Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ७ आगस्ट इ.स.१६४८ महाराज | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

७ आगस्ट इ.स.१६४८
महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गडावर रवाना !
किल्ले पुरंदराची अभेद्यता व भव्यता पाहून महाराज बहोत खूष झाले. भविष्यात हा गड फार उपयोगी व महत्वाचा आहे. हे जाणून महाराजांनी अनेक डागडुजी आणि शिबंदीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

७ आगस्ट इ.स.१६८८
स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपले मातब्बर मोहरे पाठविले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी औरंगजेब बादशहाने मुल्तफतखान व त्याच्या बरोबर बरवा बलंदखान, मुल्तफखानाचा भाचा फजलुल्ला, व नागोजी ५ हजारी मनसबदार यांना पाठविले. नुकत्याच जिंकलेल्या सरसगड किल्ल्यावर सय्यद अब्दुल्लाखान याची नेमणूक करण्यात आली. मुल्तफखानाच्या फौजेत महादजी (महादजी निंबाळकर) यांचे ४०० स्वार तैनात करण्याचा हुकुम झाला.



७ ऑगस्ट इ.स.१७९०
पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेत मराठ्यांचा जम बसवण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली ती सरदार महादजी शिंदे यांनी. दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने महादजींनी आपली फौज एकत्र करून दिल्लीवर आक्रमण केले. दिल्ली यावेळी अफगाण व रोहिल्यांच्या ताब्यात होती.महादजींनी दिल्ली ताब्यात घेतली व इंग्रजांच्या आश्रयाला गेलेल्या शहाआलम ला परत आणून त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले.पण महादजींचे हे वर्चस्व बादशहाचे काही सरदार व राजपुताना मानवले नाही,त्यांनी एकत्र येऊन 29 जुलै ला लालसोटच्या लढाईत महादजींचा पराभव केला.यानंतर पानिपतचा सूत्रधार नजीबखानाचा नातू गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांनी बादशहा शहाआलम ला पदच्युत करून त्याचे डोळे काढले व त्याच्या जागी बिदर बख्तला गादीवर बसवले.महादजींनी हार न मानता पुन्हा सैन्य जमवून दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि गुलाम कादरला कैद करून ठार मारले आणि पुन्हा अंध शहाआलम ला गादीवर बसवले.शहाआलम ने खुश होऊन संपूर्ण राज्यात गोवधबंदी जाहीर केली व मथुरा व वृंदावन ही पवित्र स्थळे महादजींना देण्यासंबंधीचे फर्मान काढले.



७ ऑगस्ट इ.स.१९४१
विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन
प्रतिभावंत साहित्यिक , ओजस्वी कवी , प्रखर शिक्षणतज्ञ व सामाजिक भान असलेले विचारवंत रविंद्रनाथ टागोर हे अलौकिक व्यक्तीमत्व होते. वयाच्या ९ व्या वर्षी पाहिली कविता करणाऱ्या टागोरांनी वयाच्या ८० व्या वर्षी एक हजारावी कविता केली. लहानपणापासून टागोरांची शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. चारभिंतीच्या आड शाळा म्हणजे तुरुंग व शिक्षक म्हणजे पोलिस अशा वातावरणात सहज शिक्षण मिळू शकत नाही. या विचारामुळे टागोरांनी कधी औपचारिक शिक्षण घेतले नाही. त्यांना घरी शिक्षणांची सोय त्यांच्या वडीलांनी केली.बंगाली साहित्यातच नाही तर जागतिक साहित्यात रविंद्रनाथ टागोरांनी आपल्या साहित्याचा ठसा उमटवला . टागोरांनी " गीताजंली"नावाचा अजोड ग्रंथ लिहून भारतातील साहित्यातील पहिला नोबाल पुरस्कार मिळवला. गीताजंलीचे इंग्रजीत पुढे भाषांतर झाले. पुढे जगातील अनेकदा भाषांत गीताजंलीचे भाषांतर झाले. गीताजंलीच्या नोबल पुरस्कारांच्या पैशातून रविंद्रनाथ टागोरांनी त्यांनी त्याच्या कल्पनेतील शाळा निर्माण केली तीच " शांतिनिकेतन " होय. निर्सगाच्या सानिध्यात असलेली ही संस्था जगाचा आकर्षणाचा विषय ठरली.जन गण मन......सारखे राष्ट्रीय गीत लिहून टागोरांनी तमाम भारतीयांना एकत्र जोडले. टागोर यांचे संपूर्ण साहित्य हा ज्ञानाचा भंडार होता. पु.ल. देशपांडे यांनी टागोरांचे साहित्य वाचण्यासाठी खास बंगाली भाषा शिकले.टागोर यांचे बरेचसे साहित्य हे जरी बंगालीमधील असले तरी साहित्यिकाला प्रांताच्या सीमा नसतात. हे त्यांच्या विविध साहित्यांतून समजते.टागोर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानत असे. शिवरायांवर टागोरांनी खंडकाव्य रचले. स्वदेशी व बहिष्कार चळवळीबाबत त्यांची मतभिन्नता होती. १९१९ मध्ये जालियनवाला बागहत्याकांडाचा टागोरांनी निषेध करुन आपली "सर "ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली. महात्मा गांधी व डॉ.आंबेडकरांच्या पुणे कराराबाबत सहकार्य टागोरांनी केले.

परमेश्वर म्हणजे काय ? या विषयाची फोड करताना टागोर म्हणतात , आपले अपूर्णत्व असह्य झाल्यामुळे मनात आणि जीवनात आकारास येणारी परिपूर्णतेची प्रतिमा म्हणजेच परमेश्वर होय. देव खडी फोडणा-यांच्या घामात आहे. श्रमिकांच्या कामात आहे. शेतकऱ्यांच्या सावलीत आहे. यावरुन टागोरांच्या विचारांची प्रग्लभता सहज लक्षात येते. विषय ठरली.जन गण मन......सारखे राष्ट्रीय गीत लिहून टागोरांनी तमाम भारतीयांना एकत्र जोडले. अशा या अलौकिक साहित्यांचा मृत्यू ७ आॕगस्ट १९४१ मध्ये झाला.