Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 134

2021-08-29 13:02:01
393 views10:02
ओपन / कमेंट
2021-08-29 13:01:57 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२९ ऑगस्ट इ.स.१६७७
दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा प्रत्यय स्थानिकांसोबतच परकीय सत्ताधाऱ्यांनाही आला होता.डच व्यापारीही त्याला अपवाद नव्हते,त्यांच्या तेगेनापट्टणमच्या फॅक्टरीचा प्रमुख हर्बट जागेर याने आपल्या वकिलामार्फत शिवरायांना अर्ज करून आपल्या व्यापारासाठी त्यांच्या कौलाची आवश्यकता असल्याचे व शिवरायांची सदिच्छा भेट घेण्याची इच्छा असल्याचे कळवले होते. त्यामुळे शिवरायांनी त्यांना भेटीस येण्याची व व्यापार करण्याची परावनगी दिली. त्याप्रमाणे डच अधिकाऱ्याची व महाराजांची ६ ऑगस्टच्या दरम्यान भेट झाली होती. भेटीत महाराजानी त्यांना कौल देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ ऑगस्ट ला डचाना पत्र देऊन शेरखानाच्यावेळी त्यांना मिळत असलेल्या सोयी चालू ठेवण्याचे आश्वासन दिले. फक्त महाराजांनी त्यात एक महत्वपूर्ण बदल केला तो म्हणजे गुलामांच्या व्यापाराला बंदी. ही माहिती जागेर व क्लेमेंट यांनी देवेनापट्टणमला पत्र पाठवून कळवली होती.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२९ ऑगस्ट इ.स.१६८२
नाशिक जिल्ह्यातील साल्हेरचा किल्लावर मराठे खान्देशातून आणलेलली लूट ठेवत असत. साल्हेरच्या जवळचा मुल्हेर किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. साल्हेरचा किल्ला घेण्यासाठी शहाबुद्दीन खानाची नेमणूक करण्यात आली होती.त्याने साल्हेरच्या जवळ आपली छावणी दिली. किल्ला लढून ताब्यात येत नसल्याने तो फितुरीने घेण्यासाठी मुघलांनी प्रयत्न सुरू केले. साल्हेरचा किल्ला मराठ्यांच्या बाजूने परशुराम जोगीचा भाऊ लढवत होता. मुघल सरदार राहुल्लाखान आणि परशुराम जोगी यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. या जोगीने ऑगस्ट १६८२ मध्ये रहुल्लाखानाला कळवले होते की जर बादशाही फौजा माझ्याबरोबर दिल्या तर साल्हेरचा किल्ला मी बादशाही अंमलात आणून देईन. पण प्रत्यक्षात त्याच्याकडून हा गड मुघलांच्या ताब्यात दिला गेला नव्हता.



२९ आगस्ट इ.स.१६८६
मोगल सेनापती याकुतखानाने खेमसावंताला लिहीलेल्या पत्राची नोंद !
सिद्दीची लुटालूट चालूच होती. तो इ.स.१६८५ मध्ये आपले आरमार घेऊन मराठी प्रदेशात आला. त्यावेळी मराठ्यांच्या आरमारावर मोगलांनी हल्ला केला. सिद्दी परत फिरला. मोगलांनी आरमार प्रमुख गोविंद कान्हो यांना पकडले. ७-८ ते गुराबे बुडविली. शिपायांची कत्तल केली. दंडाराजपुरी आणि चौल जवळ मुघल सेनापती याकुतखान याने मराठ्यांचे सैन्यास मारले.



२९ ऑगष्ट इ.स.१७८७
नाना फडणिसानी पुणे दरबारातील पोर्तुगीजांचा वकील नारायण शेणवी धुमे यास बोलवून घेऊन त्याच्यापाशी सोंधेच्या राजाची वास्तपूस केली. ते त्याला म्हणाले, 'संवदेकरांचे पोर्तुगीजानी आजपर्यंत काय केले ते कळून आलेच आहे. आता आपण त्याचे बरवे करू इच्छितो. त्याला आपल्या राज्यावर बसविण्यास शक्य झाल्यास पाहातो.' नाना फडणीस यांचे वरील उद्गार सूचक होते. पोर्तुगीजानी सोंधेच्या राजाचे काहीच बरे केले नव्हते. परस्पर मैत्रीच्या कराराखाली त्यानी सोंधेकरांचे महाल सैन्य धाडून आपल्या ताब्यात घेतले; परंतु सोंधेच्या राजाची त्या महालात काडीचीही सत्ता नव्हती.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
404 views10:01
ओपन / कमेंट
2021-08-28 10:05:52
440 views07:05
ओपन / कमेंट
2021-08-28 10:05:47 शिवरायांनी जागवलेली "स्व"राज्याची ज्योत सेखोजी उर्फ जयसिंगराव आंग्रे यांनी समुद्रावर देखील तेवत ठेवली.
अशा या कालौघात विस्मरण झालेल्या अपराजित सागरी सेनानीस त्रिवार मुजरा.....



