Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 12

2023-03-21 16:45:20 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

२१ मार्च इ.स.१६५७
(चैत्र वद्य द्वितीया, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार शनिवार)

महाराजांनी न्यायदान केले!
गुंजण मावळ्याच्या देशमुखीबद्दल शिलीमकरांमध्ये कलह उत्पन्न झाला होता. शिलीमकरांची भाऊबंदकी फार जुनी होती. चंद्ररावाने मात्र भाऊबंदकीचा फायदा घेत शिलीमकरांना महाराजांच्या पक्षातून फोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र शंभुमहादेवाची व आईसाहेबांची आण घेऊन महाराजांना सत्यता पटवून द्यावी लागली. इतके हे महत्वपूर्ण प्रकरण होते. त्यामुळेच सर्व अधिकारी पुण्यास जमले असताना महाराजांनी शिलीमकर वतनाचा तंटा लालमहालात बसून आई जिजाऊंच्या समवेत सर्व संमतीने सोडविला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link






२१ मार्च इ.स.१६६७
किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील..!
किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून. छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला. सिद्दी आणि हबशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग
आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.



२१ मार्च इ.स.१६७६
मध्यंतरीच्या काळात विजापूर दरबारात अंतर्गत बंडाळी माजली होती. बहलोलखान पठाणाने खवासखानास कैद करून वजिरी बळकाविली व लवकरच त्यास बंकापूर किल्लेदाराकडून ठार मारविले (तारीख १२ जानेवारी १६७६). विजापूर दरबारात पठाणाचा परदेशी पक्ष व सर्जाखानाचा दक्षिणी पक्ष असे दोन तट पडून अंतर्गत बंडाळीस सुरवात झाली. ह्या संधीचा फायदा घेऊन विजापूर जिंकून घेण्यासाठी मोगल सरदार बहादूरखान फौजेनिशी चालून आला. दिनांक २१ मार्च १६७६ रोजी विजापूर नजीक लढाई होऊन बहादूरखानाचा विजापूर सैन्याने पराभव केला व तो सोलापुरास पळून गेला. त्याने तिथे पुन्हा फौजेची जमवाजमव करून विजापूर सैन्यावर चाल केली. तीन दिवस तुंबळ युद्ध झाले. त्यांत बहादूरखानाकडील बरेच सैन्य मारले गेलं. याच वेळी गोवळकोंड्याची फौज बहलोलखानाचे साह्यास आली. तेव्हा बहादूरखानास पराभव पत्करावा लागला.



२१ मार्च इ.स.१६८०
(काही ठिकाणी १९ मार्च अशी तारीख आहे)
छत्रपती शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली. तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते.
या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. छत्रपती शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
ह्यानंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले





२१ मार्च इ.स.१७०२
संताजी पुत्र राणोजी घोरपडे धारातिर्थी
मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९ वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने आपले एका हून एक सरस उमराव पन्हाळ्यावर
रवाना केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत.
किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत. गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत
मिळत असे.
धनाजी जाधवांच्या आणि हिंदुराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते. पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे. या युद्धात राणोजी घोरपडेनवर जबाबदारी होती ती मुघली रसद
मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली. राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात. २१ मार्च १७०२ ला मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे
धारातीर्थी पडले. ताराराणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजीच्या पराक्रमाची याद ठेवून
कापशी सुभा इनाम म्हणून दिला.

161 views13:45
ओपन / कमेंट
2023-03-21 16:44:59
129 views13:44
ओपन / कमेंट
2023-03-21 16:44:52 २० मार्च इ.स.१७३७
दमाजीराव गायकवाड यांचे सरदार रंगोजी व मुमिनखान यांनी अहमदाबाद सर केले. गुजरातचा त्यावेळचा सुभेदार अभयसिंह याने कपटाने पिलाजीराव गायकवाड यांचा खून करवला आणि बडोदा ताब्यात घेतले. शेरखान बाबीला येथे ठाणेदार नेमून अभयसिंह स्वतः तेथे आला. यावर्षी गुजरातेत मोठा दुष्काळ पडला. मुघलांच्या अंतर्गत चढाओढी मुळे दमाजीराव गायकवाड यांना गुजरात मध्ये घुसण्याची संधी मिळाली. मुमिनखानाने दमाजीस गुजरातचे अर्धे वसूल देण्याचेही कबूल केले.
दमाजीरावांनी त्यांचा रंगोजी या नावाच्या सरदारांस मदतीस पाठविले. रंगोजी आणि मुमिनखान या दोघांनी अहमदाबाद अर्धे-अर्धे वाटूनही घेतले. आता गुजरातच्या अर्ध्या भागावर मराठे सत्ता सुरु झाली. मराठे अतिशय प्रबळ झाले.





