Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला कांदा-लसूण कांद्याची सड आणि कोंब येणे या समस | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण
कांद्याची सड आणि कोंब येणे या समस्या उद्भवू नयेत, यासाठी साठवणुकीतील कांद्यांवर नियमित देखरेख ठेवावी. सडलेले, पिचलेले कांदे तात्काळ काढून टाकावेत. चाळीत हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. चाळीतील कांद्याची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही. पाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये. रुंदी वाढवली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात. लसणाच्या गड्ड्या पातीसह हवेशीर चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवाव्यात.
टोमॅटो
सापळा पिके
टोमॅटो पिकात फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात वर्षभर आढळतो. या अळीच्या नियंत्रणासाठी पिकाभोवती मक्याच्या ओळी लावल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. टोमॅटो पिकात झेंडूच्या ओळी लावल्यासही या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. फुलांच्या गर्द रंगाकडे आकर्षून मादी झेंडूच्या झाडांवर अंडी घालते. याशिवाय सूत्रकृमींच्या वाढीसदेखील आळा बसतो.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en