Get Mystery Box with random crypto!

अभ्यास ते अधिकारी™

टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
टेलीग्राम चैनल का लोगो study_officer707 — अभ्यास ते अधिकारी™
चैनल का पता: @study_officer707
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 220
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल
◆ MPSC (राज्यसेवा)
◆ PSI-STI-ASO
◆ Megabharti
◆ Talathi
◆ Gramsevak
◆ all exam related questions, notifications, results..
⚠️ Join - @PoliceBharti_Official
➥ @Tusharshirgire
√ Official

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 166

2021-06-21 06:50:04 केबल टीव्ही नेटवर्कच्या नियमांमध्ये दुरुस्ती.

“केबल टीव्ही नेटवर्क नियम 1994” यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 17 जून 2021 रोजी केंद्रीय सरकारने अधिसूचना जाहीर करून विविध दुरदृष्य वाहिन्यांद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी “केबल टीव्ही नेटवर्क नियम 1995” यामधील तरतुदींनुसार कायदेशीर यंत्रणा उभारायचा निर्णय घेतला.

तसेच, विविध प्रसारकांच्या स्व-नियामक संस्थांची केंद्रीय सरकारकडे नोंदणी करण्याची पद्धत देखील कार्यरत करण्यात आली आहे.

वर्तमानात, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने 900 याहून अधिक वाहिन्यांना परवानगी दिली आहे. या सर्व वाहिन्यांना केबल टीव्ही नेटवर्क नियमामध्ये आखून दिलेली कार्यक्रम आणि जाहिरात यासंबंधी संहिता पाळणे अनिवार्य आहे.

पार्श्वभूमी...

सध्या नागरिकांच्या दुरदृष्य कार्यक्रम अथवा जाहिराती संहिता नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित तक्रारी सोडविण्यासाठी आंतर-मंत्रालयीन समितीच्या स्वरूपातील संस्थात्मक यंत्रणा अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे, तक्रारींचे निवारण करण्यासाठी, विविध प्रसारकांनी त्यांच्या प्रणालीच्या अंतर्गत स्व-नियामक यंत्रणा विकसित केल्या आहेत.

परंतु, तक्रार निवारण संरचना अधिक मजबूत करण्यासाठी कायदेशीर यंत्रणा उभारण्याची गरज भासू लागली होती. काही प्रसारकांनी, त्यांच्या संघटना किंवा संस्थांना कायदेशीर मान्यता देण्याची विनंती केली होती.

तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील “कॉमन कॉज विरुध्द भारत सरकार आणि इतर” या 2000 या वर्षीच्या खटल्यामधील आदेशात तक्रार निवारणासाठीच्या केंद्रीय सरकारच्या विद्यमान यंत्रणेबाबत समाधान व्यक्त करतानाच तक्रार निवारण यंत्रणेला औपचारिक स्वरूप देण्यासाठी योग्य नियमांचा आराखडा तयार करण्याचा सल्ला दिला होता.
5.5K views03:50
ओपन / कमेंट
2021-06-21 06:50:04
3.5K views03:50
ओपन / कमेंट
2021-06-21 06:50:04
भारत सरकारचे "खोल महासागर अभियान”.

अर्थविषयक मंत्रिमंडळाच्या समितीने महासागरात अधिक खोलीपर्यंत उत्खननासाठी आणि सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कार्यक्षम तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून "खोल महासागर अभियान (Deep Ocean Mission)" यासंबंधी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

अभियानाच्या अंतर्गत महत्त्वाच्या सहा घटकांचा विकास केला जाणार आहे; ते पुढीलप्रमाणे आहेत -

समुद्रातील खनिकर्म आणि मानवयुक्त पाणबुडी यांच्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे.

सागरी हवामान बदल सल्लागार सेवांचा विकास.

खोल महासागरातील जैवविविधतेच्या शोध आणि संवर्धनासाठी अभिनव तांत्रिक कल्पना.

खोल महासागरात सर्वेक्षण आणि संशोधन कार्ये.

महासागरापासून ऊर्जा निर्मिती आणि पिण्याजोगे गोड पाणी.

सागरी जैवशास्त्रासाठी आधुनिक स्थानक / केंद्र.
3.4K views03:50
ओपन / कमेंट
2021-06-21 06:49:50 भारत आणि युरोपीय संघ यांची पहिली नौ-कवायत अदेनच्या आखातात झाली.

भारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नेव्हल फोर्स (EU NAVFOR) यांची “IN-EUNAVFOR” संयुक्त नौ-कवायत यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. 18 जून आणि 19 जून 2021 रोजी अदेनच्या आखातात ही कवायत आयोजित करण्यात आली होती.

चार देशांच्या नौदलांच्या एकूण पाच युद्धनौका या सरावात सहभागी झाल्या होत्या. तस्करीरोधी मोहिमांसाठी तैनात असलेले भारतीय नौदलांच्या ‘INS त्रिकांड’ जहाजाचा या सरावात सहभाग होता. तर इतर युद्धनौकांमध्ये इटलीचे ‘ITS काराबिनेरे’, स्पेनचे ‘ESPS नेव्हर्रा’ आणि फ्रान्सचे ‘FS टोनरे’ आणि ‘FS सर्कॉफ’ यांचा समावेश होता.