२० मार्च इ.स.१७५३
मराठ्यांनी श्रीरंगपट्टणची स्वारी पूर्ण करून परत येताना तारीख २० मार्च रोजी होळीहुन्नरचा किल्ला मोर्चे लावून जिंकून घेतला. तिथून निघून धारवाड काबीज केले व तदनंतर कोल्हापूरास येऊन भाऊसाहेबांची भेट
घेतली.



२० मार्च इ.स.१७६०
रोजी पेशवा आणि पोर्तुगीज यांच्यात मैत्रीचा करार!
गोव्याच्या व्हिसेरेईने पेशव्यांच्या बरोबर तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी आपला वकील पाठविला. पुणे दरबाराने त्यांचा चांगला परामर्श केला. ते पुणे दरबाराशी तहाच्या वाटाघाटी करून गोव्यास परतल्यावर, पेशवा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये गोवा शहरी मैत्रीचा करार झाला.



२० मार्च इ.स.१७६१
पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते.



२० मार्च इ.स.१९१०
सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले.
जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना त्यांच्या साथीदारांसह अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
151 views13:44
ओपन / कमेंट
2023-03-21 16:44:52 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

२० मार्च इ.स.१६०२
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात इ. स. १६४६ ते १६८० याकाळात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ह्या कालखंडात शिवरायांना मोगलांशी व विजापूर सुलतानाशी लढावे लागले. महाराष्ट्रात व दक्षिण हिंदुस्तानात पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर युरोपियन राष्ट्रांच्या कंपन्यांनी व्यापाराकरिता ठाणी स्थापन केली होती. शिवपूर्व कालात इ. स. १४९८ साली पोर्तुगीज खलाशी वास्को-डी-गामा हिंदुस्तानात आला त्यानंतर भारताशी व्यापार करण्यासाठी २० मार्च १६०२ रोजी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. डचांनी भारताच्या मलबार किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी वखारी स्थापिल्या.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२० मार्च इ.स.१६८०
(फाल्गुन अमावस्या, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार शनिवार)

मराठा साम्राज्यास ग्रहण!
युवराज राजाराम महाराजांचा विवाह उरकला आणि त्यानंतर फाल्गुनी अमावस्येला सूर्यग्रहण आले. पुष्कळदा निसर्ग भावी घटनांचे सुचन करीत असावा असे वाटते. महाराजांनाही पुढच्या अनिष्ट घटनांची चाहूल लागली होती. राजयोगी पुरुष ते! सर्वत्र विजय पताका फडकत असली तरी कुठे तरी अपुर्णत्वाची बोच महाराजांना लागली होती. त्यांच्या वागण्यातून जाणवत होती. महापराक्रमी सुर्य अस्तास जात होता.



२० मार्च इ.स.१७१९
#तीन_दशकानंतर_मराठ्यांची_राजमाता_येसूबाई कैदेबाहेर पडल्या
मातापुत्र प्रदीर्घ वियोगानंतर एकमेकांस भेटले.
एकेकाळी औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या आपल्या पुत्राचे राज्य कलेकलेने वर्धिष्णू होत चालल्याचे, मराठ्यांचे निशाण नर्मदापार गेलेले पाहण्याचे भाग्य या येसूबाईंना लाभले.
छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.



