Get Mystery Box with random crypto!

हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वा | MPSC STUDENT™

हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वाचा काय आहे 'Assassins'

२०१७ साली नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा सावत्र भाऊ किम जोंग नाम याची मेलशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर नर्व एजंटने हत्या केली होती. या प्रकरणाबाबत अमेरिकन सिने दिग्दर्शक आणि डॉक्युमेंट्री मेकर रेयान व्हॉइन यांनी 'असासिन्स' नावाने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे.

ज्यात किम जोंग नामच्या हत्येशी संबंधित गोष्टींची चौकशी करण्यात आली आहे. या डॉक्टुमेंट्रीमध्ये अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले आहेत. कारण रेयान या डॉक्टमेंट्रीमध्ये त्या महिलांनाही दाखवलं आहे ज्या हत्येच्या आरोपात पकडल्या गेल्या होत्या आणि नंतर त्यांची सुटका झाली होती.

किम जोंग नामवर मलेशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर VX नर्व एजंटकडून हल्ला करवण्यात आला होता. काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाली होती. यात दोन महिला इंडोनेशियाची सिती ऐस्याह आणि व्हिएतनामची दोअन थि हुंओंग यांची नावे समोर आली होती.

दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्यांना मलेशिया कायद्यानुसार शिक्षा मिळणार होती. मात्र त्यांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना २०१९ मध्ये सोडण्यात आलं. मुळात दोघींना माहितीच नव्हतं की, त्या काय करत आहेत. कारण दोघींना या गोष्टीचा विश्वास देण्यात आला होता की, दोघी एका टीव्ही शो च्या भाग आहेत.