२८ ऑगस्ट इ.स.१७७२
श्रीमंत माधवराव पेशव्यांचे सरदार विसाजीपंत बिनिवाले, रामचंद्र गणेश कानडे आणि महादजी शिंदे यांनी "पानिपत"च्या संहारानंतर अवघ्या दहा वर्षातच दिल्लीवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले, आणि नजिबखान रोहिल्याची कबर फोडून पानिपतच्या बदल्यात त्याचा रोहिलखंड (पत्थरगड-नजिबाबाद-शुक्रताल इत्यादी प्रदेश) बेचिराख केल्याबद्दल ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा १७७०-१७७३ दरम्यान चेनापट्टणम्‌ उर्फ चेन्नई प्रांताचा गव्हर्नर जोसास ड्यू प्रे (Josias Du Pre) याने २८ ऑगस्ट १७७२ रोजी माधवरावांचे पत्र लिहून अभिनंदन केले. वास्तविक ड्यू प्रे "मला किती आनंद झाला हे लिहीण्याची आवश्यकता नाही" असं म्हणतो ते मराठ्यांच्या या वादळी चढाईला घाबरून हे स्पष्टच आहे, अन्‌ अखेरीस "इकडील खुशी विचारली तरी ती आपणावरच अवलंबून आहे" असं म्हणून तो स्वतःहून याची कबुलीही देतो..



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
446 views07:05
ओपन / कमेंट
2021-08-28 10:05:47 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२८ आॅगस्ट इ.स.१६६७*
( भाद्रपद वद्य पंचमी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, बुधवार )

मिरझाचा संशयास्पद मृत्यू
घटना घडत होत्या. राजे निसटले, रामसिंगावर आरोप, औरंग्याची नाराजी, ह्यावर मिरझा जयसिंग वैफल्यग्रस्त होता.
त्यात राजेंच्या जीवाची हमी मगितल्यामुळे संशयी औरंग्याने मिरझामुळेच राजे सुटले असा निश्चय करून घेतला आणि मिरझाचा मुन्शी उदयराज करवी बुऱ्हाणपूर येथे मुक्कामी असताना विषप्रयोगाने मृत्यू घडवून आणला.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२८ आॅगस्ट इ.स.१६७९
छत्रपती शिवरायांनी खांदेरी बेट जिंकले.
मुंबई बंदराच्या तोंडावर खांदेरी-उंदेरी बेटावर किल्ला बांधावयाचे योजले.त्यादृष्टीने कारागीर व मालमसाला चौलजवळ ठरवुन महाराजांनी मायनाक भंडारीला सैन्य देऊन रवाना केले. मुंबई बेटावर नियंत्रण ठेऊन शत्रूच्या आरमारी हालचालींना जरब बसणे हा या मागचा उद्देश होता. यातुन मावळ्यांच्या फौजा व इंग्रजामध्ये संघर्ष उडाला.



२८ ऑगस्ट इ.स.१६८२
सिद्दी आणि इंग्रज यांना रोखण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले आरमार बळकट करण्यावर भर दिला होता.मराठी आरमार मायनाक भंडारीचा मुलगा,सिद्दी संबुळचा मुलगा आणि त्याचा मेव्हणा सिद्दी मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ८५ गलबते आणि ५००० सैन्य घेऊन सिद्दीच्या आरमाराला टक्कर देण्यासाठी तयार होते.पण एवढी तयारी करून आणि इंग्रजानी धमकी देऊनही सिद्दीच्या मराठी मुलखातील कारवाया थांबल्या नव्हत्या.मुंबई बंदरात आश्रय मिळत असल्याने त्याला लगतच्या मराठी मुलखात लूटमार करणे सोपे जात होते.'त्याने मराठ्यांच्या ताब्यातील कोर्ले या गावी लूट करून ती आपल्या ताब्यातील उंदेरी बेटावर नेली होती.एवढेच नव्हे तर मराठ्यांना जरब बसवण्यासाठी त्याने नागोठणे येथे जाऊन तिथल्या नागरिकांना त्रास दिला.त्यातील बऱ्याच लोकांची नाके कापून एका हवालदाराला पकडुन त्याने मुंबईला नेले. पण संभाजीराजेच्या भीतीने इंग्रजानी त्याला त्यांना उंदेरीस नेण्यास सांगितले.



