Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 140

2021-08-07 07:46:12
296 views04:46
ओपन / कमेंट
2021-08-07 07:46:00

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
301 views04:46
ओपन / कमेंट
2021-08-07 07:46:00 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

७ आगस्ट इ.स.१६४८
महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गडावर रवाना !
किल्ले पुरंदराची अभेद्यता व भव्यता पाहून महाराज बहोत खूष झाले. भविष्यात हा गड फार उपयोगी व महत्वाचा आहे. हे जाणून महाराजांनी अनेक डागडुजी आणि शिबंदीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

७ आगस्ट इ.स.१६८८
स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपले मातब्बर मोहरे पाठविले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी औरंगजेब बादशहाने मुल्तफतखान व त्याच्या बरोबर बरवा बलंदखान, मुल्तफखानाचा भाचा फजलुल्ला, व नागोजी ५ हजारी मनसबदार यांना पाठविले. नुकत्याच जिंकलेल्या सरसगड किल्ल्यावर सय्यद अब्दुल्लाखान याची नेमणूक करण्यात आली. मुल्तफखानाच्या फौजेत महादजी (महादजी निंबाळकर) यांचे ४०० स्वार तैनात करण्याचा हुकुम झाला.



७ ऑगस्ट इ.स.१७९०
पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेत मराठ्यांचा जम बसवण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली ती सरदार महादजी शिंदे यांनी. दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने महादजींनी आपली फौज एकत्र करून दिल्लीवर आक्रमण केले. दिल्ली यावेळी अफगाण व रोहिल्यांच्या ताब्यात होती.महादजींनी दिल्ली ताब्यात घेतली व इंग्रजांच्या आश्रयाला गेलेल्या शहाआलम ला परत आणून त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले.पण महादजींचे हे वर्चस्व बादशहाचे काही सरदार व राजपुताना मानवले नाही,त्यांनी एकत्र येऊन 29 जुलै ला लालसोटच्या लढाईत महादजींचा पराभव केला.यानंतर पानिपतचा सूत्रधार नजीबखानाचा नातू गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांनी बादशहा शहाआलम ला पदच्युत करून त्याचे डोळे काढले व त्याच्या जागी बिदर बख्तला गादीवर बसवले.महादजींनी हार न मानता पुन्हा सैन्य जमवून दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि गुलाम कादरला कैद करून ठार मारले आणि पुन्हा अंध शहाआलम ला गादीवर बसवले.शहाआलम ने खुश होऊन संपूर्ण राज्यात गोवधबंदी जाहीर केली व मथुरा व वृंदावन ही पवित्र स्थळे महादजींना देण्यासंबंधीचे फर्मान काढले.



