Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 13

2023-03-17 07:48:31 या पराभवाचा बदला घेण्यासाठी रॉयल काउंटी डाउन नावाची मोठी बटालियन आली. त्यांनी १७ मार्च १८५८ ला चंदेरीवर तोफांचा मारा केला. अखेर तटबंदीला भगदाड पडले. मर्दनसिंगने पराक्रमाची शर्थ केली; परंतु ब्रिटिशांच्या मोठ्या सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याला बंदी बनवून वृंदावनला पाठविण्यात आले. तेथेच त्याचा अंत झाला. १८६० साली झालेल्या तहानुसार चंदेरी पुन्हा शिंद्यांकडे सोपवण्यात आली. पुढे हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत चंदेरी ग्वाल्हेर संस्थांनचा भाग होता. मर्दनसिंग हा बुंदेलखंडातील सर्वांत शेवटचा राजपूत शासक ठरला.





१७ मार्च, इ.स.१८८४
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म जून २६ इ.स.१८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च इ.स.१८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २ इ.स.१८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
76 views04:48
ओपन / कमेंट
2023-03-17 07:48:31 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१७ मार्च इ.स.१६३६
पइंद्रायणी टौऐ शिलालेख
नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळच्या इंद्राई किल्ल्यावरच्या प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला कातळावर हा नऊ ओळींचा शिलालेख कोरला आहे. हा शिलालेख फारसी भाषेत आहे. मला फारसी वाचता येत नाही पण हा शिलालेख मोघल सरदार अल्लाहवर्दीखान याने कोरविला असून त्याने या शिलालेखात त्याने जिंकलेल्या किल्ल्यांची नावं कोरलेली आहेत. सन १६३६ मध्ये निजामशहाच्या वतीने इंद्राई किल्ल्याचा किल्लेदार गंभीरराव हा होता.(राधामाधवविलास चम्पू व पर्णालपर्वत ग्रहणाख्यान ह्या प्रसिद्ध ग्रंथांचा कर्ता जयराम पिण्डे ह्याचा हा गंभीरराव बाप.) त्यावेळी मोघल सरदार अल्लाहवर्दी खान हा इंद्राईवर चालून आला. तेव्हा गंभीररावाने मोगलांशी वाटाघाटी करून हा किल्ला १७ मार्च १६३६ रोजी मोगलांच्या ताब्यात दिला. मग अल्लावर्दी खानाने सरकारी खजिन्यातून ५० हजारांची रक्कम गंभीररावास बक्षीस म्हणून दिली. तेव्हाच त्याने हा शिलालेख निर्माण केला असावा.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१७ मार्च इ.स.१६६७
(चैत्र शुद्ध त्रृतीया, शके १५८९, संवत्सर प्लवंग, वार रविवार)

नेताजी काका पालकर ह्यांना काबूल प्रांती रवाना करण्यात आले!
( महमंद कुलीखान (नेतोजीराव) काबुल प्रांती!) औररजेबाने नेतोजीरावांना ५ हजारी स्वारांची मनसब देऊन काबूल प्रांती रवाना केले. महाराजांनी आग्रा येथून औरंगजेबाला तुरी दिल्या. मात्र तो राग त्याने प्रतिशिवाजी असलेल्या नेतोजी पालकरांवर काढला. त्यांचा आतोनात छळ केल्यामुळे नेतोजीरावांनी धर्म बदलला. महमंद कुलीखान हे नाव धारण करून ते जगत होते.



१७ मार्च इ.स.१६८३
(फाल्गुन वद्य चतुर्दशी, शके १६०४, संवत्सर, दुदुंभी, वार शनिवार)

सरसेनापती हंबीरराव मोहिते कल्याण-भिवंडीकडे!
सरसेनापती हंबीरराव मोहिते २० हजार स्वार व १० हजार पायदळ घेऊन मोगलांचा सामना करण्यास कल्याण भिवंडीस उतरले बहादुरखानाच्या सेनेतील पद्मसिंह रतन राठोडचा मुलगा रामसिंह हे सगळे रजपूत सरदार हंबीररावांचा सामना करण्यासाठी हंबीररावांवर चाल करून गेले. स्वतः हंबीरराव मैदानात असल्याने मराठ्यांची समशेर तळपत होती. पद्मसिंह मारला गेला, आजारी असूनही लढत असलेला रतन राठोडचा मुलगा रामसिंह पण फार वेळ टिकू शकला नाही. माणकोजी हरिसिंह हे सरदार मराठ्यांच्या झंझावातापुढे टिकू शकले नाहीत. तुंबळ युद्ध झाले. मात्र मराठा झंझावाता मुळे आणि समशेर बहादुर रणराज हंबीररावांच्या पुढे निभाव न लागल्याने बहादुरखान २ पावले मागे सरकला.