२८ ऑगस्ट इ.स.१७३३
सेखोजी आंग्रे यांचा स्मरणदिन......

शिवाजी महाराजांच्या तालमीतच तयार झालेल्या कान्होजी आंग्रे यांनी आपल्या कारकिर्दीत भारताच्या संपूर्ण पश्चिम समुद्र किनारपट्टीवर मराठ्यांचा दरारा निर्माण केला. इ.स.१७२९ मध्ये कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या ६ मुलांपैकी ज्येष्ठ पुत्र सेखोजी उर्फ जयसिंगराव हे मराठा आरमाराचे प्रमुख म्हणजे "सरखेल" झाले. त्यावेळी सेखोजींचे वय होते अवघे २४ वर्षे. आपल्या पित्याप्रमाणेच सेखोजी अत्यंत शूर व कडक शिस्तीचे होते. परंतु दुर्दैवाने ते अल्पायुषी ठरले.

कान्होजींच्या मृत्यूमुळे आतापर्यंत दबून राहिलेले इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्दी, वाडीकर सावंत व इतर स्वकीय शत्रू देखील मराठ्यांचे आरमार संपविण्यासाठी टपून बसले होते. या सर्वांशी सेखोजींनी अत्यंत चलाखीने लढा दिला. सेखोजींनी छत्रपती थोरले शाहू महाराज व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेऊन या सर्वांशी कडवी झुंज दिली. शिवाजी महाराजांपासून आपला पिढीजात वैरी असणाऱ्या सिद्दीला सेखोजींनी सळो की पळो करून सोडले. सिद्दीकडे असणारा कोकणातील बराचसा प्रांत जिंकून घेण्यात आला. स्वराज्याची राजधानी असणारा रायगड किल्ला त्यावेळी सिद्दीच्या ताब्यात होता. तो देखील छत्रपती, पेशवे, प्रतिनिधी व आंग्रे यांनी एकत्रीत व्यूहरचना करून जिंकून घेतला. सिद्दीच्या जंजिऱ्यावर देखील चौफेर हल्ला करण्यात आला. या सर्व मोहिमांमध्ये सेखोजी आंग्रेंसोबत त्यांचे बंधू व त्यांच्या आईने देखील हिरीरीने सहभाग घेतला होता.

सततच्या मोहीमा व दगदगीमुळे दि. २८ ऑगस्ट १७३३ रोजी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी सेखोजी आंग्रे यांचे निधन झाले. त्यांना आणखी आयुष्य लाभले असते तर मराठ्यांचे आरमार अखंडही राहिले असते आणि बलिष्ठही झाले असते.

शिवरायांच्या काळी ज्या परकीय सत्ताधाऱ्यांकडून आपल्या जहाजांना परवानगी घ्यावी लागत असे, त्याच परकीयांना आता परवाने घेणे आंग्र्यांनी बंधनकारक केले होते. त्यामुळे चिडलेल्या यूरोपियनांनी अनेकवेळा आंग्रे व त्यांचे आरमार संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यांना कधीही शक्य झाले नाही. वास्तविक पाहता त्यावेळी इंग्रज, पोर्तुगीज, डच हे समुद्रावरील अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्याशी समुद्रावर लढा देणे, ही बाब फार कठीण होती. यामुळे हे युरोपीयन आंग्रेंना "पायरेट" (समुद्री चाचे) म्हणू लागले. आपल्याच समुद्रावर संचार करण्यासाठी या परकीयांची परवानगी घ्यावे लागणे म्हणजे एकप्रकारची गुलामगिरीच होती. आणि ती गुलामगिरी दर्याराज आंग्रेंनी साफ धुडकावून लावलेली होती.
338 views07:05
ओपन / कमेंट
2021-08-27 11:55:02
265 views08:55
ओपन / कमेंट
2021-08-27 11:54:57 लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
266 views08:54
ओपन / कमेंट
2021-08-27 11:54:57 संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण पंतसचिव या आणि यांच्या सारख्या अनेक लोकांनी स्वराज्याचा हा आर्थिक तोल अतिशय निगुतीने आणि जवाबदारीने सांभाळून ठेवला. सुरवातीला किल्ले झुंजत ठेऊन मुघलांना जेरीस आणायचे, नंतर बोलणी करून मोठ्या रकमा घेऊन किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यायचे आणि एकदा का मुघलांनी किल्ला ताब्यात घेऊन त्याची रसदे सह उत्तम व्यवस्था लावली की तोच किल्ला परत मुघलांकडून जिंकून घ्यायचा अशी अनेक उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतात. हे सर्व करत असताना कोणाच्याही वैयक्तिक स्वार्थाला अंकुर फुटले नाहीत हे विशेष. याचे एकमेव म्हणजे जिंजी मध्ये असलेल्या राजाराम महाराजांवरील निष्ठा आणि राजाराम महाराजांनी आपल्या सहकार्यावर टाकलेला पूर्ण विश्वास.

