Get Mystery Box with random crypto!

*पीकविमा योजनेंतर्गत ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ आजपासून* स | कृषिक अँप Krushik app

*पीकविमा योजनेंतर्गत ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ आजपासून*

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 01-Sep-22
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत देशभरात आजपासून (१ सप्टेंबर) ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ हा उपक्रम राबविण्याचे आदेश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात हा उपक्रम ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’, या नावाने राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा ‘पॉलिसी’ घेतली आहे, त्या शेतकऱ्यांना विम्याची पावती घरपोहोच देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, खासदार, आमदार किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना माझी पॉलिसी माझ्या हातात या उपक्रमांतर्गत विम्याची पावती देऊन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात यावा. विम्याची पावती देण्याचे नियोजन दिवसनिहाय करावे. त्यात लोकप्रतिनिधी, विमा कंपन्या, बँका, विकास सोसायटय़ा, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या सहभागाने पीकविमा शाळांचे आयोजन करण्यात यावे. या उपक्रमाची जाहिरात राज्य सरकारने सर्व माध्यमांद्वारे करावी. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आपण कोणत्या पिकाचा, किती क्षेत्राचा विमा काढला आहे, त्यात आपला हप्ता किती, राज्य-केंद्राचा हप्ता किती याची माहिती उपलब्ध करून दिली जावी.
यंदाच्या विमा योजनेवर दृष्टिक्षेप..
खरीप २०२२ हंगामात राज्यात ९६ लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले. खरीप २०२१ मध्ये या अर्जाची संख्या जवळपास ८४ लाख होती. गतवर्षीपेक्षा चालू हंगामात जवळपास १२ लाख जास्त अर्ज प्राप्त झाले. सन २०१६ पासून शेतकऱ्यांना २३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची नुकसानभरपाई विमा योजनेतून देण्यात आली.
‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ हा उपक्रम राज्यात आजपासून गावोगावी राबविण्यात येत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार अमरावती येथे या उपक्रमात सहभागी होणार आहेत. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते विमा पॉलिसींचे वितरण होईल. विमा शाळांचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी, शंकांचे निरसन करण्यात येईल. – विनयकुमार आवटे, मुख्य सांखिक, कृषी विभाग
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en