविरुद्ध लढा द्यावा लागला कारण मोगलांच्या तुकड्या त्या प्रदेशात उतरू लागल्या तेव्हा मराठ्यांनीही त्या प्रदेशांत बराच मुलूख काबीज केला. सरदार गोपाळ दादाजी व विठ्ठल पल्लवी यास हरजीराजे यांनी मुघलांचा पाठलाग करण्याची आज्ञा दिली. [बेंद्रे, संभाजी, पृ. ५२८.] पण त्यांची शक्ती अपुरी पडू नये म्हणून संभाजी महाराजांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८६ मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना तिकडे जाण्याची आज्ञा केली. या आज्ञेनुसार ते दोघे फेब्रुवारी १६८७ मध्ये १२००० सैन्यासह कर्नाटकांत पोहोचले. इ. स. १६८७ च्या सुरुवातीस औरंगजेबाने कुतुबशाही जिंकल्यानंतर कुत्बशाहीचे कर्नाटकांतील मुलूख व किल्ले घेण्यासाठी सरदार रवाना केले होते. १७ एप्रिल १६८७ पर्यंत मुघली सैन्याने बाळापुरमपर्यंत कूच केले. त्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठे सैनिकांकडून प्रतिकार झाला नसावा. कुत्बशाहीतील महत्त्वाचा किल्ला कोंडापिली हा मुघलांनी फितुरीने काबीज केल्याची बातमी २९ जुलैला मद्रासला पोचली होती. [फोर्ट सेंट जॉर्ज कन्सलटेशन, २९ जुलै १६८७.]



२९ जुलै इ.स.१६९२
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठच्या मार्फत त्यांना ‘मिरज’ ची देशमुखी दिली.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले असता इकडे गनिमांनी खूप धामधूम घातली होती, त्यावेळी दख्खन प्रातांची पूर्ण जबाबदारी सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्यावर होती, संताजीरावांनी छत्रपती राजाराम महाराजांचा विश्वास खरा ठरवत मोगलांना पळो की सळो करुन सोडले होते, शेख निजाम, सर्जाखान, रणमस्तखान , जानसरखान असे उमदे वजीर त्यांनी धुळीस मिळविले, जागोजागी गनिमास कोट घालून नेस्तनाबूद केले आणि देश वाचवला, राज्य संरक्षणाच्या प्रसगांस असाधारण श्रम केले, औरंग्यास दहशत लावली, पुढेही कित्येक स्वामिकार्यात राहून त्यांनी खूप मोलाचे कार्य केले, यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी २९ जुलै इ.स.१६९२ रोजी सरसेनापती संताजीराव घोरपडे यांस मिरजची देशमुखी दिली.



२९ जुलै इ.स.१७३२
माळव्याच्या महालांची वाटणी पेशव्यांनी केली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
264 views12:22
ओपन / कमेंट
2021-07-28 11:31:59
175 views08:31
ओपन / कमेंट
2021-07-28 11:31:55 पण त्यावेळी जयपूर दरबारचा मांडलिक असलेला राव राजा प्रतापसिंग जयपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने पृथ्विसिग चा मुलगा मानसिंग ला जयपूरच्या गादीवर बसविण्यासाठी महाद्जींची मदत मागितली. त्यानुसार मराठी फौजा जयपूर राज्यात शिरून एकेक भाग काबीज करून मुलकी राज्यकारभार सुरु केला. तेव्हा प्रतापसिंग ने महाद्जींशी बोलणी सुरु केली. महादजींनी ३ कोटी ४० लाखाची मागणी केली, रावराजा प्रतापसिंग च्या मध्यस्थीने शेवटी ६३ लाखावर बोलणी संपली. त्यातील पहिला ११ लाखांचा हप्ता प्रतापसिंग ने कसाबसा दिला .पावसाला जवळ आल्याने महादजींनी आपल्या रायाजी पाटील ह्या सरदारास बाकी वसुलीसाठी जयपूरला ठेवून दिल्लीकडे प्रस्थान केले.( जून १७८६) महादजी गेल्यानंतर जयपूर दरबारने जोधपुरच्या विजयसिंग व अन्य लहान मोठ्या राजपूत, जाट, शीख, रोहिले अशा सर्वाना एकत्र आणून मराठ्यांना उत्तरेतून घालवून देण्याचा घाट घातला. ह्याची खबर रायाजी पाटलाने महाद्जींस दिली व महादजी दिल्लीहून जयपूरकडे निघाले. ते मे १७८७ मध्ये लालसोट ( सध्या राजस्थानातील दौसा ह्या गावाजवळ आहे.) पोहचले. महाद्जींच्या सैन्यात महाराष्ट्रातील सैनिकांपेक्षा उत्तरेकडील सैनिक मोठ्या प्रमाणावर होते. त्यांना मराठा दौलातीविषयी काही ममत्व नव्हते. तसेच आधी म्हटल्या प्रमाणे महाद्जींची आर्थिक स्थिती ठीक नव्हती, त्यामुळे बराच काळ सैनिकांचे पगार झाले नव्हते. मोगल सरदार व आग्र्याच्या किल्ल्याचा किल्लेदार महाद्जींचा बाजूला होता, तो पण ८० तोफा व बरीच मोठी फौज घेऊन ऐन वेळी राजपुताना जाऊन मिळाला. महाद्जीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर फितुरी होऊन मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली. राजपूत पण विजयोन्मदात पुन्हा आपल्या जागी परतले. मराठ्यांनी पण सगळीकडून कोंडी होत असल्याचे बघून परत फिरण्याचा निर्णय घेतला. काही जणांचे असे म्हणणे आहे कि जर राजपूत माघारी फिरले नसते व त्यांनी लढाई चालूच ठेवली असती तर कदाचित मराठा सैन्याची १७६१ मध्ये पानिपत संग्रामाच्या वेळी झाली तशी अतोनात हानी झाली असती, पण राजपूत व मराठे दोघांनी जास्त लावून धरले नाही म्हणून ती नामुष्की टळली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
181 views08:31
ओपन / कमेंट
2021-07-28 11:31:55 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

