Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष १६ मार्च इ.स.१५९९ स्वरा | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१६ मार्च इ.स.१५९९
स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे यांचा जन्म!
राजे शहाजीराजे यांच्या जन्मतारखांमध्ये इतिहासकारांत मतभेद आहेत. काही इतिहासकारांच्या मते १५ मार्च इ.स.१५९४, रोजी झाला. तर काही इतिहासकार म्हणतात १८ मार्च इ.स.१५९४, रोजी झाला. जन्म तारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपुर येथील उपलब्ध जन्म पत्रिकेतील तारीख १६ मार्च इ.स.१५९९ रोजीची आहे, त्यामुळे हीच ग्राह्य धरतात. "इतिहासाचे भीष्माचार्य गुरुवर्य वासुदेव सिताराम बेंद्रे सर यांनी ४१ वर्षे अभ्यास करून ही तारीख निश्चित केली आहे." "गजानन भास्कर मेहेंदळे सर यांनीही हीच तारीख श्री राजा शिवछत्रपती खंड १ यात नमूद केली आहे." राजे शहाजीराजे यांचा जन्म १६ मार्च इ.स.१५९९ रोजी झाला. शरीफजीराजे त्यानंतर २ वर्षांनी झाले. राजे मालोजीराजे यांच्या देवाज्ञानंतर त्यांचा मोकासा निजामशहाने त्यांच्या मुलांना म्हणजे राजे शहाजीराजे व शरीफजीराजे यांना दिला. राजे मालोजीराजे यांच्या पश्चात विठोजीराजे यांनी मुलांचे संगोपन केले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१६ मार्च इ.स.१६७३
(चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार रविवार)

किल्ले पन्हाळा पुन्हा स्वराज्यात दाखल!
तब्बल १२ वर्षांनी किल्ले पन्हाळा पुन्हा स्वराज्यात दाखल झाला. पन्हाळा स्वराज्यात नसल्याचा सल महाराजांना होताच मात्र कामगिरी कोणास सांगावी हा प्रश्न होता कारण महाराजांच्या शब्दाखातर जीवाचे बलिदान करावयास मराठी मावळे घाबरत नव्हते. आणि नाव आले कोंडाजी फर्जंद! कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगड १२, बारा वर्षांनी स्वराज्यात जोडला तोही अवघ्या ६०, साठ मावळ्यांसह सुलतानढवा करून! रात्रीच्या किर्र काळोखात अवघ्या ६०, साठ मावळ्यांसह किल्लेदार कोंडाजी फर्जंद याने हा गड घेतला. गडाचा किल्लेदार कोंडाजी फर्जंद याने मारला. अन् मग या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.



१६ मार्च इ.स.१६८६
(चैत्र शुद्ध द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार मंगळवार)

छत्रपती संभाजी महाराजांचे धार्मिक पुरोगामी धोरण!
धर्मांतराबाबत महाराजांचे धोरण फारच पुरोगामी होते!
महाराज जातपात, जातीय भेदाभेद मानत नसत. मोगलांकडे जाऊन बादशाही क्रृपेने मोहम्मंद कुलीखान बनलेल्या नेतोजी पालकरांना पश्चात्तापदग्ध झाल्यानंतर महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात घेतले होते. धर्मांतराबाबत आपल्या पित्याच्या पुरोगामी धोरणाचाच छत्रपती संभाजी महाराजांनी अंगीकार केला व पुरस्कार केला. इ.स.१६८०-१६८१ मध्ये औरंगाबादेच्या हरसुल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी याने ५ वर्षे इमाने इतबारे मोगलांची चाकरी केली त्या प्रामाणिक क्रृपेचे फळ म्हणून औरंगजेबाने त्यांना सक्तीने मनाविरुद्ध इस्लामची दिक्षा दिली. ही गोष्ट स्वाभिमानी व जाज्वल्य हिंदु धर्मातील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या जिव्हारी लागली. धर्मांतरीत केल्यापासून तो धर्मांतराच्या अग्नीजाळात होरपळत होते. इतके की, अन्नग्रहणही त्याने बंद केले. मोठ्या प्रयासाने छावणीतून त्याने शिताफीने पलायन करुन इ.स.१६८५म ध्ये थेट मराठ्यांचे तीर्थक्षेत्र किल्ले रायगड गाठले व छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्तीने बाटलेल्या गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांना अत्यंत मायेने जवळ घेऊन कवी कलश यांच्या मदतीने त्यांस परत यथासांग विधी करून हिंदु धर्मात घेतले!



१६ मार्च इ.स.१६८६
(चैत्र शुद्ध द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार मंगळवार)

मादण्णापंतांचा व आकण्णापंतांचा निर्घृण खून!
‌छत्रपती संभाजी महाराजांच्या वर निर्णायक विजय मिळविता येत नाही हे पाहून औरंगजेब बिथरला होता. त्याला कळून चुकले होते की, जग आता आपल्याला हसेल. मराठा साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेऊन आलेल्या औरंगजेबाने अदिलशाही संपविल्यावर निजामशाहीकडे दौरा वळवला. त्याला सलत होते ते मादण्णापंत व आकण्णापंत हे बंधू कुतुबशाहीचा सर्व डोलारा या दोघांनीच सावरून धरला होता. कारण कुतुबशहा हा सुखलोलूप होता. सदैव विलासात दंग. मात्र मादण्णापंत व आकण्णापंत यांनी कुतुबशाहीची मान सदैव उंच ठेवली होती. दक्षिण दिग्विजयात महाराजांनी आधी भेट मादण्णापंतांचीच घेतली. इतका दाट स्नेह की, मादण्णापंत व आकण्णापंतांच्या आई आक्कम्माबाईसाहेबांनी महाराजांना जेवण करून घातले. मात्र हेच मादण्णापंत व आकण्णापंत बंधू औरंगजेबाच्या डोळ्यात सलू लागला. औरंगजेबाने फितुरीचे अस्त्र बाहेर काढले. कुतुबशाहीच्या सरोमा बेगमने आपल्या खोजा नोकरांच्या हस्ते मादण्णापंत व आकण्णापंत यांचे निर्घृण खून करवले.