Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 136

2021-08-23 06:46:39 https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
295 views03:46
ओपन / कमेंट
2021-08-23 06:46:39 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२२ आॅगस्ट इ.स.१६३२
निजामशाहीत तयार करण्यात आलेली सर्वात अवजड तोफेपैकी एक असणारी ५५ टन वजन असलेली मुलुख मैदान तोफ अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीतून परांड्याचा किल्ल्यावर नेण्यात आली. पुढे हा किल्ला आदिलशाही वजीर मुरार जगदेव याने घेतला आणि ती तोफ त्याने विजापूरला नेली. या संदर्भातील नोंद,'यापूर्वी आकारीनबाजी म्हणोन बुऱ्हाण निजामशाहीचे तर्फेने परांड्याचे किल्ल्याचे बंदोबस्ताचे कामावर नेमला होता. निजामशाहीचे राजधानीत व मुलुखात धांदल झाली तेव्हा आदिलशहाशी मिळाला आणि आदिलशहाचे सेवेची साखळी आपल्या गळ्यात घालून म्हणजे आदिलशहाचे सवेत वागोन परांड्याचा किल्ला आदिलशहाचे हवाली केला. सांप्रत मुरारराव परांड्याचे किल्ल्यावर राहिला.मुरारराव याने मुलुख मैदान तोफ विजापुरास पाठवली ता. १५ माहे सफर सन १०४२. (म्हणजे 22 ऑगस्ट 1632) रोजी बुरुजावर ठेवली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२२ ऑगस्ट इ.स.१६८२
औरंगाबाद ही मुघलांची दक्षिणेतील राजधानी.औरंगजेब दख्खन मोहिमेवर आल्यापासून म्हणजे १६८१ पासून ते १६८३ पर्यंत मराठे मुघलांच्या आक्रमणाला तोंड देण्यासोबतच मुघल प्रदेशात हल्ले करून त्या भागाची लुटही करत असत. १६८१ च्या मे महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद परिसरात लूट करून तो प्रदेश उध्वस्त केला होता. त्यासोबतच १६८२ च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद पासून जवळच असणारे जालना शहर लुटले होते. ऑगस्ट १६८२ च्या अश्याच एका हल्ल्यात औरंगाबाद पासून जवळच असणाऱ्या कन्नडचा ठाणेदार शहा अलीलनरा जखमी होऊन मराठ्यांच्या हाती लागला. मराठ्यांनी त्याला कैद करून ताब्यात घेतले. आणि मुघल सरदार खानजहान बहाद्दूरला जाऊन मिळाला.



२२ ऑगस्ट इ.स.१६८७
मोगलांच्या सोबत सुरू असलेल्या जीवनमरणाच्या संघर्षातही संभाजीराजे राज्यकारभारात किती तत्पर होते ते त्याच्या पत्रावरून लक्षात येते. शिवाजी महाराजांनी वाई प्रांतातील कसबे निंब येथील श्री सदानंद गोसावी यांना मठातील अन्नछत्रासाठी दरसाल रकमेची तरतूद करून दिली होती. पण तेथील कारकून ही रक्कम देण्यास हयगय करत असल्याचे तक्रार राजश्री आनंदगिरी गोसावी यांनी संभाजीराजेच्याकडे केली.त्यामुळे राजेंनी तेथील कारकुनाला जरबेचे पत्र लिहिले, "पहिले पासून अन्नछत्र चालिले असता मध्ये ऐवजाबाबे कुसुर करावया गरज काय? या उपरी ऐवज पाववावया बाबे सुस्ती न करणे. पाहिले पासून द्यावयाचा मोईन असेल तेंण्हे प्रमाणे पाववीत जाऊन अन्नछत्र चालो देणे. धर्मकार्यास खलेल न करणे.जाणिजे. अन्नछत्राचा मामला पूर्वीपासून सालगुदस्ता चालिला असेल ते मनास आणून त्याप्रमाणे चालवणे. उजूर न करणे.लेखनालंकार."