१७ मार्च इ.स.१६८९
मातब्बरखानाला औरंगजेबाने माहुलीवर चालून जाण्याचे आदेश दिले. मोगल ठाणेदारांकडून पुरेसे सैन्यबळ संघटित केल्यानंतर तो नाशिकहून निघाला. बिरवड्याच्या चार मैल ईशान्येकडे असणारा काष्टीघाट उतरून १७ मार्चला तो खर्डी येथे आला. खर्डी माहुलीच्या ईशान्येस ९ मैलांवर आहे.



१७ मार्च इ.स.१८८४
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म जून २६ , इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २ , इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

दोन

१७ मार्च इ.स.१८१८
इंग्रजांनी इ.स.१८१७ च्या नोव्हेंबरमध्ये विसापूर व लोहगड हे किल्ले ताब्यात घेतले; भोरकडील घाटांच्या खिंडी हालचालींच्या दृष्टीने निष्प्रतिबंध केल्या व कुवारीचा किल्ला कबजात घेऊन मावळांतील सर्व मार्ग आणि घाटचौक्यांवर आपली सत्ता दृढ केली. मग १७ मार्च १८१८ रोजी लेफ्टनंट कर्नल प्रॉथर याने कोकणातील सर्व मजबूत किल्ले हल्ला करून घेण्याचे ठरविले.



१७ मार्च इ.स.१८५८
चंदेरी किल्ला मुघलांच्या ताब्यात
मर्दनसिंग हा ९ वर्षे वयाचा चंदेरीचा युवराज राजपुतांना पुन्हा गौरव मिळवून देण्याची स्वप्ने पाहत होता. १८४४ साली जनकोजी शिंदेंच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर संस्थान आणि ब्रिटिश यांच्यात बेबनाव झाला. तेव्हा मर्दनसिंगने चंदेरीवर ताबा मिळविला. १८५७ साली त्याने स्वतःला स्वातंत्र्ययुद्धात झोकून दिले. राणी लक्ष्मीबाईसोबत हात मिळवून त्याने ब्रिटिशांना जेरीस आणले. ब्रिटिशांनी कसाबसा चंदेरीवर ताबा मिळविला. पण मर्दनसिंगच्या हल्ल्यामुळे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली.
60 views04:48
ओपन / कमेंट
2023-03-16 16:28:51
131 views13:28
ओपन / कमेंट
2023-03-16 16:27:59 १६ मार्च इ.स.१६९३
शुर सुभेदार मल्हारराव होळकर जयंती
(मृत्यू २० मे १७६६)
हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.



१६ मार्च इ.स.१७७२
मराठ्यांनी पथ्थरगड जिंकला
इ सन १७६९ नंतर उत्तरेकडील जाट,रोहिले ,पठाण हे वरचेवर प्रबल होत होते. त्यानी बळकावलेला प्रदेश पुन्हा मिळवण्यासाठी रामचंद्र गणेश कानडे या मराठा सरदाराच्या हाताखाली उत्तरेकडे मराठा फौज रवाना केली. त्यात विसाजी कृष्ण बिनीवाले यांची करभारी म्हणुन नेमणुक केली. तिकडे शिंदे होळकरांची प्रत्येकी १५००० ची फौज होती.या कानडे यांच्या यावेळच्या फौजेत गोविंदरावांचे पथक होते. झाबेताखान शुक्रतालच्या किल्ल्यावरून पळून पथ्थरगडावर आला, मराठा सैन्य या किल्ल्यास वेढा देऊन बसले या वेढ्यात गोविंदराव बाबर, सुलतानजी बाबर व गंगाजी बाबर यांचे पथक होते. या वेढ्यातील खास चौकी ची महत्वाची जबाबदारी गोविंदराव बाबर यांच्याकडे होती. मराठ्यांनी १६ मार्च १७७२ रोजी पथ्थरगड जिंकला. या समयी मराठा सैन्यानी या गडावरील नजिबाची संपत्ती तर घेतलीच,परंतु पानिपतावरुन शत्रुने पळवुन नेलेल्या मराठ्यांच्या काही बायकांची सुटका केली.यात बाबर घराण्याचे महत्वाचे योगदान आहे. या मराठ्यांच्या पराक्रमाच्या खबरा जेंव्हा पुण्यात माधवरावांना मिळाल्या तेंव्हा त्यांनी विसाजी पुण्यात आल्यावर त्यांचा सुवर्णपुष्पे उधळून सन्मान करण्याचा लेखी आदेश दिला.



