Get Mystery Box with random crypto!

कोकणात पाऊस वाढणार; राज्याच्या इतर भागांतही पावसाला पोषक हवामा | कृषिक अँप Krushik app

कोकणात पाऊस वाढणार; राज्याच्या इतर भागांतही पावसाला पोषक हवामान

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 17-Jun-22
पुणे : मॉन्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असतानाच अद्यापही राज्यात पावसाने जोर धरलेला नाही. मॉन्सून दाखल झाल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १७) कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. राज्यातही पावसाला पोषक वातावरण होत आहे. विदर्भात वादळी पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्व हरियाणापासून नागालॅण्डपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. अग्नेय बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर तामिळनाडूजवळ देखील चक्राकार वारे वाहत आहे. रायलसीमापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, ढग जमा होऊ लागले आहेत.
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर आणि गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम, विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.
गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मि.मी.मध्ये ( स्रोत : हवामान विभाग) : कोकण : पालघर २६, अलिबाग ४१, मुरूड २९, तळा २६, रत्नागिरी २६, रामेश्वर ४२
मराठवाडा : किनवट ३६, माहूर ४०, उमरी ३३
विदर्भ : ब्रह्मपूरी ३२, चिमूर २२, सिरोंचा २१, नरखेडा २१, समुद्रपूर २२, वाशीम २०, महागाव २१
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en