Get Mystery Box with random crypto!

अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची म | MPSC STUDENT™

अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला...


भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.

भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. मात्र भाव्या यांच्यावर अशी महत्वाची जबाबदारी टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अ‍ॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होते.