Get Mystery Box with random crypto!

MPSC History

टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History
चैनल का पता: @mpschistory
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 146.40K
चैनल से विवरण

Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat
@MahaTalathi

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 367

2021-02-04 16:10:39 स्तूप

सन १९२७ मध्ये पुण्यातल्या प्रार्थना समाजाच्या आवारात, पुणे प्रार्थना समाजाचे अनेक वर्षे अध्यक्ष असलेले सर  रामकृष्ण गोपाळ भांडारकर  यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक दगडी स्तूप उभारण्यात आला. पुण्यातील ही वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहे.

11.3K viewsedited  13:10
ओपन / कमेंट
2021-02-04 16:08:54 प्रार्थना समाजाचे सभासद असलेली मान्यवर

सरोजिनी कराडे

विकास काटदरे

ग.ल. चंदावरकर

न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर

मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर

वासुदेव बाबाजी नवरंगे

सदाशिव पांडुरंग पंडित

मामा परमानंद

अभय पारसनीस

प्राच्यविद्यापंडित सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर

वामन आबाजी मोडक

सिद्धार्थ राजाध्यक्ष

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

डॉ. सुनीलकुमार लवाटे

बाळ मंगेश वागळे

7.5K viewsedited  13:08
ओपन / कमेंट
2021-02-04 16:06:54 प्रार्थना समाज 

या संस्थेची स्थापना डॉ. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग  या तर्खडकर बंधूंनी दिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी मुंबईत केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे.

 मुंबईतले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात वल्लभभाई पटेल रोड (जुने नाव सॅंडहर्स्ट रोड) आणि विठ्ठलभाई पटेल रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रार्थना समाजाला एकेश्वर उपासक मंडळी असंही म्हटले जात होते.

परमहंस सभेचे प्रकट रूप असलेल्या प्रार्थना समाजाचे स्वरूप हे बंगालमधील ब्राह्मो समाजाची मिळतेजुळते असले तरी ब्राह्मो समाजाचा अनुभव महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन महादेव गोविंद रानडे आणि रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उपासना पद्धती निश्‍चित केली होती.

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे मत मांडणाऱ्या रानडे यांच्या विचारांचा प्रभाव प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांवर होता. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी सन १८७६मध्ये मुंबईतील चाळवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली या शाळेत सर्व जाती जमातीच्या मुलांना प्रवेश देण्यात आला.

विद्यार्थी वर्गात पोस्टमन, मोटर ड्रायव्हर, गिरणी कामगार, कारखान्यात काम करणारे कामगार, हमाल अशा समाजातील सर्व स्तरातील लोकांना समावेश होता. विद्यार्थिवर्गासाठी 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू केली.

प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते उमाया लालशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केले. सन १८७८मध्ये पंढरपूर येथे अनाथआश्रमाची स्थापना केली.

१८७६ ते ७७ या काळात दुष्काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी विविध जनउपयोगी कामे प्रार्थना समाजाने हाती घेतली.

स्त्री शिक्षणाच्या उद्देश समोर ठेवून पुण्यामध्ये १८८८मध्ये महिलांसाठी शाळा प्रार्थना समाजाने सुरू केली. १८८२मध्ये पंडिता रमाबाई यांच्या आर्य महिला समाजाची सुरुवात ही प्रार्थना समाजाच्या आश्रयाने झाली.

प्रार्थना समाजाने या काळात सामाजिक सुधारणा ला गती देताना समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा देवभोळेपणा या गोष्टी समाजातून दूर करण्याचा प्रयत्न केला

7.7K viewsedited  13:06
ओपन / कमेंट
2021-02-04 09:14:37
चौरी चौरा स्मारक : गोरखपूर
11.9K viewsedited  06:14
ओपन / कमेंट
2021-02-04 09:12:55 चौरी चौरा घटना

चौरी चौरा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर शहराजवळचे गाव आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असहकार-आंदोलनादरम्यान इ. स. १९२२मध्ये ह्या गावात आंदोलकांनी पोलिस ठाण्याला लावलेल्या आगीत २२ पोलिस भस्मसात झाले. ह्या घटनेमुळे आंदोलनाला हिंसेचे गालबोट लागल्याने महात्मा गांधींनी आपले असहकार-आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
12.0K viewsedited  06:12
ओपन / कमेंट