Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला सोयाबीन खत व्यवस्थापन भरखते- शेवटच्या कुळव | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
खत व्यवस्थापन
भरखते- शेवटच्या कुळवणीच्या पाळीपूर्वी एकरी २ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. शेणखतामुळे जमीन चांगली भुसभुशीत राहते. पिकाच्या मुळ्या खोलवर जाऊन पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते.
वरखते- सोयाबीन पिकास प्रति एकरी २० किलो नत्र (४४ किलो युरिया), ३० किलो स्फुरद (१८८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १८ पालाश (३० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) पेरणीच्या वेळी जमिनीत मिसळून किंवा चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावीत. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.
राज्यातील जमिनींमध्ये गंधक, लोह, जस्त व बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. जेथे माती परिक्षण झाले नाही, अशा ठिकाणी दोन ते तीन वर्षांतून एकदा गंधक ८ किलो, झिंक सल्फेट ८ किलो, फेरस सल्फेट ८ ते १० किलो आणि बोरॅक्स २ किलो प्रति एकर पेरणीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते.
कापूस
खत व्यवस्थापन
भरखते- कोरडवाहू कपाशीसाठी २ टन व बागायती कपाशीसाठी ४ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीपूर्वी शेतात मिसळून द्यावे. परिणामी जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
वरखते– कोरडवाहू बीटी कपाशीसाठी पेरणीसोबत रासायनिक खतांची मात्रा १२:१२:१२ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति एकर (म्हणजेच २६ किलो युरिया, ७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १९ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावी. पेरणीनंतर ३० दिवसांनी १२ किलो नत्र प्रति एकर (म्हणजेच २६ किलो युरिया) द्यावा.
बागायती बीटी कपाशीसाठी पेरणीसोबत रासायनिक खताची मात्रा १६:२४:२४ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति एकर (म्हणजेच ३५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ३९ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी १६ किलो नत्र प्रति एकर (म्हणजेच ३५ किलो युरिया) आणि पेरणीनंतर ६० दिवसांनी १६ किलो नत्र प्रति एकर (म्हणजेच ३५ किलो युरिया) द्यावा.
रासायनिक खत मात्रा माती परीक्षणानुसार देणे अधिक योग्य आहे.
माती परीक्षण अहवालानुसार मॅग्नेशिअम, झिंक, बोरॉन यांपैकी ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, ते देण्याचे नियोजन करावे. उदा. आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावयाचे एकरी प्रमाण: मॅग्नेशिअम सल्फेट ८ किलो, झिंक सल्फेट १० किलो व बोरॉन २ किलो. फुले लागणे व बोंडे पक्व होण्याच्या वेळी मॅग्नेशिअम सल्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) प्रमाणे फवारणी करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en