७ ऑगस्ट इ.स.१९४१
विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन
प्रतिभावंत साहित्यिक , ओजस्वी कवी , प्रखर शिक्षणतज्ञ व सामाजिक भान असलेले विचारवंत रविंद्रनाथ टागोर हे अलौकिक व्यक्तीमत्व होते. वयाच्या ९ व्या वर्षी पाहिली कविता करणाऱ्या टागोरांनी वयाच्या ८० व्या वर्षी एक हजारावी कविता केली. लहानपणापासून टागोरांची शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. चारभिंतीच्या आड शाळा म्हणजे तुरुंग व शिक्षक म्हणजे पोलिस अशा वातावरणात सहज शिक्षण मिळू शकत नाही. या विचारामुळे टागोरांनी कधी औपचारिक शिक्षण घेतले नाही. त्यांना घरी शिक्षणांची सोय त्यांच्या वडीलांनी केली.बंगाली साहित्यातच नाही तर जागतिक साहित्यात रविंद्रनाथ टागोरांनी आपल्या साहित्याचा ठसा उमटवला . टागोरांनी " गीताजंली"नावाचा अजोड ग्रंथ लिहून भारतातील साहित्यातील पहिला नोबाल पुरस्कार मिळवला. गीताजंलीचे इंग्रजीत पुढे भाषांतर झाले. पुढे जगातील अनेकदा भाषांत गीताजंलीचे भाषांतर झाले. गीताजंलीच्या नोबल पुरस्कारांच्या पैशातून रविंद्रनाथ टागोरांनी त्यांनी त्याच्या कल्पनेतील शाळा निर्माण केली तीच " शांतिनिकेतन " होय. निर्सगाच्या सानिध्यात असलेली ही संस्था जगाचा आकर्षणाचा विषय ठरली.जन गण मन......सारखे राष्ट्रीय गीत लिहून टागोरांनी तमाम भारतीयांना एकत्र जोडले. टागोर यांचे संपूर्ण साहित्य हा ज्ञानाचा भंडार होता. पु.ल. देशपांडे यांनी टागोरांचे साहित्य वाचण्यासाठी खास बंगाली भाषा शिकले.टागोर यांचे बरेचसे साहित्य हे जरी बंगालीमधील असले तरी साहित्यिकाला प्रांताच्या सीमा नसतात. हे त्यांच्या विविध साहित्यांतून समजते.टागोर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानत असे. शिवरायांवर टागोरांनी खंडकाव्य रचले. स्वदेशी व बहिष्कार चळवळीबाबत त्यांची मतभिन्नता होती. १९१९ मध्ये जालियनवाला बागहत्याकांडाचा टागोरांनी निषेध करुन आपली "सर "ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली. महात्मा गांधी व डॉ.आंबेडकरांच्या पुणे कराराबाबत सहकार्य टागोरांनी केले.

परमेश्वर म्हणजे काय ? या विषयाची फोड करताना टागोर म्हणतात , आपले अपूर्णत्व असह्य झाल्यामुळे मनात आणि जीवनात आकारास येणारी परिपूर्णतेची प्रतिमा म्हणजेच परमेश्वर होय. देव खडी फोडणा-यांच्या घामात आहे. श्रमिकांच्या कामात आहे. शेतकऱ्यांच्या सावलीत आहे. यावरुन टागोरांच्या विचारांची प्रग्लभता सहज लक्षात येते. विषय ठरली.जन गण मन......सारखे राष्ट्रीय गीत लिहून टागोरांनी तमाम भारतीयांना एकत्र जोडले. अशा या अलौकिक साहित्यांचा मृत्यू ७ आॕगस्ट १९४१ मध्ये झाला.
248 views04:46
ओपन / कमेंट
2021-08-06 07:19:29
137 views04:19
ओपन / कमेंट
2021-08-06 07:19:24 यशवंतराव होळकरांच्या भीतीनें बाजीराव सिंहगडाहून महाडास आणि तेथून वसईस गेला. आणि त्याने इंग्रजाश लाजिरवाणा तह केला ! बाजीराव इंग्रजी कृपेमुळे परत गादीवर येणार होता. त्याच्या पदरीं इंग्रजी तैनाती फौज राहणार होती, त्यामुळे बाजीराव इंग्रजांच्या हातचें बाहु बनला. या वेळी पुण्याच्या दरचारीं महादजींचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांचें वर्चस्व होते. त्यांच्या पदरीं फ्रेंच फौज चांगलीच तयार झालेली होती. तेव्हां आतां शिंद्यांकडे लक्ष देणें इंग्रजांचे कर्तव्य होते. सर्वत्र फंदफितुरी करून इंग्रजांनी मोठींच कृष्णकारस्थानें रचलीं. त्यांनीं बाजीरावास गादीवर बसविलें. आणि दौलतराव शिंदे यांचे अजिंक्य लष्कर आणि जय्यत तोफा यांचा नाश करण्यास ते प्रवृत्त झाले. त्याप्रमाणें जनरल वेलस्ली यानें श्रावण व. ३ रोजी लढाई पुकारली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
143 views04:19
ओपन / कमेंट
2021-08-06 07:19:24 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

६ ऑगस्ट इ.स.१६४८
(श्रावण वद्य १२, द्वादशी, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार रविवार)

