Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष २१ मार्च इ.स.१६५७ (चै | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

२१ मार्च इ.स.१६५७
(चैत्र वद्य द्वितीया, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार शनिवार)

महाराजांनी न्यायदान केले!
गुंजण मावळ्याच्या देशमुखीबद्दल शिलीमकरांमध्ये कलह उत्पन्न झाला होता. शिलीमकरांची भाऊबंदकी फार जुनी होती. चंद्ररावाने मात्र भाऊबंदकीचा फायदा घेत शिलीमकरांना महाराजांच्या पक्षातून फोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र शंभुमहादेवाची व आईसाहेबांची आण घेऊन महाराजांना सत्यता पटवून द्यावी लागली. इतके हे महत्वपूर्ण प्रकरण होते. त्यामुळेच सर्व अधिकारी पुण्यास जमले असताना महाराजांनी शिलीमकर वतनाचा तंटा लालमहालात बसून आई जिजाऊंच्या समवेत सर्व संमतीने सोडविला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link






२१ मार्च इ.स.१६६७
किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील..!
किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून. छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला. सिद्दी आणि हबशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग
आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.



२१ मार्च इ.स.१६७६
मध्यंतरीच्या काळात विजापूर दरबारात अंतर्गत बंडाळी माजली होती. बहलोलखान पठाणाने खवासखानास कैद करून वजिरी बळकाविली व लवकरच त्यास बंकापूर किल्लेदाराकडून ठार मारविले (तारीख १२ जानेवारी १६७६). विजापूर दरबारात पठाणाचा परदेशी पक्ष व सर्जाखानाचा दक्षिणी पक्ष असे दोन तट पडून अंतर्गत बंडाळीस सुरवात झाली. ह्या संधीचा फायदा घेऊन विजापूर जिंकून घेण्यासाठी मोगल सरदार बहादूरखान फौजेनिशी चालून आला. दिनांक २१ मार्च १६७६ रोजी विजापूर नजीक लढाई होऊन बहादूरखानाचा विजापूर सैन्याने पराभव केला व तो सोलापुरास पळून गेला. त्याने तिथे पुन्हा फौजेची जमवाजमव करून विजापूर सैन्यावर चाल केली. तीन दिवस तुंबळ युद्ध झाले. त्यांत बहादूरखानाकडील बरेच सैन्य मारले गेलं. याच वेळी गोवळकोंड्याची फौज बहलोलखानाचे साह्यास आली. तेव्हा बहादूरखानास पराभव पत्करावा लागला.



२१ मार्च इ.स.१६८०
(काही ठिकाणी १९ मार्च अशी तारीख आहे)
छत्रपती शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली. तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते.
या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. छत्रपती शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
ह्यानंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले





२१ मार्च इ.स.१७०२
संताजी पुत्र राणोजी घोरपडे धारातिर्थी
मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९ वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने आपले एका हून एक सरस उमराव पन्हाळ्यावर
रवाना केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत.
किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत. गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत
मिळत असे.
धनाजी जाधवांच्या आणि हिंदुराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते. पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे. या युद्धात राणोजी घोरपडेनवर जबाबदारी होती ती मुघली रसद
मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली. राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात. २१ मार्च १७०२ ला मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे
धारातीर्थी पडले. ताराराणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजीच्या पराक्रमाची याद ठेवून
कापशी सुभा इनाम म्हणून दिला.