१६ मार्च इ.स.१७८७
१६ मार्च १७८७ रोजी डीग सोडून महादजी स्वतः जयपुरावर
चालून गेले. हेतु हा की, रजपुतांवर मराठ्यांचा वचक कायमचा बसवावा म्हणजे इतर शत्रू देखील
बळावणार नाहीत.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
126 views13:27
ओपन / कमेंट
2023-03-16 16:27:59 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१६ मार्च इ.स.१५९९
स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे यांचा जन्म!
राजे शहाजीराजे यांच्या जन्मतारखांमध्ये इतिहासकारांत मतभेद आहेत. काही इतिहासकारांच्या मते १५ मार्च इ.स.१५९४, रोजी झाला. तर काही इतिहासकार म्हणतात १८ मार्च इ.स.१५९४, रोजी झाला. जन्म तारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपुर येथील उपलब्ध जन्म पत्रिकेतील तारीख १६ मार्च इ.स.१५९९ रोजीची आहे, त्यामुळे हीच ग्राह्य धरतात. "इतिहासाचे भीष्माचार्य गुरुवर्य वासुदेव सिताराम बेंद्रे सर यांनी ४१ वर्षे अभ्यास करून ही तारीख निश्चित केली आहे." "गजानन भास्कर मेहेंदळे सर यांनीही हीच तारीख श्री राजा शिवछत्रपती खंड १ यात नमूद केली आहे." राजे शहाजीराजे यांचा जन्म १६ मार्च इ.स.१५९९ रोजी झाला. शरीफजीराजे त्यानंतर २ वर्षांनी झाले. राजे मालोजीराजे यांच्या देवाज्ञानंतर त्यांचा मोकासा निजामशहाने त्यांच्या मुलांना म्हणजे राजे शहाजीराजे व शरीफजीराजे यांना दिला. राजे मालोजीराजे यांच्या पश्चात विठोजीराजे यांनी मुलांचे संगोपन केले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१६ मार्च इ.स.१६७३
(चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार रविवार)

किल्ले पन्हाळा पुन्हा स्वराज्यात दाखल!
तब्बल १२ वर्षांनी किल्ले पन्हाळा पुन्हा स्वराज्यात दाखल झाला. पन्हाळा स्वराज्यात नसल्याचा सल महाराजांना होताच मात्र कामगिरी कोणास सांगावी हा प्रश्न होता कारण महाराजांच्या शब्दाखातर जीवाचे बलिदान करावयास मराठी मावळे घाबरत नव्हते. आणि नाव आले कोंडाजी फर्जंद! कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगड १२, बारा वर्षांनी स्वराज्यात जोडला तोही अवघ्या ६०, साठ मावळ्यांसह सुलतानढवा करून! रात्रीच्या किर्र काळोखात अवघ्या ६०, साठ मावळ्यांसह किल्लेदार कोंडाजी फर्जंद याने हा गड घेतला. गडाचा किल्लेदार कोंडाजी फर्जंद याने मारला. अन् मग या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.