२० मार्च इ.स.१७२०
दिल्ली स्वारीनंतर एक नवीनच कटकट उद्भवली. कोल्हापूरकर आणि सातारकरांत वारणेचा तह झाला असला तरी वारणा नदीच्या दोन्ही तीरावर थोरात नावाच्या घराण्यातील पाच बंधूंच्या पाटिलक्या होत्या. हे थोरात दोन्ही पक्षांत पुन्हा भांडणे लावून आपला स्वार्थ साधीत होते. याच सुमारास पडदुल्लाखान नावाचा एक मोंगल सरदार बंडाच्या पवित्र्यात क-हाडजवळच तळ देऊन बसला होता. शाहूमहाराजांनी पडदुल्लाखानास क-हाड
सोडण्यास सांगितले. परंतु, तो काही केल्या ऐकेना. मग शेवटी महाराजांनी पावसाळ्याच्या अखेरीस बाळाजीपंतांना सोबत घेतले व स्वतः पडदुल्लाखानावर चालून गेले. पडदुल्लाखानाचा पराभव झाला. शाहू महाराजांनी इस्लामपूर व क-हाड आपल्या ताब्यात घेतले. बाळाजीपंतांनी पुढे वारणेवर जाऊन सिधोजी थोरातांचे येळवी गावही ताब्यात घेतले. थोरात कोल्हापूराला पळाले. शाहूमहाराज सातारला परत आले आणि तिकडे कोल्हापूरची फौज घेऊन थोरातांनी बत्तीस शिराळे व अष्टी हे सातारकरांचे प्रदेश हस्तगत केले. इस्मामपूरला असलेल्या बाळाजी विश्वनाथांना थोरातांचा हा बंडावा समजला. त्यांनी ताबडतोब जाऊन थोरातांवर हल्ला केला. शेवटी पंचगंगा ओलांडून पन्हाळ्याकडे जात असता सिधोजी थोरात मारले गेले. बाळाजीपंतांनी मागे साताऱ्यास न फिरता संभाजीराजांच्या कोल्हापूरलाच वेढा घातला. संभाजीराजे कोल्हापूरमध्ये नव्हते. परंतु, त्यांना या वेढ्याची बातमी समजताच ते थेट बाळाजीपंतांवर सैन्यासह चालून आले. शेवटी इस्लामपूरजवळच कृष्णा नदीच्या काठावर उरणबाहे या गावाजवळ दि. २० मार्च १७२० रोजी लढाई झाली. यात संभाजीराजांचा पूर्ण पराभव झाला. शेवटी संभाजीराजांना घेऊन बाळाजीपंत सातारला शाहूमहाराजांच्या भेटीकरिता आले. संभाजीराजे शाहूमहाराजांच्या पाया पडले. शाहू महाराजांनीही त्यांना पोटाशी धरले. माफ केले. पुन्हा एकदा सातारा व कोल्हापूर गादीमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले. शाहूमहाराजांनी सातारा दरबारात बाळाजीपंतांचा यथायोग्य सन्मान केला. यानंतर राजमाता येसूबाई साहेबांचे दर्शन घेऊन बाळाजीपंत सासवडला परतले.

187 views13:44
ओपन / कमेंट
2023-03-19 18:32:09
266 views15:32
ओपन / कमेंट
2023-03-19 18:32:04 पेशवे, निजाम, हैदरअल्ली आणि नागपूरकर भोसले हे चार सत्ताधिश जरी इंग्रजांविरुद्ध एकत्र आले तरी इंग्रजांविरुद्ध सबंध हिंदुस्थानात सर्व एतद्देशिय सत्ताधिशांमध्ये एक प्रकारची उद्वेगाची भावना पसरलेली होती. कारण ह्या सर्व सत्ताधिशांबरोबर कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव लबाडी करून त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे कृत्य हेस्टिंग्जने केले होते. अयोध्येचा नबाव, बनारसचा राजा, बंगालचा नबाब इत्यादि सत्ताधाऱ्यांना मांडलिक बनवून त्यांच्या संरक्षणाची हमी घेऊन त्याजकडून कित्येक लाख रुपये नजराण्यादाखल उपटले होते. त्यामुळे हे सर्व सत्ताधिश कफल्लक होऊन देशोधडीस मिळाले. ह्यांनाही इंग्रजांचे जू नको होते. नाना फडणिसास या वैफल्याचा उपयोग इंग्रजांबरोबर लढताना झाला. याचवेळी इंग्रज-फ्रेंचांचे युद्ध चालू असून फ्रेंचांचे माहे बंदर कर्नल ब्रेट वेटच्या हाताखालील ब्रिटिश नाविक काफिल्याने १९ मार्च १७७९ मध्ये काबीज केले. ह्याच बंदरातून हैदरास फ्रेंचांकडून युद्धोपयोगी सामुग्री मिळत असे ती त्यामुळे बंद झाली. त्यामुळे हैदर इंग्रजांचा कट्टर दुष्मन बनला. ही गोष्ट जेव्हा पुण्यातील कारभारी मंडळाच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी हैदराशी चालू असलेले युद्ध बंद करून त्याजला इंग्रजांशी युद्ध पुकारण्यास प्रवृत्त केले. नाना व महादजींनी हैदराशी सलोखा करून त्याजबरोबर संरक्षणात्मक तह इंग्रजांविरुद्ध घडवून आणण्यासाठी वाकबगार व हुशार वकील कृष्णाजी जोशी यास त्याजकडे पाठविले. हैदराशी झालेल्या तहात असे ठरले की, तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील जो मराठी मुलूख हैदराने जिंकला होता तो त्याजकडे रहावा आणि त्याने अर्काट व महमदअल्लीच्या ताब्यातील कर्नाटक हा प्रदेश उध्वस्त करावा. या अटी हैदरास कळविल्या. रास्ते आणि महादजी शिंदे हे मराठ्यांचे दोन सरदार ह्या सलूखाच्या तारणास जामीन राहिले. हा तह होताच पेशवे व म्हैसुरकर यांजमध्ये आज अनेक वर्षे जो युद्ध प्रसंग सुरू होता तो बंद पडून दिनांक २० फेब्रुवारी १७८० रोजी तह होऊन एकोपा झाला. या एकोप्याच्या पायावर एक प्रचंड कारस्थान उभारले गेले.