महाराष्ट्रात हे घडत असताना राजाराम महाराजांनी स्वराज्याला आर्थिक बळ देणारा एक विलक्षण आणि अल्प परिचित व्यवहार केला तो म्हणजे “पाँडेचरीची विक्री”. वर म्हणल्या प्रमाणे कोणतेही राज्य चालवण्यासाठी आर्थिक बळ असणे अत्यंत गरजेचे असते पण हे आर्थिक बळ योग्य वेळेत उभे राहणेही गरजेचे असते. महाराष्ट्रातील संघर्षाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी दक्षिणेत असताना १६९०च्या दरम्यान तेगणापट्टणचा किल्ला आणि त्या जवळील कुडलोर हे खेडे विक्रीस काढले होते. या व्यवहारातून त्यांनी स्वराज्यासाठी ५०००० पगोडे इतकी रक्कम उभी केली. कुडलोर आणि तेगणापट्टणचा किल्ला मद्रासच्या इंग्रजांनी मराठ्याकडून विकत घेतला. याच धर्तीवर फ्रेंच आणि डच वसाहती असलेली पाँडेचरी त्यांनी विक्रीस काढली. फ्रेंचांशी मराठ्यांचे असलेले जुने संबंध लक्षात घेता फ्रेंच हा व्यवहार आपल्या बाजूनेच होणार असे गृहीत धरून घासाघीस आणि विलंब करू पहात होते. तसेच फ्रेंचांनी हा व्यवहार डचांशी होऊ नये म्हणून राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. पण पैश्याची निकड लक्षात घेऊन राजाराम महाराजांनी दिनांक २७ ऑगस्ट १६९३ रोजी २५००० पगोडे किमतीला पाँडेचरी डचांना विकत दिली.

वर उल्लेख केलेल्या विक्री व्यवहारांमध्ये राजाराम महाराजांची “स्थिरबुद्धी” अधोरेखित होते. स्वराज्यास ज्यावेळी धनाची आवश्यकता होती त्यावेळी भूमी विकून धन उभे केले आणि काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळवून पुढील योजना ठरवल्या आणि त्या अमलात आणण्यासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण केली. शिवछत्रपतींनी दिग्विजय मोहिमेत दक्षिणेत रोवलेल्या या घट्ट पायांनी आणि राजाराम महाराजांच्या स्थिरबुद्धी दूरदृष्टीने भविष्यात मराठ्यांनी उत्तरेतील थोरल्या मसलती पार पडल्या असे म्हणल्यास काही वावगे ठरू नये.