१६ मार्च इ.स.१६८६
(चैत्र शुद्ध द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार मंगळवार)

छत्रपती संभाजी महाराजांचे धार्मिक पुरोगामी धोरण!
धर्मांतराबाबत महाराजांचे धोरण फारच पुरोगामी होते!
महाराज जातपात, जातीय भेदाभेद मानत नसत. मोगलांकडे जाऊन बादशाही क्रृपेने मोहम्मंद कुलीखान बनलेल्या नेतोजी पालकरांना पश्चात्तापदग्ध झाल्यानंतर महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात घेतले होते. धर्मांतराबाबत आपल्या पित्याच्या पुरोगामी धोरणाचाच छत्रपती संभाजी महाराजांनी अंगीकार केला व पुरस्कार केला. इ.स.१६८०-१६८१ मध्ये औरंगाबादेच्या हरसुल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी याने ५ वर्षे इमाने इतबारे मोगलांची चाकरी केली त्या प्रामाणिक क्रृपेचे फळ म्हणून औरंगजेबाने त्यांना सक्तीने मनाविरुद्ध इस्लामची दिक्षा दिली. ही गोष्ट स्वाभिमानी व जाज्वल्य हिंदु धर्मातील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या जिव्हारी लागली. धर्मांतरीत केल्यापासून तो धर्मांतराच्या अग्नीजाळात होरपळत होते. इतके की, अन्नग्रहणही त्याने बंद केले. मोठ्या प्रयासाने छावणीतून त्याने शिताफीने पलायन करुन इ.स.१६८५म ध्ये थेट मराठ्यांचे तीर्थक्षेत्र किल्ले रायगड गाठले व छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्तीने बाटलेल्या गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांना अत्यंत मायेने जवळ घेऊन कवी कलश यांच्या मदतीने त्यांस परत यथासांग विधी करून हिंदु धर्मात घेतले!



१६ मार्च इ.स.१६८६
(चैत्र शुद्ध द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार मंगळवार)

मादण्णापंतांचा व आकण्णापंतांचा निर्घृण खून!
‌छत्रपती संभाजी महाराजांच्या वर निर्णायक विजय मिळविता येत नाही हे पाहून औरंगजेब बिथरला होता. त्याला कळून चुकले होते की, जग आता आपल्याला हसेल. मराठा साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेऊन आलेल्या औरंगजेबाने अदिलशाही संपविल्यावर निजामशाहीकडे दौरा वळवला. त्याला सलत होते ते मादण्णापंत व आकण्णापंत हे बंधू कुतुबशाहीचा सर्व डोलारा या दोघांनीच सावरून धरला होता. कारण कुतुबशहा हा सुखलोलूप होता. सदैव विलासात दंग. मात्र मादण्णापंत व आकण्णापंत यांनी कुतुबशाहीची मान सदैव उंच ठेवली होती. दक्षिण दिग्विजयात महाराजांनी आधी भेट मादण्णापंतांचीच घेतली. इतका दाट स्नेह की, मादण्णापंत व आकण्णापंतांच्या आई आक्कम्माबाईसाहेबांनी महाराजांना जेवण करून घातले. मात्र हेच मादण्णापंत व आकण्णापंत बंधू औरंगजेबाच्या डोळ्यात सलू लागला. औरंगजेबाने फितुरीचे अस्त्र बाहेर काढले. कुतुबशाहीच्या सरोमा बेगमने आपल्या खोजा नोकरांच्या हस्ते मादण्णापंत व आकण्णापंत यांचे निर्घृण खून करवले.



117 views13:27
ओपन / कमेंट
2023-03-15 13:40:13
199 views10:40
ओपन / कमेंट
2023-03-15 13:39:24 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
177 views10:39
ओपन / कमेंट
2023-03-15 13:39:24 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१५ मार्च इ.स.१६६५
(शुद्ध नवमी, शके १५८७, विश्वावसू, वार बुधवार)

मिर्झाराजे जयसिंग पुण्याहून लोणी काळभोर येथे दाखल!
जयसिंग व दिलेरखान यांनी ठरविल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक १५ मार्च १६६५ रोजी निघाले. बरोबर अफाट फौज, तोफखाना व सामान, सरंजाम होता. ते राजेवाडीच्या जवळपास दिनांक ३० मार्चला पोचले. तेथून जयसिंगाने दिलेरखानास सासवडला रवाना केले. सासवड मुक्कामी त्याजवर मराठी फौजेचा अचानक छापा पडला. गडबड उडाली पण खान आपली फौज घेऊन दौडत सुटला. त्याने पुरंदरचा पायथा गाठला व गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला (३१ मार्च १६६५) जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१५ मार्च इ.स.१६७०
माहुली गडावर मनोहरदासने छत्रपती शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली .



