Get Mystery Box with random crypto!

ISS कडे ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान पाठविण्यात आले. 9 एप्रिल 20 | MPSC STUDENT™

ISS कडे ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान पाठविण्यात आले.

9 एप्रिल 2021 रोजी कझाकस्तानमधील स्पेसपोर्ट येथून ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) याकडे पाठविण्यात आले.

ठळक बाबी

अंतराळयानाद्वारे 3 जणांना याकडे पाठविण्यात आले आहे. त्यात रशियाचे दोन व्यक्ती आणि अमेरिकेच्या NASA संस्थेचा एक अभियंता यांचा समावेश होता.

हे यान आता 180 दिवसांनी म्हणजेच 13 ऑक्टोबर 2021 रोजी पृथ्वीवर परतणार आहे.

‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयानाचे संचालन रशियाच्या रोसकॉसमॉस या अंतराळ संस्थेकडून केले जात आहे.
व्यक्तींना घेऊन उडणाऱ्या सोयुझ अंतराळयानाचे हे 146 वे उड्डाण आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS)

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर दूर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. आज ISS वर अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.