Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला हळद आंतरपीक पद्धती हळदीचे पीक २५ टक्के साव | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
हळद
आंतरपीक पद्धती
हळदीचे पीक २५ टक्के सावलीमध्ये चांगले वाढते. तूर, एरंडीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. आंतरपिके घेताना ती हळद पिकापेक्षा उंचीने कमी, तसेच पसाऱ्याने कमी जागा व्यापणारी असावीत. हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळे जमिनीत एका खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. हळद लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरवात होते. हळकुंडे येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी करणे फायदेशीर ठरते. आंतरपिकासाठी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, मेथी, तूर, उडीद, मूग या पिकांची निवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये. कारण मक्‍यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये १५ ते २० टक्के घट येते.
भात
स्वयंचलित यंत्राने भात लागवडीसाठी मॅट टाईप रोपवाटिका
मॅट टाईप रोपवाटिका करताना साधारणपणे १.२ मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. या गादीवाफ्यावर ५० मायक्रॉन जाडीचा प्लॅस्टिक कागद अंथरावा. पाण्याचा निचरा होण्यासाठी त्याला ठिकठिकाणी छिद्रे पाडावीत. २५ मि.मी. रुंदीच्या लोखंडी पट्टीपासून बनवलेली १ x १ मीटर आकाराची चौकट या कागदावर ठेवावी. त्यात १:१:१ या प्रमाणात चांगले चाळून घेतलेले शेणखत, माती व वाळू यांचे मिश्रण भरावे. ते एकसारखे करावे. एका चौकटीसाठी ५०० ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया केलेले व मोड आलेले बियाणे पेरावे. झारीने पाणी शिंपडावे. नंतर पेंढ्याने झाकून घ्यावे. तीन ते चार दिवसांनी पेंढा काढून घ्यावा. ट्रेमध्ये रोपे तयार करण्यासाठी वरीलप्रमाणे माती, खत भरून बी पेरावे. रोपवाटीकेतील रोपांना दररोज आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. १५ दिवसांनी रोपवाटीकेत १ टक्के युरिया-डीएपी खत किंवा १९:१९:१९ पाण्यात मिसळून फवारणी करावी. मॅट टाईप रोपवाटिका तयार होण्यास २२-२६ दिवस लागतात. लावणी करताना रोपे १५ सें.मी. उंच आणि ३ ते ४ पानांची झालेली असावीत.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en