१५ मार्च इ.स.१६८०
(फाल्गुन वद्य दशमी, शके १६०१, सिद्धार्थी, वार सोमवार)

युवराज राजाराम महाराजांचे विवाह!
७ मार्च इ.स.१६८० युवराज राजाराम महाराज यांची मुंज उरकली. आणि लगेच युवराज राजाराम महाराजांचे विवाह महापराक्रमी सरनौबत के. प्रतापराव गुजर (कुडतोजी गुजर) यांच्या कन्नेशी, म्हणजेच जानकीबाई साहेबांशी विवाह सोहळा पार पडला. परंतु या सोहळ्यावर एक विषण्य छाया पडलेली होती. युवराज शंभुराजे अर्थात युवराज राजाराम महाराजांचे ज्येष्ठ बंधू या सोहळ्यास उपस्थित नव्हते.



१५ मार्च इ.स.१७१९
छत्रपती शाहुंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.



१५ मार्च इ.स.१७६०
सदाशिवराव भाऊनीच उत्तर हिंदुस्थानात स्वारीस जावे असे पेशवे मंडळात ठरल्यावर भाऊ पडदूराहून १४ मार्च रोजी निघाले व १५ मार्च
रोजी शिंदखेडास येऊन डेरेदाखल झाले.



१५ मार्च इ.स.१७७९
शपथक्रिया - महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांची
एखाद्या कार्यात दुसऱ्याच्या सोबतीने पुढे जाताना महत्वाचा असतो तो 'विश्वास' . दुसऱ्याच्या मनात काही काळंबेरं असेल तर त्याचा फटका दोघांनाही बसणार,अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी तुळशीपत्र - बेलबंढारा देऊन 'बंधुत्वाची शपथ' घेतली जाई.
१५ मार्च १७७९ रोजीच्या पात्रातला हा उल्लेख पहा,
महादजी लिहतात : सरदारी माझी - फडनवीशी त्याची (नानाची), बंधुत्वाप्रमाणे वर्तन करू, ज्यात सरदारीचे कल्याण ते संधान चालवू, जो अनिष्ट चिंतील त्याचे पारिपत्य करू. आम्ही बेलबंढारा पाठवला आहे. आपण बंधुत्वाविषयी संशय न मानावा. आपण आहा तेथे मी आहे.





१५ मार्च इ.स.१८१७
बाजीरावा (दुसरे) पेशव्यांनी सेनापती बापू गोखलेस त्रिंबकजींचा बंदोबस्त करण्यास सांगितले. गोखले नीरेहून परत आले आणि त्यांनी त्रिंबकजींच्या काहीच हालचाली नीरेच्या काठी नाहीत असे पेशव्यास सांगितले हे वृत्त एल्फिन्स्टनला कळविले गेले तेव्हा एल्फिन्स्टनने बाजीरावांची नीती ओळखली आणि बाजीरावांची भेट घेऊन त्यांस बजाऊन सांगितले की “त्रिंबकजींस आम्ही पकडू पण तुमची त्याजला आतून फूस आहे, ती बंद करा. तसेच तुम्ही फौजा जमवून जी लष्करी तयारी करीत आहात तीही लगेच बंद करा”. त्यावर बाजीरावाने अत्यंत कांगावा केला. मी इग्रज सरकारची मर्जी सांभाळण्यात इतका तत्पर असता मजवर हे नसते कुभांड रचण्यात येत आहे”, अशी त्याने बतावणी केली पण त्याचा परिणाम
एल्फिन्स्टनच्या मनावर न होता त्यान दिनाक १५ मार्च १८१७ रोजी कर्नल स्मिथला सैन्यासह पुण्यावर
चालून जाण्यास सांगितल. तसेच गव्हर्नर जनरलला खलिता पाठवून बाजीरावांविरुद्ध उघडपणे युद्ध
पूकारण्याची परवानगी मागितली. पण पुढे याचे रूपांतर तहात झाले गेले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर
159 views10:39
ओपन / कमेंट
2023-03-14 05:48:55
71 views02:48
ओपन / कमेंट
2023-03-14 05:48:42 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१४ मार्च इ.स.१६४९
छत्रपती शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. छत्रपती शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१४ मार्च इ.स.१६६५
(चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार)

