Get Mystery Box with random crypto!

मराठी साहित्य UPSC

टेलीग्राम चैनल का लोगो marathii — मराठी साहित्य UPSC
टेलीग्राम चैनल का लोगो marathii — मराठी साहित्य UPSC
चैनल का पता: @marathii
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.15K
चैनल से विवरण

Upsc मुख्य परीक्षेला असणाऱ्या मराठी साहित्य या ऐच्छिक विषया संबधी सर्व माहिती, पेपर मधले लेख या चॅनेल वर पोस्ट केले जातील. आपला विवेक पाटील "उमाई"अकॅडमी पुणे ९८२२०७३५९९.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 6

2022-09-18 05:22:44 Section wise Reference books (Read selectively and smartly)

Paper – I

Answers must be written in Marathi.

भाषा आणि लोकसाहित्य (Language and Folk - Lore)

A) Nature and Functions of Language (With reference to Marathi)

Language as a Signifying System:

आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

Langue and Parole:

आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

Basic Function : साहित्य विचार – दत्तात्रेय पुंडे आणि स्नेहल तावरे (स्नेहवर्धन प्रकाशन )

Poetic language; Standard Language and dialect; Linguistic features of Marathi in 13th and 17th Century: प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स (सर्वाधिक सटीक माहिती), राहुल कर्डिले नोट्स, इंटरनेटचा वापर करावा.

Language variations according to social parameters; प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)

B) Dialects of Marathi: -

i) अहिराणी:

१) इंटरनेटवरील विविध लेख,

२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स,

३) अहिराणी मधील साहित्य - उदा. बहिणाबाईंच्या कविता (उत्तरात नेहमी वापरा) (मौलीवूड गाणे)

४) अहिराणी भाषेचा अभ्यास (कोणतेही प्रकाशन चालेल)

ii) वैदर्भी:

१) वैदर्भी भाषेचा अभ्यास (कुठल्याही प्रकाशनाचे बेसिक पुस्तक)

२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.

iii) डांगी

१) ‘डांग्ज’ – लेखक: रणधीर बीट (पद्मगंधा प्रकाशन)

२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.

C) मराठी व्याकरण (महत्वाचे: कोणतीही दोनच पुस्तके वापरा)

Parts of Speech; Case-system; Prayog-vichar (Voice)

मराठी व्याकरण – प्रकाश परब

मराठी व्याकरणाचा अभ्यास – लीला गोविलकर

मो. रा. वाळिंबे

अर्जुनवाडकर

Nature and kinds of Folk-lore (लोकसाहित्य)

(with special reference to Marathi)

लोकगीत, लोककथा, लोकनाट्य

१) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग १ (अति महत्वाचे)

२) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग २ (अति महत्वाचे)

३) रां. चि. ढेरे यांच्या विविध लोकसाहित्यावरील पुस्तकाचा निवडक अभ्यास

४) प्रभाकर मांडे – लोकसाहित्याचा अभ्यास (निवडक)

Section – B

मराठी साहित्याचा इतिहास

१) प्रारंभ ते १८१८ पर्यंत

अ) महानुभाव लेखक – स्थानिक बाजारपेठेतील कोणतेही पुस्तक जे तुम्हाला आवडेल.

आ) वारकरी कवी – इंटरनेट वरून प्रत्येक संताचा अभ्यास करा (उदा. तुकाराम, ज्ञान्नेश्वर, नामदेव, एकनाथ)

इ) पंडित कवी – यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)

ई) शाहीर - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)

उ) बखर – हेरवाडकर यांचे पुस्तक, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके

२) १८५० ते १९९०

काव्य, नाटक, कथा, लघुकथा, कादंबरी; प्रदक्षिणा खंड १ आणि प्रदक्षिणा खंड २ (विशेष तयारी आवश्यक आहे), चर्चेतील कवी, नाटककार, कादंबरीकार, कथाकार यांचा विशेष अभ्यास करा.

Romantic, Realist, Modernist. (कमी महत्वाचा भाग) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, संदर्भ क्लासेस चे गाईड.

दलित साहित्य - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके (निवडक), वामन निंबाळकर यांचे पुस्तक, मराठी काव्य, मराठी नाटक, मराठी कादंबरी, मराठी कथा यांचा विभागवार अभ्यास.

ग्रामीण साहित्य – ग्रामीण साहित्याचा अभ्यास. (यात रा.र.बोराडे, वासुदेव मुलाटे व इतर लेखक), यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके

फेमिनिस्ट - प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके

साहित्य समिक्षा (Literary Criticism) : रा.भा. पाटणकर, राहुल कर्डिले यांच्या नोट्स, प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.

