Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला सोयाबीन उगवण क्षमता तपासणी सोयाबीन हे स्वपराग | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
उगवण क्षमता तपासणी
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वाणांचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्‍यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादीत होणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. उगवण क्षमता तपासणी करण्याकरिता गोणपाट किंवा वर्तमानपत्राचा कागद वापरावा. एका ओळीमध्ये १.५ ते २ सें.मी. अंतरावर १० दाणे ठेवावेत. अशा प्रकारे १० ओळींमध्ये एकूण १०० दाणे व्यवस्थित रांगेत ठेवावे. त्यानंतर गोणपाटावर अथवा वर्तमानपत्रावर पाणी टाकून ओले करावेत. ते गोल गुंडाळून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. अधूनमधून त्यावर पाणी शिंपडत राहावे. सहा ते सात दिवसांनंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. जर उगवण झालेल्या बियाण्यांची सरासरी संख्या सत्तर किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे. शिफारशीप्रमाणे ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येईल. उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या सत्तरपेक्षा कमी असेल, तर एकरी बियाण्याचे प्रमाण त्यानुसार वाढवून पेरणी करावी. मात्र, साठ टक्क्यांपेक्षा कमी उगवणशक्ती असणारे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरू नये.
भात
रोपवाटीका व्यवस्थापन
पुनर्लागवड पद्धतीमध्ये उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये रोपवाटिका व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे योग्य रोपवाटिका व्यवस्थापन हे फायदेशीर भात शेतीचे मूळ आहे. खरीप हंगामासाठी भाताची पेरणी १५ मे ते २५ जूनपर्यंत गादीवाफ्यावर करावी. पेरणीकरिता १ ते १.२० मीटर रुंद व ८ ते १० सें.मी. उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत. एक एकर क्षेत्रावरील लागवडीसाठी ४ गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. १ गुंठा वाफ्यास २५० किलो शेणखत किंवा कंपोष्ट खत आणि १ किलो युरीया खत मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति गुंठा १ किलो युरीया खत द्यावे. पावसाच्या अभावी व इतर कारणाने लागवड लांबणीवर पडल्यास प्रति गुंठा क्षेत्रातील रोपास १ किलो युरीयाचा तिसरा हप्ता द्यावा. योग्य पाणी व्यवस्थापन करावे. क��ड व रोग नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en