Get Mystery Box with random crypto!

'आहार क्रांती’ नामक एका चळवळीला प्रारंभ 12 एप्रिल 2021 रोजी क | MPSC STUDENT™

'आहार क्रांती’ नामक एका चळवळीला प्रारंभ

12 एप्रिल 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘आहार क्रांती’ नामक एका चळवळीला प्रारंभ करण्यात आला.

पौष्टिकदृष्ट्या संतुलित आहाराची आवश्यकता आणि सर्व स्थानिक फळ आणि भाजीपाला यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी हे अभियान आखण्यात आले आहे.

हे विज्ञान भारती (विभा) आणि ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स फोरम (GIST) यांनी सुरू केलेले अभियान आहे.अभियानाचे “उत्तम आहार उत्तम विचार” (‘Good Diet-Good Cognition’) हे ध्येय आहे.

या कार्यक्रमात शिक्षकांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, जे पुढे त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोषक आहाराविषयी संदेश पोहचवतील.

उपासमार आणि त्यासंबंधी मुबलक रोगांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.