१९ मार्च इ.स.१७९२
टिपू सुलतान पकडला
टिपू सुलतानाच्या विरुद्धच्या चढाईत पटवर्धन कुटुंबीयांनी जबाबदारीचा मोठाच हिस्सा उचलला. त्यांच्या पैकी तीन संस्थानिक लढाईत उतरले अन वेगवेगळ्या दिशांना दबा धरून बसले.चिंतामणराव मिरजेतचं राहिले, कारण ते मुख्य केंद्र होते. परशुरामभाऊ तासगावला जाऊन राहिले, तर रघुनाथराव नीलकंठ कुरुंदवाडला. एखादी लढाई करून नामोहरम होणाऱ्यांपैकी टिपू सुलतान नव्हता, हे सर्वानाच माहिती होतं पण तो तब्बल दोन वर्ष टिकाव धरेल, याचीही कल्पना कुणी केली नव्हती त्यानं दोन वर्ष या तिन्ही फौजांना चकवलं पण शेवटी १९ मार्च १७९२ रोजी तो पकडला गेला. एक मोठी लढाई परशुरामभाऊ अन चिंतामणराव यांच्या सहाय्याने जिंकली गेली.






YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
275 views15:32
ओपन / कमेंट
2023-03-19 18:32:04 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१९ मार्च इ.स.१६४७
छत्रपती शिवाजी महाराजांनी व आईसाहेब जिजाबाई यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला.

पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची "प्रतिपच्चंद्र" ही राजमुद्रा तसेच अखेरीस "मोर्तब" म्हणजेच समाप्तीमुद्रा आहे. या कसबा गणपतीच्या पुजा-अर्चेची सर्व जबाबदारी वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे असल्याचे समजते. शिवाजीमहाराज म्हणतात गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दिपव्यवस्थेकरीता असे..

https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१९ मार्च इ.स.१६७४
(फाल्गुन वद्य अष्टमी शके १५९५ प्रमादी वार गुरुवार)

शिवराज्ञी काशीबाईसाहेब यांना देवाज्ञा!
महाराजांच्या अष्टराज्ञींपैकी एक काशीबाघसाहेब यांचा रायगडावर मृत्यू झाला. राज्याभिषेकाच्या अगदी तोंडावर काशीबाईसाहेब यांचे निर्वाण महाराजांना चटका लावून गेला. काशीबाईसाहेब जश्या महाराजांच्या जिवनात आल्या तश्या त्या निघुन गेल्या. काशीबाईसाहेब अगदी काही अबोलपणे कायमच्या निघून गेल्या.



१९ मार्च इ.स.१६८०
ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र
अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता.