२७ ऑगस्ट इ.स.१७२७
निजामाच्या कुरघुड्या चालू झाल्यावर त्यास तोंड कसे द्यावे याचा विचार करण्यासाठी शाहू महाराजांनी मंत्री मंडळाची बैठक बोलाविली. यावेळी शाहू महाराजांच्या मंत्री मंडळात एक विचार होईना. श्रीपतराव प्रतिनिधीचा पक्ष होता त्याचे म्हणणे निजामाशी समझोता करावा. शाहू महाराजांनी विचार केला की, बाजीराव पेशवा कर्नाटकात गेलेला, तसेच आपली फौजही उत्तर हिंदुस्थानात व कर्नाटकात गेलेली; अशा स्थितीत समझोता करणेच योग्य आणि समझोता करण्याकरिता त्यांनी आपल्या तर्फेप्रतिनिधी व सुमंत या दोघांना निजामाकडे पाठविले. निजामाने बोलणे लाविले की, चौथाई वसुलीकरिता मराठ्यांनी आपले मोकासदार नेमू नयेत. त्यांना नक्त रक्कम मी देतो. त्याप्रमाणे त्यांनी हैद्राबाद प्रांताची चौथाईची रक्कम तीन लाख निजामाकडून घेण्याचे कबूल केले. अशा या विमनस्क स्थितीत शाहू महाराजांनी मराठ्यांचे हैद्राबादवरील वर्चस्व घालविले. सर्व दक्षिणच्या सहा सुभ्यांच्या चौथाई वसुलाबद्दल शाहू छत्रपति रोख रकमेचा स्वीकार करण्याच्या मनस्थितीत असताच बाजीराव साताऱ्यास शाहू महाराजांपाशी आले आणि
त्यांनी चौथाई वसुलीचे हक्क सोडल्यास आपल्या सत्तेस कसा उणेपणा येतो हे महाराजास समजाऊन सांगितले. इतक्यात ठरलेल्या रकमेबद्दल निजामाकडून असा निरोप आला की, शाहू महाराज व संभाजी राजे यापैकी छत्रपति कोण हे दोघांनी आपसात ठरविल्याशिवाय रक्कम देता येत नाही. यावरून शाहू महाराजांनी निजामाचा डाव (निजामाने शाहू महाराजांस बुडवून मराठ्यांची सत्ता गुजरात आणि माळवा या प्रांतातून नाहीशी करण्याकरिता संभाजी राजास हाताशी धरले. शाहू महाराजांच्या सैन्यात फितुरी आणित राज्यात धुमाकूळ कसा माजवला या संबंधीचे पत्र सवाई जयसिंगास निजामाने लिहिले होते.) पूर्णपणे ओळखला आणि बाजीरावांस निजामावर चाल करून जाण्यास सांगितले. बाजीरावांनी निजामावर चालून जाण्याकरिता २७ ऑगस्ट १७२७ ला सातारा सोडले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

194 views08:54
ओपन / कमेंट
2021-08-27 11:54:57 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२७ ऑगस्ट इ.स.१६५६
जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजानी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने शिळीमकरांच्या मध्यस्तीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला. महाराजानी मोरेंना घोडा,शिरपाव देऊन सन्मान केला व मोरेंच्याकडील पराक्रमी वीर म्हणजे मुरारबाजी देशपांडे व त्यांचे चार बंधू(त्रिंबकजी,शंकराजी,संभाजी व महादजी)यांना आपल्याकडे मागून घेतले. चंद्ररावना मात्र महाराजानी कैदेत ठेवले. महाराजांशी वरकरणी सख्य दाखवत चंद्ररावाने आपल्या सुटकेसाठी चोरून मुधोळकर घोरपडेना पत्र लिहिले. पण ही पत्रे महाराजांच्या हाती लागली.चंद्ररावच्या बेईमानीने महाराज संतप्त झाले. त्यातच चंद्रराव कैदेतून पळून गेला,पण दुर्दैवाने तो पकडला गेला. यावेळी मात्र महाराजांनी त्याची गर्दन मारली. चंद्रराव मोरे कैदेतून पळाले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२७ ऑगस्ट इ.स.१६७९
१६७९ च्या पावसाळ्यात माजगावच्या बंदराचे काही काम सुरु असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इंग्रजांनी सिद्दीला आरमार सुरतला नांगरण्यास सांगितले व सिद्दी आरमारासह सुरतेस गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर या सर्व हालचालींकडे अत्यंत बारीक नजर ठेवून होते. आणि या वेळेचा फायदा उठवायचा असे ठरवून महाराजांनी साहित्य, काही दारूगोळा व आपली माणसे चौलच्या ठाण्यात जमवली. इंग्रजांच्या पोर्तुगीज आणि काही हिंदू हेरांकडून ही माहिती इंग्रजांना कळली. हेरांनी स्पष्ट कळवले होते कि जर आज छत्रपती शिवाजी महाराजांना रोखले नाही तर पुढे हे प्रकरण आवघड होईल त्यामुळे याचा लवकर बंदोबस्त करावा परंतु इंग्रजांनी हे प्रकरण फार मनावर घेतले नाही असे दिसते. कारण याच दिवशी इंग्रजांनी मुंबईच्या रक्षणार्थ तैनात असलेली ‘हंटर’ नामक फ्रिगेट मंगळूरच्या एका व्यापाऱ्याला भाडेतत्वावर दिली. दरम्यान पुढच्या ३-४ दिवसातच चौलला असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा ताफा सर्व रिसाल्यासह खांदेरीवर उतरला. या दर्यावर्दी मावळ्यांचा प्रमुख होता मायनाक भंडारी. मायनाक सोबत या वेळी सुमारे १५० माणसे व ४ लहान तोफा होत्या. हे कळताच इंग्रजांना घाम फुटला आणि त्यांनी सप्टेंबर १६७९ सुरुवातीला ही हकीकत सुरतेला कळवली तसेच नारायण शेणवी नामक वकिलाला शिवाजीराजांच्या चौलच्या ठाणेदाराकडे निषेध नोंदवण्याकरिता रवाना केले.



