Get Mystery Box with random crypto!

भारतात मनुष्यबळाची अफाट क्षमता- बिल गेट्स ‘‘भारतामध्ये मनुष् | MPSC STUDENT™

भारतात मनुष्यबळाची अफाट क्षमता- बिल गेट्स

‘‘भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट शक्ती आहे, त्याचा योग्य वापर केला तर अविश्वसनीय अशा गोष्टी आपण घडवू शकतो’’, असे मत बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केले.

करोना साथीने मानव जातीला किती हादरा दिला, असे विचारले असता ते म्हणाले, की करोना साथ हा मोठा धक्काच होता. त्याचा मूल्यमापनात्मक स्पष्ट परिणाम अजून समजलेला नाही, पण मानसिक आरोग्याचे, शैक्षणिक व आर्थिक नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. येत्या दोन ते पाच वर्षांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे आताची हानी ही कायमची आहे अशी निराशा बाळगण्याचे कारण नाही.

पुढील दोन ते पाच वर्षांत पुन्हा करोनासारखी महासाथ येण्याची शक्यता वर्षांत २ टक्के आहे. त्यामुळे अजून दहा वर्षे तरी अशी साथ पुन्हा येणार नाही. औषधे व लशी येत आहेत, त्यामुळे यापुढील काळात दुर्दैवाने अशी साथ आली तरी ती किरकोळ असेल कारण आपली सज्जता मोठी असणार आहे. आताच्या साथीतही आपण ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया यांनी किती तत्परतेने या साथीला प्रतिसाद दिला हे पाहिले आहे. त्यामुळे त्या देशांना कमी फटका बसला. आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा कारण त्यात असमानता आहे.