२२ ऑगस्ट इ.स.१७३३
इ.स १७१३ च्या कान्होजी आंग्रे आणि शाहू छत्रपती यांच्यामधील तहामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीचा काही भाग छत्रपतींनी कान्होजी आंग्रे यांस दिला त्यामुळे अधूनमधून या भागात सिद्धी कुरापती काढण्याचा प्रयत्न सातत्याने करतच असे. सिद्दीचा पाडाव करावा असा छत्रपतींचा मनोदय त्यात त्याचा या भागात होणारा पुंडावा या सगळ्या कारणां मुळेच सिद्दीविरुद्ध मोहीम निघावी ह्याविषयीची खलबतं चालू झाली...
समुद्री मोहीम म्हटल्यावर आंग्रे घराण्याशिवाय मोहीम पुढे हालणारचं कशी तेव्हा जानेवारी १७३२ मध्ये खुद्द बाजीराव सेखोजींना भेटण्यासाठी कुलाबा येथे आले त्यांच्या भेटीचा उपयोग झाला,आणि सेखोजींनी ही मोहीम अंगावर घ्यायचे असे ठरवले शिवाय जंजिरेकरा विषयी पूर्ण माहिती असलेला आणि आरमारी लढाईत कुशल असा बांकाजी नाईक महाडिक नावाचा आपला एक प्रसिध्द सरदार सैन्यासह बाजीरावाचे स्वाधीन केला तसेच आपला भाऊ मानाजी यासही या मोहिमेवर जाण्यास सांगितले. इ.स १७३३ एप्रिलमध्ये श्रीनिवासराव प्रतिनिधी बाजीराव आणी फत्तेसिंग भोसले ही मोहीम चालू करण्यासाठी कोकणात आले आंग्ऱ्यांचा सरदार महाडिक आणि सिद्दीसात यांचे चिपळूणजवळ युद्ध झाले त्यात सिद्दी सातची दाणादाण उडाली. या मोहिमेची सुरवात झाल्यावर सिद्दी रसूल याकूतखान मृत्यू पावला व त्याच्या सात मुलांमध्ये यादवी सुरु झाली यात त्याचा ज्येष्ठ मुलगा मारला गेला सिद्दी अब्दुल रहिमान गादीवर बसला तो सेखोजींच्या मताप्रमाणे वागत होता त्यामुळे बाजीरावाविरुद्ध लढू नये, असे त्याचे मत होते परंतु त्याचा सरदार मंडळाला हे मान्य नव्हते त्यांनी सिद्दी रसूल याकूतखानच्या सिद्दी हसन या मुलाला गादी वर बसविले आणि ही मोहीम लढण्यास त्यांनी सुरवात केली.२२ ऑगस्ट १७३३ पर्यंत जंजिरा आणि अंजनवेल हे वगळता सिद्दीची बाकीची सर्व ठाणी मराठ्यांच्या ताब्यात आली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर
212 views03:46
ओपन / कमेंट
2021-08-23 06:46:02
172 views03:46
ओपन / कमेंट
2021-08-23 06:45:52 त्यांनी आपले पती श्रीमंत सयाजीराजे यांच्या सोबत काम केल्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या वर्षापासूनच प्रगतिशील विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी स्त्रियांवर एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नाव" भारतीय जीवनातील स्थिती" असे होते.या पुस्तकात त्यांनी महिलांना ज्ञान देण्याच्या अनेक योजनांच्या अपयशावर प्रकाश टाकला होता.
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात चिमणाबाई राणीसाहेबांचे कार्य व योगदानामुळे संपूर्ण गुजरात मध्ये याची पायाभरणी झाली. या सर्व गोष्टींमुळे चिमणाबाई राणीसाहेबांना गुजरात मधील लोकांच्या हृदयात स्थान मिळाले.चिमणाबाई राणीसाहेब यांनी आपले आयुष्य स्रियांच्या शिक्षणासामधे वाहून घेतले आणि पुरूष प्रणाली व बालविवाह नाकारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.चिमणाबाई राणीसाहेब या उत्तम शिकार करत होत्या.सन.१९०० मधे चिमणाबाई राणीसाहेबांनी रेवा संस्थानला भेट दिली असता तेथे त्यांनी वाघाची शिकार केली होती.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
181 views03:45
ओपन / कमेंट
2021-08-23 06:45:52 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२३ ऑगस्ट इ.स.१६६६
( भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १५८८, संवत्सर पराभव, गुरुवार )

कवी परमानंदांना अटक :-
या दिवशी राजांनी अधिकृत दस्तके दाखवून नरवर घाटी पार केल्याचे फौलाद खानाने वकील गिरीधारीलाल याला सांगितले. मात्र दस्तके नीट न तपासण्याचा आरोप ठेवत औरंग्याने नरवरचा फौजदार ईबादुल्ला खान याची मनसब ५०० घोडेस्वारांनी कमी केली. मात्र याच दिवशी कवी परमानंद यांना दौसा येथे मोगल सैनिकांनी पकडले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२३ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या राजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘शिवाजी येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, शिवाजीला ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व राजा विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाजीला दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्तंबातमी असते. तेव्हा या बाबतींत सत्यता अजमावण्यासाठी तो कुमाराच्या छावणीत आला..’’



२३ ऑगस्ट इ.स.१६८०
(भाद्रपद शुक्ल नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)
शिवरायांच्याच्या अकाली निधनानंतर शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज गादीवर आले. १८ जुन इ.स.१६८० ला रायगडी गेल्यावर आणि थोडी स्थिरता आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडच्या भवानी आईला १० हजार होणांची सनद करून दिली.