महाराज किल्ले भिवगडावर मुक्कामी!
शेरखानामुळे कारवारचे महाराजांचे संकट टळले. शेरखानाने इंग्रज व इतर व्यापारी यांना समजावून सामुदायिक खंडणी छत्रपती शिवाजी महाराजांना पेश केली. कारवारवरून महाराज सुमारे २५ कि. मी. अंतरावरील भिवगडास जाण्यास निघाले.



१४ मार्च इ.स.१७०७
महाराष्ट्र जिंकण्याची इच्छा अपुरी ठेवूनच औरंगजेब फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे मरण पावला. हि बातमी नुकतीच माळव्याच्या सुभेदारपदी नियुक्ती झालेल्या औरंगजेब पुत्र आज्जमशाह यास समजल्यावर तो ताबडतोब अह्मदनगरला आला व ईदचा मुहूर्त साधून १४ मार्च १७०७ ला त्याने आपणास मोगल सल्तनतीचा बादशाह म्हणून जाहीर केले. मोगलान मधील रिवाजाप्रमाणे, अन्य दावेदार भावंडांचा काटा काढल्याशिवाय निरंकुश राजसत्ता लाभत नसल्याने, आज्जमशहा आपला भाऊ शाहा आलम याचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाला.



१४ मार्च इ.स.१७६०
अब्दालीने अजून काही हालचाली करायच्या आतच त्याला पायबंद घालावा म्हणून नानासाहेबांनी सदाशिवरावांना तसाच निरोप धाडला. यावेळेस सदाशिवरावभाऊ रघुनाथराव आणि विश्वासरावांसह पैठणच्या जवळ पूर्णा नदीच्या काठी पडदूर येथे होते. नानासाहेबांचा तातडीचा खलिता मिळाल्यावर पडदूर येथे सदाशिवरावांनी आपली फौज तयार केली व कोणी कोणते काम करायचे याच्या नेमणुका करून दिल्या. दि. ७ मार्च १७६० रोजी नानासाहेब पेशवे पडदूर येथे पोहोचले. लष्कराची वर्गवारी सुरू होती. उत्तरेत कोणी जावे, कोणी नाही याबाबत खल सुरू होते. शेवटी सदाशिवरावभाऊ, रघुनाथराव, समशेरबहाद्दर आणि खुद्द नानासाहेब पेशवे यांनी उत्तरेत जावे असे ठरले. विश्वासरावांनी पुण्याला जाऊन दख्खन सांभाळावी. परंतु, विश्वासरावांना हे पटले नाही. लढाया आपण माराव्यात व परत विजयश्री खेचून माघारा जावे. आपण माघारी बसून तीर्थरूपांनी युद्धास जावे हे बरे नव्हे. शेवटी मोठ्या मुश्किलीने विश्वासरावांनी सदाशिवरावभाऊ आणि नानासाहेबांचे मन वळवले आणि दि. १४ मार्च १७६० रोजी मराठी फौजांनी पडदूरहून प्रस्थान ठेवले. पडदूरहून नानासाहेब पेशवे पुण्यात परत आले आणि सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वाखालील मराठी फौजा बुऱ्हाणपूरमार्गे हांडियाचा घाट ओलांडून भोपाळ-सिरोंज-नरवरच्या घाटाने ग्वाल्हेर- घौलपूर-मथुरा करत जुलैच्या अखेरीस दिल्लीत पोहोचल्या. दिल्लीत थोडी झटापट झाली. दि. २ ऑगस्ट १७६० या दिवशी दिल्ली काबीज झाली.





१४ मार्च इ.स.१८१८
घणगड आणि कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात
कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
78 views02:48
ओपन / कमेंट