महाराजांची किल्ले पुरंदर " मोहीम!
किल्ले पुरंदर आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि किल्ले पुरंदरचे किल्लेदार होते महादजी नीळकंठराव सरनाईक पिढ्यानपिढ्या सरनाईक घराणे किल्ले पुरंदरची किल्लेदारी करत होते. त्यात राजे शहाजीराजे यांचा आणि महादजींचा दाट स्नेह वयोवृद्ध महादजी‌ आता थकले होते. त्यामुळे त्यांच्या निळोपंत, शंकराजीपंत, विसाजीपंत व त्रिंबकपंत या ४ मुलांत वतनासाठी कटकटी सुरू होत्या. चाणाक्ष शंकराजीपंत महाराजांच्या सहाय्याने मदत मिळवू पहात होते. महाराजांनीही मग शंकराजीपंतांना हाताशी धरून भेदनीतीने किल्ले पुरंदरचे राजकारण केले आणि किल्ला हाती घेतला. किल्ले पुरंदर निश्चित कधी हाती आला व कसा आला यात, निरनिराळ्या अभ्यासकांच्या मतभिन्नता आहे. मात्र फत्तेखानाच्या स्वारीची शक्यता पहाता हा किल्ला महाराजांनी आगस्ट इ.स.१६४८ ते आक्टोबर महिन्याच्या इ.स.१६४८ आधी स्वराज्यात निष्चितच दाखल केला आहे.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

६ ऑगस्ट इ.स.१६५७
(श्रावण शुद्ध ७, सप्तमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)

महाराजांचा अहमदनगर येथे मुघल छावणीत हल्ला!
छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर येथे मुघल छावणीत हल्ला केला.



६ ऑगस्ट इ.स.१६५९
ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील
प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण-भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत.
आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत."



६ ऑगस्ट इ.स.१६७७
दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तुंदुमगुर्ती ला आले.
या मुक्कामात महाराजाना भेटण्यासाठी तेवेनापट्टणमचे डच अधिकारी आले होते. डच मंडळींना पायदळाचे सैनिक महाराजांच्या नाजूक अल्कटिव्ह असणाऱ्या तोरणपट्टानी सजवलेल्या महाराजांच्या तंबूत घेऊन गेले.डच मंडळी तंबूत बसल्यावर शिवराय तंबूत आले. त्यांच्यासोबत जनार्दन व रघुनाथ पंडित होते. शिवराय आपल्या आसनावर बसल्यावर जनार्दन पंडित त्यांच्यासमोर तर रघुनाथ पंडित महाराजांच्या जवळ उजवीकडे बसले. शिवराय जेंव्हा तंबूत आले तेंव्हा तंबूत असणारे सारे उठून उभे राहिले. महाराजानी यावेळी सोनेरी नक्षीकाम केलेली वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या उजव्या हातात मुठीला सोन्याचा वर्ख लावलेला पट्टा होता. भेटीत महाराजांनी डचाना कौल दिला व त्यांचा अधिकारी निकोलस क्लेमेंट यांच्याशी मैत्रीपूर्ण बोलनी केली. यावेळी डचानी महाराजाना चंदेरी कपडा, ८ रुंद तलवारी, ३३ पौंड चंदन, २ पेट्या गुलाबपाणी, ३ हरणाची कातडी, ४८ पौंड लवंग, जायफळ, १ चांदीचा पानपुडा, ३ छोट्या सोनसाखळ्या या भेटवस्तू दिल्या. महाराजांनी डचानाही भेटवस्तू देऊन निरोप दिला.