२३ ऑगस्ट इ.स १७७०
माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव मोठे झाले होते. नुकत्याच झालेल्या कर्नाटक मोहिमेत नारायणरावांना सहभागी करून त्यांना लढाईचे प्रत्यक्ष मैदानावरील डावपेच शिकवायला माधवरावांनी सुरुवात केली होतीच, परंतु दि. २३ ऑगस्ट सन १७७० रोजी माधवरावांनी सखारामबापू बोकील यांची दिवाणगिरी नारायणरावांना बहाल केली आणि बापूंना मुतालकीची वस्त्रे दिली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीसच नागपूरकर जानोजी भोसले माधवरावांच्या भेटीकरता पुण्यात आले. ही केवळ सदिच्छा भेट होती. माधवरावांनी सेनासाहेब सुभा असलेल्या जानोजी भोसल्यांची उत्तम सरबराई केली. मेजवान्या आणि भेटीदाखल नजराणे दिले गेले आणि ऑक्टोबर महिन्यात जानोजी परत नागपुरास फिरले. माधवरावांची तब्येत अजूनही नादुरुस्तच होती. म्हैसूरचा हैदरअली दिलेली वचने पाळत नव्हता म्हणून माधवरावांनी आपली थोडी फौज हरिपंततात्या फडक्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कर्नाटकात पाठवली. (अंदाजे १७७१ च्या सुरुवातीला). या फौजेने हैदरला पुन्हा हादरा देऊन ३६ लाख रुपये रोख, कर्नाटकातला इतर पूर्वी स्वराज्यात असलेला मुलुख मान्य करून घेतला. शिवाय दरसाल १४ लाख रु. खंडणी भरण्याचे हैदरला ठणकावून सांगितले. कर्नाटकात ही मोहीम सुरू असतानाच माधवरावांनी उत्तरेत असलेल्या महादजी शिंद्यांना दिल्लीवर स्वारी करण्यास सांगितले.



२३ ऑगस्ट इ.स.१७०९
बाळाजी विश्वनाथांस पेशवेपद मिळाले तेव्हा धनाजी जाधवांचा मृत्यू होऊन ५ वर्षे झाली होती (धनाजी जाधव, मृत्यू ९ जुलै १७०८); १७१० मध्ये शाहू महाराजांचा सहाय्यक परसोजी भोसले निवर्तले व त्यांचा पुत्र कान्होजी कारभारावर दाखल झाले. छत्रपती शाहू महाराजांचा मुख्य सरदार रायभानजी भोसले हे २३ ऑगस्ट १७०९ रोजी मरण पावल्यावर शाहू महाराजांची मोठी हानी झाली. यावेळी चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, सिधोजी, हिंदुराव घोरपडे वगैरे सरदारांची मने द्विधा होऊन शाहू राजास आपला जम बसण्याची विवंचना निर्माण झाली. ह्या सरदारांची समजूत काढण्याचा शाहू राजांनी फार प्रयत्न केला. पण ते शाहूस महाराजांस सोडून गेलेच. चंद्ररावाचा व रावरंभा निंबाळकर यांचा पंडावा मोडून आपली बाजू सावरण्यासाठी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांची पेशवेपदी नेमणूक केली.



२३ ऑगस्ट इ.स.१९५८
महिला समाजसुधारक चिमणाबाई सयाजीराव गायकवाड ( बडोदा ) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
देवास येथील श्रीमंत सरदार बाजीराव अमृतराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेल्या गजराबाई या युगदृष्ट्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसर्या पत्नी व राजमाता जमनाबाई राणीसाहेब यांच्या स्नुषा होत्या.चिमनाबाई राणीसाहेब व महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विवाह सन.१८८५ मधे झाला . नेहमीच सांगितले जातेकी प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्री असते,त्याप्रमाणे श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या मागे चिमणाबाई राणीसाहेब या भक्कमपणे ऊभ्या होत्या. महाराजांप्रमाणे चिमणाबाई या स्वप्नाळू राणी होत्या. चिमणाबाई राणीसाहेबांनी बडोद्याच्या प्रमुख महिला नेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
200 views03:45
ओपन / कमेंट
2021-08-21 17:30:49
178 views14:30
ओपन / कमेंट
2021-08-21 17:30:43 https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
179 views14:30
ओपन / कमेंट
2021-08-21 17:30:43 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२० ऑगस्ट इ.स.१६४३
अदिलशहाचे राजे शहाजीराजे यांना हुकुमनामा पत्र!
रणदुल्लाखान मृत्यू पावताच विजापुर दरबारात राजे शहाजीराजे यांचा पक्ष दुर्बळ झाला. तर त्यांच्या वाईटावर असलेल्या मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे इत्यादी मुत्सद्यांचे पारडे जड झाले. रणदुल्लाखानाची दौलत आता त्याचा खिजमतगार असलेल्या अफजलखानाकडे आली. तो त्यावेळी राजे शहाजीराजे यांच्या बरोबर कर्नाटकातच होता. अफजलखान राजे शहाजीराजे यांच्या कट्टर दुष्मनांपैकी एक होता. स्वाभाविकपणेच राजे शहाजीराजे यांना तो पाण्यात पाहू लागला. अफजल खानानेच चंदीच्या राचेवर मराठ्यांना राजे शहाजीराजे फितूर असल्याची "बदगोह" (अफवा) विजापूर दरबारला लिहून कळविली. या किंवा अशाच स्वरूपाच्या काही अन्य तक्रारींवरून आदिलशहाचे मत राजे शहाजीराजे यांच्या विरुद्ध कलुषित झाले. २० आगस्ट इ.स.१६४३ एका पत्रावरून काही दिवसांपूर्वी राजे शहाजीराजे यांना आपली जमात आदिलशहाकडे हजर करण्याचा हुकुम झाल्याचे कळते.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२० ऑगस्ट इ.स.१६६६
( श्रावण अमावस्या, १५८८, संवत्सर पराभव, सोमवार )