साहित्याचे मूल्यमापन, साहित्य समाज आणि संस्कृती – याच शीर्षकाचे स्थानिकस्तरावरील दर्जेदार पुस्तक,

महत्वाचे: दर रविवारी पुण्यनगरी, सामना,महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रात मराठीची माहिती येते ती गोळा करा, त्यामुळे महितेचे विशिष्टीकरण जपल्या जावून गुण उत्तम मिळतात.
1.4K viewsVivek Patil, 02:22
ओपन / कमेंट
2022-09-17 15:03:19 Join @marathii
1.4K viewsVivek Patil, edited  12:03
ओपन / कमेंट
2022-09-17 10:50:27 Join @marathii
1.4K viewsVivek Patil, edited  07:50
ओपन / कमेंट
2022-09-16 10:30:36
1.6K viewsVivek Patil, 07:30
ओपन / कमेंट
2022-09-15 09:27:18 प्रस्थापित पांढरपेशे लेखक आणि रसिक यांना आपल्या अनोख्या शैलीने हादरा देणारे ज्येष्ठ दलित साहित्यिक आणि ‘दलितपँथर’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या निधनाने साहित्याच्या व चळवळीच्या माध्यमातून दलितांना आत्मभान देणारा आक्रमक नेता हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. शोकसंदेशात चव्हाण यांनी म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ढसाळांची नितांत श्रद्धा होती. यामुळे ते तरुण वयातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. जात्याच प्रतिभावंत असलेल्या ढसाळांनी गद्य, काव्य, वृत्तपत्रीय स्तंभलेखन अशा विविध माध्यमां मधून बाबासाहेबांचे क्रांतिकारक विचार अतिशय ज्वलंत भाषेत लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले. दलितांच्या व्यथा मांडण्यासाठी साहित्य हेच प्रभावी साधन आहे, हे अचूक ओळखलेल्या ढसाळ यांनी आपल्या साहित्यकृतींमधून दलितांच्या वेदनांना वाचा फोडली. गोलपीठा, तुही यत्ता कंची, खेळ, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे या सारख्या त्यांच्या आगळ्या शैलीतील काव्य संग्रहांनी मराठी साहित्यात एकच खळबळ उडवली आणि ते दलित साहित्यातील बिनीचे शिलेदार बनले. अमेरिकेतील ‘ब्लॅकपँथर’ चळवळीने प्रभावित होऊन त्यांनी १९७२मध्ये स्थापन केलेल्या ‘दलितपँथर’ संघटनेने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले. दलित चळवळीला आक्रमक चेहरा देणाऱ्या या चळवळीने दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. सर्वसामान्यांसारखे साधेसुधे जीवन जगणारे ढसाळ अखेरपर्यंत ‘दलितपँथर’शी एकनिष्ठ राहिले. पद्मश्री, राज्य शासनाचे साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार यांनी गौरवित झालेले ढसाळ यांच्या निधनाने केवळ दलितांचेच नव्हे तर सामाजिक न्यायाच्या चळवळीचेही नुकसान झाले आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
ढसाळ यांची कविता म्हणजे वणवा! नामदेव ढसाळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार होते. याचे प्रत्यंतर त्यांच्या वैचारिक लेखनातून दिसून येते. त्यांनी रंजनात्मक किंवा आत्ममग्न  अशी कविता कधीही लिहिली नाही. त्यांची कविता म्हणजे एक वणवा होता. त्यामुळे काही उच्चभ्रू मंडळी दुखावली गेली होती, हे मला माहिती आहे. परंतु दलित माणसाचे जीवन हे सातत्याने संघर्षांकडे जाणारे असल्याने त्यांच्या वेदना, दु:ख, शब्दातून मांडायचे म्हणजे काही प्रमाणात जहालपणा येणारच. कोंडलेले दु:ख हे फार आवेगाने बाहेर येते, हे ढसाळ यांच्या कवितेने मराठी अभ्यासकांना दाखवून दिले आहे. ढसाळ यांच्या निधनाने दलित साहित्य आणि दलित सामाजिक चळवळीची अपरिमित हानी झाली आहे. नामदेव हा दलित चळवळ आणि दलित साहित्य यांचा प्रभावी प्रवक्ता होता. त्याची कविता विद्रोही होती पण तो विद्रोह केवळ नकारात्मक नव्हता तर तो सकारात्मक होता. त्यांनी मराठी भाषेला नवे शब्द, नवा आशय आणि नवी अभिव्यक्ती दिली. ढसाळ हे चळवळीत सहभागी झाले तेव्हा गदगदलेले झाड असावे, त्याप्रमाणे त्यांचा आवेश विचारातून व चळवळीतून व्यक्त होत राहिला. ते अत्यंत निर्भय आणि परखड व्यक्तिमत्त्व होते. अन्याय आणि अत्याचार त्यांना अमान्य होता. त्याचा आविष्कार त्यांच्या सर्व लेखनात आणि चळवळीत दिसून येतो. आमच्या ‘अस्मितादर्श’ परिवाराशी त्यांचे प्रारंभापासूनच नाते जडले होते. त्यांची पहिली कविता ‘अस्मितादर्श’मध्येच प्रसिद्ध झाली होती. सामाजिक बांधीलकीशी आयुष्यभर स्वत:ला वाहून घेणारा असा कवी आणि कार्यकर्ता पुन्हा होणे नाही. – प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे (ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक)
1.8K viewsVivek Patil, 06:27
ओपन / कमेंट
2022-09-08 15:34:58 100 marks रसास्वाद कसा लिहावा
980 viewsVivek Patil, 12:34
ओपन / कमेंट
2022-09-08 15:34:09 Marathi literature - रसास्वाद कसा लिहावा | विश्लेषण | विवेक पाटील सर #Answerwriting


997 viewsVivek Patil, 12:34
ओपन / कमेंट
2022-09-07 06:20:13
323 viewsVivek Patil, 03:20
ओपन / कमेंट
2022-09-07 06:20:01
329 viewsVivek Patil, 03:20
ओपन / कमेंट