Get Mystery Box with random crypto!

पण त्यावेळी जयपूर दरबारचा मांडलिक असलेला राव राजा प्रतापसिंग ज | " छञपती श्री शिवाजी महाराज "

पण त्यावेळी जयपूर दरबारचा मांडलिक असलेला राव राजा प्रतापसिंग जयपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने पृथ्विसिग चा मुलगा मानसिंग ला जयपूरच्या गादीवर बसविण्यासाठी महाद्जींची मदत मागितली. त्यानुसार मराठी फौजा जयपूर राज्यात शिरून एकेक भाग काबीज करून मुलकी राज्यकारभार सुरु केला. तेव्हा प्रतापसिंग ने महाद्जींशी बोलणी सुरु केली. महादजींनी ३ कोटी ४० लाखाची मागणी केली, रावराजा प्रतापसिंग च्या मध्यस्थीने शेवटी ६३ लाखावर बोलणी संपली. त्यातील पहिला ११ लाखांचा हप्ता प्रतापसिंग ने कसाबसा दिला .पावसाला जवळ आल्याने महादजींनी आपल्या रायाजी पाटील ह्या सरदारास बाकी वसुलीसाठी जयपूरला ठेवून दिल्लीकडे प्रस्थान केले.( जून १७८६) महादजी गेल्यानंतर जयपूर दरबारने जोधपुरच्या विजयसिंग व अन्य लहान मोठ्या राजपूत, जाट, शीख, रोहिले अशा सर्वाना एकत्र आणून मराठ्यांना उत्तरेतून घालवून देण्याचा घाट घातला. ह्याची खबर रायाजी पाटलाने महाद्जींस दिली व महादजी दिल्लीहून जयपूरकडे निघाले. ते मे १७८७ मध्ये लालसोट ( सध्या राजस्थानातील दौसा ह्या गावाजवळ आहे.) पोहचले. महाद्जींच्या सैन्यात महाराष्ट्रातील सैनिकांपेक्षा उत्तरेकडील सैनिक मोठ्या प्रमाणावर होते. त्यांना मराठा दौलातीविषयी काही ममत्व नव्हते. तसेच आधी म्हटल्या प्रमाणे महाद्जींची आर्थिक स्थिती ठीक नव्हती, त्यामुळे बराच काळ सैनिकांचे पगार झाले नव्हते. मोगल सरदार व आग्र्याच्या किल्ल्याचा किल्लेदार महाद्जींचा बाजूला होता, तो पण ८० तोफा व बरीच मोठी फौज घेऊन ऐन वेळी राजपुताना जाऊन मिळाला. महाद्जीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर फितुरी होऊन मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली. राजपूत पण विजयोन्मदात पुन्हा आपल्या जागी परतले. मराठ्यांनी पण सगळीकडून कोंडी होत असल्याचे बघून परत फिरण्याचा निर्णय घेतला. काही जणांचे असे म्हणणे आहे कि जर राजपूत माघारी फिरले नसते व त्यांनी लढाई चालूच ठेवली असती तर कदाचित मराठा सैन्याची १७६१ मध्ये पानिपत संग्रामाच्या वेळी झाली तशी अतोनात हानी झाली असती, पण राजपूत व मराठे दोघांनी जास्त लावून धरले नाही म्हणून ती नामुष्की टळली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"