१९ मार्च इ.स.१६८२
मुक्काम कानोरी येथे शहजादा आज्जमने औरंगजेब बादशहाची भेट घेतली. "१८ फेब्रुवारी इ.स.१६८२, रोजी औरंगजेब बादशहाने बुर्‍हानपुर सोडले." "औरंगजेब बादशहा ३ ते ४ महिने बुर्‍हानपुर येथे आनंदाने राहीला होता.



१९ मार्च इ.स.१७५५
तुळाजी आंग्रे वर स्वारी करण्यापूर्वी इंग्रज व पेशवे यांचा सात कलमी करार झाला (१९ मार्च १७५५). त्यात संयुक्त आरमार इंग्रजांच्या हुकमतीखाली रहावयाचे, इंग्रजांनी समुद्रावरून मोहिम सुरू करावयाची. व जी जहाजे घेण्यात येतील ती इंग्रज व पेशवे यांनी निम्मे निम्मे वाटून घ्यावयाची. आंग्र्यांच्या किल्ल्यात जी लूट मिळेल ती पेशव्यांनी घ्यावयाची. तुळाजी विरुद्धचे पेशव्यांचे आरोप तीन होते- (१) पेशवे हे धनी व आंग्रे त्यांचे नोकर हे नाते तुळाजीने ओळखले नाही; (२) मराठी सत्तेच्या इतर महत्त्वाच्या घटकांशी ते “सौरस्ये वर्तत नसत”, (३) मराठी सत्तेच्या विरुद्ध गोवेकर फिरंग्याची त्याचप्रमाणे मुंबईकर इंग्रजांची त्यांनी मदत मागितली. तुळाजी आंग्रे याजवरील संयुक्त मोहिमेची प्रत्यक्ष सुरूवात दिनांक २६ मार्च १७५५ पासून झाली.



१९ मार्च इ.स.१७७२
आनंदवल्लीहून पुण्यात परत आलेल्या रघुनाथराव पेशव्यांची दि. १९ मार्च १७७२ रोजी नजरकैदेतून सुटका करण्यात आली. त्यापूर्वी कटकारस्थाने करणार नाही, फितुरी करून राज्याचे तुकडे करणार नाही अशा अटी रघुनाथरावांना मान्य कराव्या लागल्या होत्या. परंतु, त्या बदल्यात आपले दत्तक पुत्र अमृतराव यांना सात लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाची जहागीर शिवाय स्वतः रघुनाथरावांना बारा लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाची जहागीर मिळावी, अशी त्यांनी माधवराव पेशव्यांकडे मागणी केली. माधवरावांनीही काकांना जास्त अपमानीत करू नये, म्हणून त्यांच्या मागण्या मान्य केल्या.





१९ मार्च इ.स.१७७९
गायकवाड इंग्रजास सामील झाल्यामुळे इंग्रजांची शक्ति द्विगुणीत झाली. अशा शक्तिशी गुजरातेत लांब ठिकाणी सामना देणे सोपे नव्हते. कारण ह्याच सुमारास खानदेशात गुलजारखानाचे खूळ माजले होते. तो गुलजारखान व दादासाहेबांचा कारकून केसो कृष्ण या उभयतांनी मोठी फौज जमवून दंगा सुरू केला होता. अशा कठीण प्रसंगी नाना फडणिसांची विशाल बुद्धी आणि शहाणपणा उपयोगी आला. नानानी धूर्तपणा दाखवून इंग्रजांविरुद्ध एतद्देशीय सत्ताधिशांची एकजूट घडवून आणिली. ह्या संघात चार सत्ताधिश सामील झाले.
199 views15:32
ओपन / कमेंट
2023-03-18 11:14:58
124 views08:14
ओपन / कमेंट
2023-03-18 11:14:51 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१८ मार्च इ.स.१६७९
( चैत्र वद्य प्रतिपदा, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, मंगळवार )