६ ऑगस्ट इ.स.१८०३
इंग्रज आणि शिंदे-भोसले !
शके १७२५ च्या श्रावण व ३ रोजी इंग्रज अधिकारी जनरल वेलस्ली
यानें शिंदे व भोसले यांच्याविरुद्ध लढाई पुकारली. अठराव्या शतकाच्या अखेरीस मार्किस ऑफ वेलस्ली हा हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून आला तेव्हां राजकीय परिस्थिति मोठी गंभ होती. हिंदुस्थानांत फ्रेंचांची सत्ता बळावत होतीच; परंतु युरोपमध्यें नेपोलियनचा उदय झाल्यामुळे इंग्रजांना फार धास्ती वाटत होती. इंग्रजांच्या विरुद्ध टिपूनें सर्व मुसलमानांचा एक संघ निर्माण केला होता. आणि मराठ्यांच्यामध्येंहि अशीच एकजूट निर्माण झालेली होती. पेशवे, शिंदे, गायकवाड, भोसले, वगैरे अनेकांच्या मदतीने 'मराठा कॉन्फीडर 2 निर्माण झाली होती. या बिकट परिस्थितीतून धूर्त इंग्रजांनी वाट काढली आणि या सर्वांवर विजय मिळविला. निजाम आणि मराठे यांच्या साह्याने . इंग्रजांनी टिपूचा पराभव केला आणि त्याचें श्रीरंगपट्टणचें राज्य काबीज केलें, आणि त्यानंतर कांहीं कुरापत काढून निजामासहि हतवीर्य करून त्याच्या जवळील फ्रेंच सैन्य घालवून दिलें. व आपली तैनाती फौज ठेवून दिली. आणि आतां इंग्रजांचें सारे लक्ष ' मराठा कॉन्फिडरसी' कडे लागले. मराठी राज्याचे दुर्दैव याच वेळी आपली संधि साधीत होते.
116 views04:19
ओपन / कमेंट
2021-08-05 08:46:52
101 views05:46
ओपन / कमेंट
2021-08-05 08:46:47 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

५ ऑगस्ट इ.स.१६५२
१२ मावळची सुरूवात जिथून होते त्या रोहीड खोऱ्यातील "खोपडे देशमुख" हे पहिल्यापासून स्वराज्यासाठी ईमाने इतबारे सेवा देणारे घराणे.
पण त्याच"खोपडे देशमुख"घराण्यात नेहमी होणारा भाऊबंदकीचा वाद शिवरायांच्या मध्यस्तीने पूर्णपणे मिटला.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

५ आगस्ट इ.स.१६६८
निराजी, राहुजी आणि सेनापती प्रतापराव गुजर (कुडतोजी) सैन्यासह औरंगाबाद (आत्ताचे छ. संभाजीनगर) येथे पोहोचले.
सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या सैन्याची शहाजाद्याने स्वतंत्र व्यवस्था केली. त्यांस "शिवपुरा असे नाव दिले. युवराज शंभुराजेंच्या नेतृत्वाखाली सरसेनापती प्रतापराव गुजर व आनंदराव युद्ध आघाड्यांवर असत. निराजी, राहुजी आणि सेनापती प्रतापराव गुजर सैन्यांसह औरंगाबाद येथे पोहोचले.



५ आगस्ट इ.स.१६८३
(श्रावण वद्य ८, अष्टमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार रविवार)

औरंगजेब बादशहाकडून रणमस्तखानास "बहादुरखान " हा किताब !
रणमस्तखानास बहादुरखान हा किताब औरंगजेब बादशहाकडून देण्यात आला. या आधी हा किताब

औरंगजेब बादशहाचा दुधभाऊ आणि बहादुरगड बांधणारा बहादुरखान कोकलताश यांच्याकडे होता परंतु त्याच्या मृत्युनंतर हा किताब रणमस्तखानास देण्यात आला.



५ ऑगस्ट इ.स.१६८९
नागपंचमी दिवशी जिंजीच्या दरबारात
संताजीराव घोरपडेंना सरसेनापती पद मिळाले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
113 views05:46
ओपन / कमेंट
2021-08-04 08:03:35
376 views05:03
ओपन / कमेंट
2021-08-04 08:03:30 आपले पदरी आम्हासारिखे असता अगाध काय आहे? प्रतिनिधीकडील वेध चुकलियावरी अंजनवेलीस मोर्चे देतो. गोवळकोट घेतो.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
381 views05:03
ओपन / कमेंट