Get Mystery Box with random crypto!

_*Fast & First - हेडलाईन्स, 30 एप्रिल २०२१*_ [ _*आता न्यूज, | UpToDateMarathi

_*Fast & First - हेडलाईन्स, 30 एप्रिल २०२१*_

[ _*आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर *_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

_*राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच*_
राज्यात बुधवारी पुन्हा एकदा 66,159 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. राज्यात 771 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.

_*पृथ्वी शॉचा पराक्रम*_
दिल्ली कॅपिटल्सचा बॅट्समन पृथ्वी शॉ यानं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध शिवम मावीच्या एकाच ओव्हरमध्ये सलग 6 फोर लगावले. आयपीएल स्पर्धेत एकाच ओव्हरमध्ये 6 फोर लगावणारा पृथ्वी हा अजिंक्य राहणे यांच्यानंतर दुसरा बॅट्समन ठरला आहे.

_*डाळीच्या व्यवहारात फसवणूक*_
लातूर येथील एमआयडीसीतील तीन डाळ मिलकडून डाळीची खरेदी करून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तमिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील चौघांच्या विरोधात येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

_*शिवराज चाकूरकर कोरोना पॉझिटिव्ह*_
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा कहर महाराष्ट्रासह देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

_*शरद पवार यांना धमकी*_
सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केली. तसेच, त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २७ मार्च ते सात एप्रिल दरम्यान घडला आहे.

_*को-व्हॅक्सिनच्या किंमतीत कपात*_
सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने लसीची किंमत कमी केली आहे. भारत बायोटेक राज्यांना प्रति डोस 400 रुपये दराने लस देणार आहे. कंपनीने 200 रुपयांनी लसीचा दर कमी केला आहे.

🏻 _*सचिन तेंडुलकरची १ कोटीची मदत*_
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने ऑक्सिजन उभारणीसाठी १ कोटी रुपयांची मदत केली आहे. मिशन ऑक्सिजन इंडिया मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सचिनने केले आहे.

_*भारताचा मृत्यूदर कमीच*_
देशात कोरोनानं आजवर २ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, भारताचा मृत्यूदर हा जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.

_*तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे 'Fast & First- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा*_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

_*जाहिरातीसाठी संपर्क - 9137463689*_