सरनौबत हंबीरराव मोहिते व मोरोपंत पेशवे यांनी बहाद्दुरबिंडा किल्ला जिंकला!
कर्नाटक मोहिमेवर महाराज असताना सरनौबत हंबीरराव मोहिते व मोरोपंत पेशव्यांनी कोप्पळ जवळील तंगभद्रा नदी काठावरील बहादरपुर किल्ला वर जोरदार हल्ला चढवून तो जिंकून घेतला. यामुळे पन्हाळा प्रांतापासुन जिंजी पर्यंतची सलग भूमी स्वराज्यात दाखल झाली.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१८ मार्च इस.१६८९
१८ मार्च १६८९ रोजी खर्डी गाव सोडून मातबरखान पुढे निघाला. माहुली गडावरून एक हजार घोडेस्वार सैनिक आक्रमण करण्याकरता निघाले असल्याची त्याला वार्ता कळली. मराठे सैनिकांनी अवघड खिंडीचा व ठिकाणांचा आश्रय घेतला होता. हे वृत्त मातबरखानाला समजल्यावर त्याने हाजी अहमद बेग, विक्रम श्रीपत हा जव्हारचा जमीनदार आणि इतर अधिकाऱ्यांना घोडेस्वार, पायदळ आणि बंदुकधारी सैनिकांसह लढण्याकरता रवाना केले. तेव्हा सुमारे तीन तास बंदुका आणि बाणांचे युद्ध झाले. कित्येक मराठे सैनिक मरण पावले, जखमी झाले असे वृत्त मातबरखानाने औरंगजेबास पत्राने कळविले.



१८ मार्च इ.स.१७०४
गोव्याच्या व्हिसेरेईने (दुसरे) छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठवलेल्या पत्राची नोंद!
मराठ्यांच्या राज्य कारभाराविषयी मराठी कागदपत्रांत काही गोष्टी आढळत नाहीत, परंतु त्या पोर्तुगीज व मोगल कागदपत्रांतून आढळून येतात. ऊदाहरनार्थ, महाराणी ताराबाईसाहेब यांनी कोकणच्या प्रदेशापैकी काही प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी श्रीनिवास माधवराव या अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याची दखल घेण्याबद्दल गोव्याच्या व्हिसेरेईस पत्र पाठविले होते. त्या पत्राची नोंद गोव्याच्या व्हिसेरेईने (दुसरे) छत्रपती शिवाजी महाराज यांना दि. १८ मार्च इ.स.१७०४रोजी पाठविलेल्या पत्रांत आढळतो. सदरहू पत्रात सिंधुदुर्ग बंदरात पोर्तुगीज जहाजांवर जो हल्ला झाला त्याला जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याची विनंती (दुसरे) छत्रपती शिवाजी महाराज यांना करण्यात आली.



१८ मार्च इ.स.१७६०
चैत्री पाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेरघर सिंदखेदराजा येथून सदाशीव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले. त्यावेळी ५० हजारांची फौज सोबत होती. शिंदे-होळकर मार्गात मिळणार होते. अहमदशाह अब्दाली याच्या आक्रमणापासून दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण करण्यासाठी मराठे युद्धाला निघाले.



१८ मार्च इ.स.१७७३
इ. स. १८ मार्च १७७३ रोजी रायगड अपाजी हरीच्या (माधवराव पेशवे यांचे सरदार) हाती आला. आपाजी, महाराज छत्रपतींच्या तख्तास मुजरा करण्यास गेला. त्याने नजर म्हणून नख्त पाच रुपये सिंहासनापुढे ठेविले. रुप्याची फुले सिंहासनावर उधळली. या प्रसंगी तख्तास पागोट्यांची झालर लाविली होती. आपाजीने दरबार भरविला; त्याप्रसंगी त्याने एक मोहोर नजर केली. भालदार व चोपदार यांस त्याने १८ रुपये बक्षीस दिले सैन्यांत असलेल्या हंसाजी खैरा यास त्याने रायगडची हवलदारी सांगितली रजा-परवागीच काम त्याचे हातून घ्यावयाचे ठरले. गणेश विश्वनाथ व हंसाजी यांचे नावे दोन मोर्तब तयार झाले.





१८ मार्च इ.स.१९४४
२६ जानेवारी १९४४ ला सुभाषबाबूंनी रंगून येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला. नेताजींची अमरवाणी , "तूम मुझे खून दो - मै तुम्हे आजादी दुंगा !" ही इथूनच प्रगट झाली. १८ मार्च १९४४ या दिवशी १०,००० सैन्यानिशी नेताजींनी मातृभूमीत प्रवेश करून इंफाल, मोरा, कोहिमा या ठिकाणी प्रतिपक्षावर विजय मिळवले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
130 views08:14
ओपन / कमेंट
2023-03-17 07:48:44
67 views04:48
ओपन / कमेंट