२८ जुलै इ.स.१६०६
राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांच्या पत्रांत सरगुऱ्हों" असा उल्लेख!
धामधुमीचा काळ पराक्रमी पुरुषांस भाग्योदय करून घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असतो. कारण यावेळी धडाडी दाखविल्यास त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता असते. राजे मालोजीराजे यावेळी तरुण होते. स्वाभाविकपणेच त्यांच्या महत्वाकांक्षी तरुण मनाला ही राजकीय अस्थिरता भाग्योदयार्थ अनुकूल वाटली व त्यांनी शेती टाकून तरवार हाती धरली. राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांची जी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांत या दोघा महापराक्रमी बंधूंना "सर" असे म्हटले आहे. सरगुन्हो हे सरगिरोह चे मराठी रुप आहे. गिरोह म्हणजे जमाव. त्यांचा प्रमुख म्हणजे सरगिरोह. उपरोक्त पत्रांमध्ये राजे "मालोजीराजे व राजे विठोजीराजे सरगुन्हो यासी गुन्होथलयास मुकासा दिधले असे असा उल्लेख करून काही गावे दिली आहेत. याचा अर्थ स्वतःचा जमाव किंवा सैन्य तुकडी घेऊन सरकार चाकरी करायची, व त्या मोबदल्यात सरकारकडून काही स्थळे खर्चासाठी मागून घ्यायची अशी पद्धत त्याकाळी रुढ होती. त्यानुसार राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांनी आपले स्वतंत्र जमाव उभे करून निजामशाहीत चाकरी केली हे स्पष्ट होते.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२८ जुलै इ.स.१६८२
(श्रावण शुद्ध ५, पंचमी,शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार शुक्रवार)

छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली!
छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली. मुजोर पोर्तुगिजांना धाकात ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ही जहाजे पकडली.



२८ जुलै इ.स.१६८२
मराठ्यांच्या वकीलामार्फत छत्रपती शंभूराजाला पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा, त्याने छत्रपती शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला.

छत्रपती संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये. यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून छत्रपती संभाजी महाराज कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करेल या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता.



२८ जुलै इ.स.१६८४
फितुरांचा ओघ !
छत्रपती संभाजी महाराजांचा सेवक खंडोजी हा २५ स्वारांसह मोगली कैदेत असताना फितूर झाली. त्याला शहजादा आज्जमकडून १५०० जात व १०० स्वारांची मनसब मिळाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या खासगी सेवेतील परशा" नावाचा सेवक फितूर झाला. त्याला पण तशीच मनसब मिळाली. "भद्रोजी" नावाचा सेवक हा काजी हैदरमार्फत फितूर झाला. गाजीउद्दीन हा किल्ले रायगडजवळील निजामपुर लुटून गेला. त्याचा परिणाम असा झाला की, त्याच्याकडे ५ हजार मराठे स्वार चाकरीसाठी गेले. ते फितूर झाले. सुप्याजवळ असाजी वगैरे ३ लोक सुप्याचा ठाणेदार फखरुद्दीन यांच्याकडे फितूर झाले. पदाजी, एकोजी, मल्हार, सुभानचंद हे त्याच वेळी फितूर झाले. औरंगजेब बादशहाचा मुक्काम अहमदनगरला आल्यापासून फितुरिची साथ जोरात फैलावली. इ.स.१६८२ मध्येच या साथीला सुरूवात झाली होती. औरंगजेब बादशहाच्या दरबारच्या अखबारांचा अभ्यास केला तर रोज कोणीना कोणी फितूर झाल्याच्या नोंदी आढळतात.



२८ जुलै इ.स.१७८७
लालसोटची लढाई
२८ जुलै ते ३० जुलै १७८७.
महादजी शिंद्यांना इ.स.१७८४ मध्ये मोगल बादशाहने आपला वकील-इ-मुतालिक नेमले व बादशाहीचे अतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पण मराठ्यांवर आली. तसेच बादशहाचे वसुलीचे अधिकार पण मराठ्यांना मिळाले. राजपूत संस्थानिक मोगल बादशहाचे मांडलिक असल्याने ते त्याला खंडणी देत. त्याशिवाय मराठ्यांना चौथ व सरदेशमुखी पण ध्यावी लागायची. दिल्लीच्या बादशहाची स्थिती-खमक्या वा ढिला, सुस्त बघून राजपूत खंडणी देत किंवा थकवित असत. ज्या वेळी महाद्जीनची मुतालिक म्हणून नेमणूक झाली त्या वेळी स्वतः बादशाह व महादजी ह्या दोघांची आर्थिक स्थिती फारच गंभीर होती. एकादशीच्या घरी द्वादशी अशी दोघांची परिस्थिती होती. मग महाद्जीने आपला मोर्चा जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी राजपुतांकडे वळविला.जयपूर संस्थांन चा राजा पृथ्वीसिंग १७७८ मध्ये मेला व त्याचा भाऊ प्रतापसिंग जो अत्यंत बेजबाबदार होता, राज्यपदी आला.
156 views08:31
ओपन / कमेंट
2021-07-25 08:04:21
516 views05:04
ओपन / कमेंट