Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 170

2021-07-21 20:33:08 शेवटी अंतर तेवढचं राहीलं !



लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं... आपण ही खावं..., ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं...

मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली...

शेवटी अंतर तेवढच राहीलं



लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे...
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले... सुती कपडे महाग झाले.

शेवटी अंतर तेवढच राह्यलं



लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,... शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची...
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले...

शेवटी अंतर तेवढच राह्यलं



लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो... वाटायचं आपणही प्यावा पण ?

आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.

शेवटी अंतर तेवढच राह्यलं



लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत...

शेवटी अंतर तेवढंच राहीलं



लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं...
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावल्या

शेवटी अंतर सारखच राहतं...



लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट / विपशना ) मध्ये राहतात तेंव्हा

शेवटी अंतर सारखंच राहतं...



_आता कळलं...हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही..._

म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हंटले होते ,

ठेविले अनंते तैसेचि राहावे,
चित्ती असू द्यावे समाधान ...



शुभ रात्री
427 viewsKailas Bobade, 17:33
ओपन / कमेंट
2021-07-21 18:58:22
आयुष्य भेटलेच आहे तर काहीतरी करून दाखवा....
आज वेळ खराब आहे म्हणून काय झालं एक दिवस वाईट वेळेलाही बदलून दाखवा..

PC : माऊली घुगे
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
431 viewsKailas Bobade, 15:58
ओपन / कमेंट
2021-07-21 18:55:46
खुप दूरवर पहाण्याच्या नादात , चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं...

-----------------------------------------
@vijaykumbhar0_9
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
435 viewsKailas Bobade, 15:55
ओपन / कमेंट
2021-07-21 18:54:33
अडकलेलं नेहमी गुंतत
आणि गुंतलेलं कधी तरी तुटत
म्हणून सैल ठेवा,
आपोआप उलगडत जातं
मग ते वस्तू असो की नाते....

तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
430 viewsKailas Bobade, 15:54
ओपन / कमेंट
2021-07-21 18:53:49
आयुष्याच्या प्रवासाचा आनंद घेण जमलं की, मुक्कामाची फिकीर नसते..
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
430 viewsKailas Bobade, 15:53
ओपन / कमेंट
2021-07-21 02:26:57
कधि कधि प्रवाहाविरुद्ध जाण्याचे
धैर्य दाखविले पाहिजे

पिहू जोंधळे
औंढा ना . हिंगोली
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
539 viewsKailas Bobade, 23:26
ओपन / कमेंट
2021-07-21 02:25:21
यशजवळ पोहचण्यासाठी कधीच शॉर्टकट नसतो....
त्याच्या जवळ पोहचण्यासाठी मेहनती नावाच्या पायऱ्या ओलांडूनच जाव्या लागतात.. !
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
531 viewsKailas Bobade, 23:25
ओपन / कमेंट
2021-07-21 02:23:30
आज लढाल तर उद्याचं यश तुमच असेल,
आज फक्त बघत बसाल तर उद्याचं स्वप्न
फक्त स्वप्नच असेल.....!!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
498 viewsKailas Bobade, edited  23:23
ओपन / कमेंट