२७ ऑगस्ट इ.स.१६८०
छत्रपती संभाजी राजांचे हस्ताक्षरसह दानपत्र
छत्रपती संभाजी राजांना राज्यपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आधीच संकल्प केल्याप्रमाणे कुडाळ गावातील एका विद्वान ब्राह्मण श्री. बाकरे यांना एक दानप‍त्र दिले. हे दान पत्र दिल्याची तारीख २७ ऑगस्ट १६८० असून यात छत्रपती संभाजी राजांनी श्री. बाकरे यांना दहा हजार वराहा [२४ गुंजा वजनाचे शुद्ध सोन्याचे एक अशी १० हजार नाणी] दान ह्मणून दिली. हे दानप‍त्र संस्कृत भाषेत असून ३०० सें.मी. लांब व २३.५ सें.मी. रुंद आहे. ५० सें.मी. लांबीचा एक असे एकूण ६ कागद आहेत आणि त्याला पाच ठिकाणी जोड आहेत. दानप‍त्राचा कागद उत्तम जातीचा असून मजबूत आहे. कागदाच्या दोन्ही बाजूने वेलबुट्टी काढलेली असून फुलांची चित्रे उमटवलेली आहेत. यावर संभाजीराजांची मुद्रा असून त्याखाली

II मतं मे श्रीशिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज II
II छत्रपते: यदत्रोपरिलेखितं II छं II श्री II

‌असे लिहिलेले आहे. याचा अर्थ पुढील प्रमाणे "मला, श्रीशिवराजाचा पुत्र श्री शंभूराज छत्रपती याला, यावर (दानपत्रावर) जे लिहिले आहे ते मान्य आहे." या मजकूराचे हस्ताक्षर या दानप‍त्रातील हस्ताक्षरापेक्षा वेगळ्या वळणाचे असून अनेक इतिहास संशोधकांच्या मते हे हस्ताक्षर छत्रपती संभाजी राजांचे आहे.



२७ ऑगस्ट इ.स.१६९३
अपरिचित राजाराम महाराज
राज्याभिषेकानंतरचा काळात शिवछत्रपतींना स्वास्थ्य दायक असायला हवा होता. पण काही हातावर मोजण्या इतके दिवस सोडता दक्षिणदिग्विजय आणि नंतरच्या घडामोडींनी महाराज स्वास्थ्यलाभा पासून वंचितच राहिले. या श्रीमानयोग्याचे अखंड जीवन समर्थांनी म्हणल्या प्रमाणे राज्य साधनेच्या “लगबगीत”च संपले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोनही सुपुत्रांचे जीवनही अतिशय खडतर गेले. शिवकाल आणि शंभूकालाचा तौलनिक अभ्यास करताना संभाजी महाराजांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक चणचण फारशी जाणवत नाही. पण शंभू छत्रपतींच्या हौतात्म्य नंतर संपूर्ण स्वराज्यावर मोगलाई वरवंटा फिरल्याने मराठ्यांची आर्थिक कोंडी झाल्याचे स्पष्ट दिसून येते. या कोंडीचे अधिक भीषण रूप आपल्याला राजाराम महाराजांच्या काळात सहज लक्षात येईल. या भूमीत ना राजधानी, ना तख्त सिंहासन आणि परागंदा झालेला राजा अश्या परिस्थितीत निर्नायकी महाराष्ट्राला तारले ते शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्य अस्मितेने.
207 views08:54
ओपन / कमेंट
2021-08-26 16:33:25
319 views13:33
ओपन / कमेंट