Get Mystery Box with random crypto!

'पोषण ज्ञान': पोषण-विषयक माहितीचा डिजिटल कोष आरोग्य आणि पोषण | MPSC STUDENT™

'पोषण ज्ञान': पोषण-विषयक माहितीचा डिजिटल कोष

आरोग्य आणि पोषण विषयक माहिती देणाऱ्या 'पोषण ज्ञान' नामक राष्ट्रीय पातळीवरील डिजिटल कोषाचा नीती आयोगाने प्रारंभ केला. या उपक्रमामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि अशोक विद्यापीठातील सामाजिक व वर्तनात्मक परिवर्तन केंद्र हे भागीदार आहेत.

ठळक बाबी

‘पोषण ज्ञान’ या संकेतस्थळाच्या निर्मितीमुळे जे समाजघटक कुपोषणाला बळी पडू शकतात, उदा- गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, आणि सहा वर्षांखालील वयाची बालके, यांच्यावर भर देऊन, वर्तणूकविषयक सखोल माहिती देऊन हा प्रश्न सोडवता येईल.

डॉ. राकेश सरवल यांच्या मार्गदर्शनांतर्गत, पोषण ज्ञान या माहिती कोषाची संकल्पना विकसित झाली. आरोग्य आणि पोषणाशी संबंधित 14 पैलूंविषयी विविध भाषा, विविध माध्यमे आणि विविध जनसमुदायांसाठी तयार केलेल्या संवादात्मक साहित्यातून हवी ती माहिती शोधून घेण्याची सुविधा यात देण्यात आली आहे.

पोषण ज्ञान नामक या माहिती कोषात 'क्राऊडसोर्सिंग' प्रकारची एक विशिष्ट सुविधा देण्यात आली आहे. यामुळे संकेतस्थळावरील माहितीत भर घालण्याचे योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीला तसे करता येईल आणि नंतर एका समितीद्वारे त्याचे परीक्षण केले जाईल.