कवायतीमध्ये विविध मोहिमांचा सराव करण्यात आला. त्यात प्रगत हवाई संरक्षण आणि पाणबुडी-रोधी, युद्धनीती, शोध व बचाव अश्या इतरही सागरी सुरक्षा विषयांचा या समावेश करण्यात आला होता.

त्याचबरोबर ‘इंडियन नेव्ही इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर–इंडियन ओशन रिजन’ (INIFC-IOR) आणि ‘मेरीटाईम सिक्युरिटी सेंटर-हॉर्न ऑफ आफ्रिका’ यांच्यामध्ये 18 जून 2021 रोजी आभासी पद्धतीने “माहिती सामायिकरण सराव” आयोजित करण्यात आला होता.

युरोपीय संघ (EU) विषयी..

युरोपीय संघ (EU) हा मुख्यतः युरोप खंडामध्ये वसलेल्या 28 सदस्य देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे. हा समूह 1 नोव्हेंबर 1993 रोजी स्थापित करण्यात आला. सकल स्थानिक उत्पादन (GDP) संदर्भात युरोपीय संघ ही जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. नॉर्वे युरोपीय संघाचा भाग नाही, मात्र तो युरोपीय आर्थिक क्षेत्राचा भाग आहे.
3.4K views03:49
ओपन / कमेंट
2021-06-21 06:49:50
3.1K views03:49
ओपन / कमेंट
2021-06-17 18:29:51
. प्रसिद्धीपत्रक

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत.

━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐨𝐢𝐧 @Megabharti_Official
4.0K views15:29
ओपन / कमेंट
2021-06-17 18:28:22 आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

अंतिम सामना कोणत्या संघादरम्यान
भारत विरुद्ध न्यूझीलंड

अंतिम सामना : १८ - २२ जुन , २०२१
२३ जून राखीव दिवस ठेवण्यात आला

अंतिम सामना : साउथॅम्प्टन , इंग्लंड
लॉर्डस येथे अंतिम सामना होणार होता

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप बक्षिसे
विजेता (१२ कोटी) व उपविजेता (०६ कोटी)

तिसरे स्थान : ४५०००० डॉलर्स
चौथे स्थान : ३५०००० डॉलर्स
पाचवे स्थान : २००००० डॉलर्स
उर्वरित ४ संघांना : १००००० डॉलर्स

सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघ संयुक्त विजेते
3.9K views15:28
ओपन / कमेंट
2021-06-17 18:28:22 नाशिकच्या कोमल जगदाळे, दिनेशला सुवर्णपदक

नाशिकची धावपटू कोमल जगदाळेने येथे आयोजित राज्य अ‍ॅथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धेत तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले.

याशिवाय नाशिकच्याच दिनेशने १० हजार मीटर धावण्यात सुवर्ण तसेच महिलांच्या ४०० मीटर धावण्यात ताई बामणेने रौप्यपदक मिळविले.

पतियाळा येथे२५ ते २९ जून या कालावधीत ६०वी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहे.

पुढील महिन्यात २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत निवड होण्यासाठी या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ग्रा धरण्यात येणार आहे.

त्यासाठी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची निवड नाशिक येथे आयोजित स्पर्धेतून करण्यात येणार आहे.

पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात निवड चाचणी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी राज्यातून आलेल्या सर्वच खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन के ले.

सध्या करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटना, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेल्या संपूर्ण नियमांचे पालन करून या निवड चाचणीच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले.
3.2K views15:28
ओपन / कमेंट
2021-06-17 18:28:22 भेट दोन महासत्ताधीशांची…

अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची बहुप्रतीक्षित परिषद बुधवारी जिनिव्हामध्ये पार पडली.

आपापल्या देशाच्या राजदूतांना त्या-त्या ठिकाणी पूर्वस्थितीत आणणे, सायबरसुरक्षा, अण्वस्त्र मर्यादेबाबतच्या करारात फेरबदलासाठी वाटाघाटी करण्यावर उभय नेत्यांमध्ये मतैक्य झाले.

या चर्चेत बायडेन यांनी रशियातील विरोधी पक्षाचे नेते अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांचा उल्लेख करत तेथील मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित केला.

मात्र, पुतिन यांनी नवाल्नी यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले.

नवाल्नी यांना देण्यात येत असलेल्या वर्तणुकीबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नांना मात्र त्यांनी बगल दिली.

बायडेन यांनी ‘दोन महासत्तांची शिखर परिषद’ असे या भेटीचे वर्णन केले.
2.6K views15:28
ओपन / कमेंट
2021-06-17 11:42:50 Watch "Fundamental rights मूलभूत हक्क MPSC PSI STI ASO" on YouTube





2.5K views08:42
ओपन / कमेंट