औरंग्याचे मिरझा जयसिंगला फर्मान :-
रामसिंगाने फितुरी करून शिवरायांना जाऊ दिले व त्याबदल्यात मात्र, औरंग्याने रामसिंगला शिक्षा करण्यास फर्मावले. त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराजांचे दोन विश्वासू साथीदार रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबक डबीर, फुलाद खानाच्या धरपकडीत सापडले.



२० ऑगस्ट इ.स.१६८३
औरंगजेबने दिनांक २० ऑगस्ट १६८३ रोजी शहाजादे अजम व त्याचा मुलगा बेदारबख्त यांची विजापुरच्या मोहिमेवर नेमणूक केली. ऑक्टोबरला अजम आपल्या फौजेसह मोहिमेवर निघाला. या मोहिमेचा मूळ हेतू विजापुराकडील छत्रपती संभाजी राजांकडे असलेला मुलूख काबीज करणे हा होता. इ. स. १६८४ च्या सुरुवातीस ह्या फौजेस रसद न मिळाल्यामुळे फारच हालांत दिवस काढावे लागले. ही दैन्यावस्था औरंगजेबस समजताच त्याने ४ फेब्रुवारी १६८४ रोजी अजम व बेदारबख्त भेटावयास आले असता त्यांस विजापुरांकडील मुलूख लुटण्याचा हुकूम दिला. त्या आज्ञेवरून त्यांनी सर्व मुलूख लुटून धारवाडच्या किल्ल्यांवर हल्ला चढविला आणि थोड्याच दिवसांत तो किल्ला फत्ते करून माघारे छावणीस गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजी महाराजांचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे.



२० ऑगस्ट इ.स. १७६१
पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर माधवराव पुण्यात आले आणि पहिल्यांदा नजर वळविली ती निजामाकडे. निजामाने मराठे आता पुरते मोडले आहेत, असे समजून घोरपडे, जाधव, घाटगे अशा मराठा सरदारांना पेशव्यांविरुद्ध फितवले आणि नळदुर्ग काबीज केल्यानंतर तो थेट पुण्याच्या रोखाने निघाला. इकडे माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ ला निजामावर स्वारी करायचे ठरले. परंतु नुकत्याच पानिपतच्या युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले. निजामाचा भाऊ सफदरजंगही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता. या मोहिमेत आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते. ते शनिवारवाड्यातच होते. निजाम मार्गावरची मंदिरे फोडत, जाळपोळ करत पुण्याच्या आग्रेयेस असलेल्या 'उरूळी- कांचन' या गावापाशी येऊन पोहोचला. निजामाच्या या हल्ल्यामुळे राघोबादादा गांगरून गेले. कारण यावेळेस निजामाला तोंड देण्याकरता पुण्यात फारशी फौजच नव्हती. आता लवकर हालचाल केली नाही तर निजाम पुणेही जाळेल, ही भीती वाटल्याने दि. २९ डिसेंबर १७६१ या दिवशी रघुनाथरावांनी निजामाशी घाईघाईने तह केला व त्या अन्वये २७ लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुखही तोडून देण्याचे कबूल केले. जानेवारी १७६२ मध्ये माधवरावांना या तहाची बातमी मिळाली. आता काहीही करता येऊ शकत नव्हते. शेवटी नाईलाजाने माधवराव पुण्यास परतले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर
128 views14:30
ओपन / कमेंट
2021-08-21 17:29:51
115 views14:29
ओपन / कमेंट
2021-08-21 17:29:44

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
121 views14:29
ओपन / कमेंट