Get Mystery Box with random crypto!

MPSC Economics

टेलीग्राम चैनल का लोगो mpsceconomics — MPSC Economics M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsceconomics — MPSC Economics
चैनल का पता: @mpsceconomics
श्रेणियाँ: अर्थशास्त्र
भाषा: हिंदी
ग्राहकों: 74.42K
चैनल से विवरण

Here u can get all useful info about economics for competitive exams.
Join us @MPSCEconomics

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 503

2021-02-14 04:59:40 सध्यस्थिती

सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती.

5.7K viewsedited  01:59
ओपन / कमेंट
2021-02-14 04:59:21 महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)

स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना.

5.5K viewsedited  01:59
ओपन / कमेंट
2021-02-14 04:59:00 कार्ये

जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -

जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -
जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.
जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.
अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.
जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.
भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला.

4.7K viewsedited  01:59
ओपन / कमेंट
2021-02-14 04:58:38 योजना

देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली.

4.4K viewsedited  01:58
ओपन / कमेंट
2021-02-14 04:58:17 सुरुवात

1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली.

4.3K viewsedited  01:58
ओपन / कमेंट
2021-02-14 04:58:15 शिफारस

डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली.

4.6K viewsedited  01:58
ओपन / कमेंट
2021-02-14 04:57:35 अग्रणी बँक योजना

14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली.

4.8K viewsedited  01:57
ओपन / कमेंट
2021-02-14 04:22:01 प्रधानमत्री ग्रामसडक योजना अंमलबजावणीमध्ये ओडिशा सर्वोच्च स्थानी

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलबजावणीमध्ये ओडिशा राज्य सवौच्च स्थानावर आहे या योजनेंतर्गत ओडिशा राज्यात मार्च 2018 पर्यंत 3500 किमी अंतराची रस्तेबांधणी पूर्ण केली जाणार असल्याचे 12 जानेवारी 2018 रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या राज्यस्तरीय संमती समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर 582 किमी चे 165 नवीन रस्ते व 36 पुल बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली.

5.0K views01:22
ओपन / कमेंट