Get Mystery Box with random crypto!

*आजचा कृषी सल्ला* *आंबा* आंबा झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव ख | कृषिक अँप Krushik app

*आजचा कृषी सल्ला*
*आंबा*
आंबा झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडी मुळे यांवर दिसून येण्याची शक्‍यता असते. यासाठी किडीच्या प्रादुर्भावाकडे खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुस्सा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुस्सा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे.
प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी १५ मि.मी. पटाशीच्या साह्याने खोडाची प्रादुर्भाग्रस्त साल काढून तारेच्या हुकाने अळीला बाहेर काढून मारून टाकावे. क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झालेल्या ठिकाणी त्वरित बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाहीत, याची नेहमी काळजी घ्यावी. नियमित बागेची गवत काढून साफसफाई करावी. वाळलेल्या फांद्या कापलेल्या भागावर डांबर लावावे. त्यामुळे तेथून किडीचा संभाव्य प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
*संत्रा-मोसंबी-लिंबू*
कीड नियंत्रण
फळातील रस शोषणारा पतंग - प्रौढ पतंगांना आकर्षित करण्यासाठी २० ग्रॅम मॅलॅथिऑन अधिक २०० ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस प्रति दोन लिटर पाण्यात मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण एखाद्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये ठेवून, त्यावर प्रकाशाची व्यवस्था करावी. असे प्रकाश सापळे बनवून बागेत ठेवावेत. गळालेली फळे गोळा करून मातीत दाबून नष्ट करावे. याशिवाय कडुलिंबाच्या ओल्या पानांमध्ये गोवऱ्या टाकून बगीचामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी धूर करावा.
फळमाशी - नर फळमाशीला आकर्षित करून नष्ट करण्यासाठी सापळा तयार करावा. त्यासाठी ०.५ मि.लि. मिथाईल युजेनॉल अधिक २ मि.लि. मॅलॅथिऑन किंवा २ मि.लि. क्विनालफॉस प्रति लिटर पाण्यात द्रावण बनवावे. हे द्रावण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवून, अशा एकरी १० बाटल्या झाडावर अडकवून ठेवाव्यात. दर ७ दिवसांनी बाटलीतील द्रावण बदलावे.
कोळी - या कीडीचा प्रादुर्भाव दिसताच, डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा प्रोपरगा��ट (२० ईसी) १ मि.लि. किंवा इथिऑन (२० ईसी) २ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
पाने खाणारी अळी – नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (२५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en