Get Mystery Box with random crypto!

*Fast & First- हेडलाईन्स, 28 एप्रिल, 2021* [ _*ताज्या बातम् | UpToDateMarathi

*Fast & First- हेडलाईन्स, 28 एप्रिल, 2021*

[ _*ताज्या बातम्या आणि जॉब अपडेट्स मिळवा WhatsApp वर *_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

सिरम इन्स्टिट्यूट कडून कोव्हीशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी; राज्य सरकारला 400 ऐवजी 300 रुपयांना मिळणार लस, अदार पुनावाला यांची ट्विट करत माहिती!

*महाराष्ट्र पोस्ट विभाग - ग्रामीण डाक सेवक पदभरती 2021*

*जागा - 2428,*
*पात्रता - 10 वी,*
*परीक्षा नाही*





भारतामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना कोविड हॉस्पिटल बाबत माहिती देण्याकरता ट्रूकॉलर या ॲप कडून हॉस्पिटलची डिरेक्टरी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू; याद्वारे आपल्या युजर्सना कठीण काळात मदत करण्यासाठी ट्रूकॉलरच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक

'देशात कोरोना वाढत असताना सभा, कुंभमेळा याला परवानगी देत रुग्णसंख्या वाढवली म्हणून पंतप्रधान मोदीच कोरोना सुपरस्प्रेडर'; म्हणत इंडियन मेडिकल असोसीएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांची पंतप्रधानांवर टिका

गोवा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोवा सरकारकडून पुढील 5 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय; उद्या सायंकाळी 5 वाजल्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

'शिष्टाचारी वक्तव्यात वेळ वाया न घालवता उपयुक्त माहितीपूर्ण बैठक', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांसोबत कोरोना बाबत केलेल्या सल्ला मसलतीबाबत आनंद महिंद्रा यांचे सकारात्मक उद्गार!

अभिनेता इरफान ला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल; 'मी लवकरच मरणार' हे होते शेवटचे वाक्य; मुलगा बाबील खान याने सांगितले वडिलांच्या शेवटच्या क्षणांबाबतचे भावूक अनुभव

'बिग बॉस' फेम गायक राहुल वैद्यची लोकप्रियता 'खतरो के खिलाडी' करणार एन्कॅश; सर्वाधिक मानधन देत राहुल वैद्यला स्पर्धक म्हणून केले आमंत्रित, प्रत्येक एपिसोड साठी मिळणार 12-15 लाख

लोकप्रिय मालिका 'लग्नाची वाइफ वेडिंगची बायकू' मधील रील लाईफ जोडी मदन आणि काजोल म्हणजेच विजय आंदळकर आणि रुपाली झंकार लवकरच अडकणार विवाहबंधनात; नुकताच झाला साखरपुडा संपन्न!

संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनेस्को) शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेत सृजनशील संलग्न शहरामध्ये मुंबईचा चित्रपट श्रेणीमध्ये समावेश; मुंबई शहराला “युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म” ही ख्याती प्राप्त!

_*ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन त्यासाठी क्लिक करा*_ https://wa.me/message/QEJ5FHBG3UA2L1

_*जाहिरातीसाठी संपर्क - 9137463689*_