Get Mystery Box with random crypto!

पार्लर मध्ये दोन्ही हातावर भरभरून मेहंदी लावल्यावर त्या महिलेल | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

पार्लर मध्ये दोन्ही हातावर भरभरून मेहंदी लावल्यावर त्या महिलेला आठवले की ती एक्टिव्हा घेऊन एकटीच आली होती.



गाडीजवळ दोन्ही हात लांब करून उभ्या असलेल्या तिची ही घालमेल तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या एकाने ओळखली
व तिला तिच्या एक्टिव्हावर मागे बसवून घरी सोडले.



धन्यवाद वगैरे झाल्यावर त्याला आठवले की.....




त्याची गाडी तिथेच बाजारात राहिली आणि बायको तर बाजूला भाजी घेत होती….