Get Mystery Box with random crypto!

*आजचा कृषी सल्ला* *कांदा-लसूण* खरीप कांद्याचे उभे पीक नत्र ख | कृषिक अँप Krushik app

*आजचा कृषी सल्ला*
*कांदा-लसूण*
खरीप कांद्याचे उभे पीक
नत्र खताचा पहिला हप्ता १० किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता १० किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-II ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्यावे. नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास, युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
पीक संरक्षण
काळा करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम
जांभळा व तपकिरी करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ मि.लि.
फुलकीडे नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान १ मि.लि.
फवारणीवेळी ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.
*टोमॅटो*
विषाणूजन्य रोगांचे लागवडीनंतरचे व्यवस्थापन
लागवडीवेळी वाफ्यावर आच्छादनासाठी पांढरा, पिवळा, चंदेरी-काळा किंवा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पेपरचा वापर करावा.
विषाणूजन्य रोगांचा प्रसार काही तणे, फुलझाडांमार्फत होत असल्याने टोमॅटो पीक तसेच बांध तणविरहित व स्वच्छ ठेवावेत.
रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे, फळे काढून जाळून नष्ट करावीत.
पांढरी माशी, फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिएकरी ४० ते ५० पिवळे व निळे चिकट सापळे वापरावेत.
लागवडीनंतर दहा दिवसांनी कार्बोफ्युरॉन (३ सीजी) १३ किलो प्रतिएकरी झाडाभोवती गोलाकार पद्धतीने घालून झाकावे व पाणी द्यावे.
पांढरी माशी, मावा, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३० ईसी) २ मि.लि. किंवा सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. अथवा निंबोळी अर्क ५% किंवा अॅझाडीरॅक्टिन (१५०० पीपीएम) ३ मि.लि. किंवा व्हर्टीसिलीयम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा मेटॅरायझीयम ॲनिसोप्ली ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
फळधारणेनंतर जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, गाजर, काकडी, खरबूज, कलिंगड, भुईमूग, बटाटा, उडीद, सोयाबीन, मूग, पपई, कापूस, भोपळा, केळी, बीट, पालक ही टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांची यजमान पिके आहेत. या पिकांत विषाणूजन्य रोगांची लागण झाली असल्यास, अशी रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.
टोमॅटोची शेवटची तोडणी होताच संपूर्ण पीक काढून नष्ट करावे. पीक तसेच काही दिवस राहिल्यास रोगाचा प्रसार किडींद्वारे नव्या टोमॅटो पिकात होऊन प्रादुर्भाव वाढतो.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en