Get Mystery Box with random crypto!

HISTORY - by (पुरी सर. SET in history )

टेलीग्राम चैनल का लोगो karmveerclass — HISTORY - by (पुरी सर. SET in history ) H
टेलीग्राम चैनल का लोगो karmveerclass — HISTORY - by (पुरी सर. SET in history )
चैनल का पता: @karmveerclass
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 665
चैनल से विवरण

Puri sir. SET in history

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2020-06-28 11:41:10 महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण
-महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार सुरुवातीला मिशनऱ्यांकडून झाला.
- मुंबईत 1820 पर्यंत अमेरिकन मिशनऱ्यांच्या शाळांची संख्या 21 होती.
-1824 मध्ये यांनी भायखळा येथे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली जी मुंबई प्रांतातली पहिली शाळा होती
-1831 मध्ये अहमदनगर ला मुलींची शाळा काढली.
-1836 सली अमेरिकन मिशनऱ्यांनी बोर्डींग स्कूल कल्पना प्रत्यक्षात आणली.
एल्फिन्स्टनचे शैक्षणिक कार्य-
एलफिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता.
- एलफिन्स्टने मुंबई प्रांतात आधुनिक शिक्षणाचा पाया घातला.
-एल्फिन्स्टन च्या नेतृत्वाखाली बॉम्बे एज्युकेशन सोसायटी-1815. स्थापना झाली.
-या सोसायटीच्या उद्देश युरोपातील आधुनिक ज्ञान देशी भाषेत प्रसिद्ध करणे गरीब व युरोपीय मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणे हा होता.
- सुरुवातीला बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची शाळा फक्त युरोपियनांसाठी होती, त्यांनी देशी लोकांचा विचार केला नव्हता. त्यामुळे त्यांचा संशय दूर करण्यासाठी दि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अँन्ड स्कूल बुक सोसायटी ची-1822 स्थापना झाली.
- या संस्थेचे अध्यक्ष एलफिन्स्टन तर सचिव जॉर्ज जार्विस होते.
- या संस्थेचा मुख्य हेतू- युरोपातील ग्रंथाचे भारतीय भाषांत अनुवाद करणे त्यांची छपाई करणे व त्यांचे वितरण करणे हा होता.
-1827 साली या संस्थेचे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणून व नंतर पुन्हा 1837 मध्ये एलफिस्टन सोसायटी म्हणून रूपांतर झाले.
2.9K views08:41
ओपन / कमेंट
2020-06-28 11:19:11 शिक्षणावरील विविध आयोग व समित्या
1- वुडचा अहवाल- 1854.
डलहौसीच्या काळात हा अहवाल मांडण्यात आला या अहवालाला भारतातील शिक्षणाचा मॅग्नाचार्टा म्हणतात.
2- हंटर आयोग-1882-83.
वुडच्या अहवालावरील प्रगतीच्या निरीक्षणासाठी हा आयोग नेमला. या आयोगाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर दिला.
3- थॉमस रेले आयोग-1902.
विद्यापीठाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी हा आयोग नेमला यातूनच पुढे भारतीय विद्यापीठ कायदा अस्तित्वात आला
4- भारतीय विद्यापीठ कायदा-1904.
हा कायदा लॉर्ड कर्झन च्या काळात अस्तित्वात आला.
5- सॅडलर आयोग-1917-19.
विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी हा आयोग नेमला.
6-हार्टोग समिती-1929.
प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्व देण्यात यावी याच्यासाठी ही समिती नेमली.
7- सार्जंट योजना-1944.
जॉन सार्जंट भारताचे शिक्षण विषयक सल्लागार होते शिक्षणामधील बदलासाठी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.
8- राधाकृष्णन आयोग-1948-49
या आयोगामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली.
3.0K views08:19
ओपन / कमेंट
2020-06-21 18:25:10 वडियार घराणे :: म्हैसूर

राजधानी :- म्हैसूर, श्रीरंगपट्टण

राष्ट्रप्रमुख:- पहिला राजा: यदुराय
(इ.स. १३९९-१४२३)

अंतिम राजा: जयचामराज वडियार
(इ.स. १९४०-४७)

सद्याचे  म्हैसूर शहराजवळ इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले

सुरुवातीस विजयनगरच्या अध्यापत्याखाली होते

पराक्रमी राजे:- पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार, यदुराय, जयचामराज

1565 मध्ये विजयगनर साम्राज्य संपल्यावर म्हैसुर सार्वभौम झाले

18 व्या शतकाच्या मध्यात म्हैसुरचा वारस लहान असल्याचा फायदा सेनापती हैदर अलीने घेतला

हैदर ने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली

संस्थानाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी हैदर इंग्रजांबरोबर 2 युद्ध लढले

हैदर नंतर टिपू सुलतान ही 2 युद्ध लढला

मात्र 1799 च्या वेलस्ली बरोबरच्या 4थ्या युद्धात पराभव झाला, टिपू मारला गेला

चौथ्या श्रीरंगपट्टणमच्या युध्दाने म्हैसुर घराणे मुळ राजा वडीयार यांना परत केले
532 views15:25
ओपन / कमेंट
2020-06-21 18:15:32 इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले


‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन


“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता


राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम


“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह


“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.


” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.


” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष


” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन


” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी


” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी


” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय


‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी


“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर


“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार


” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.


” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु


क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.


“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.


” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.


“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे


“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.


“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक


इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक


खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना


1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स
492 views15:15
ओपन / कमेंट
2020-06-21 15:48:02 छत्रपती शाहू महाराजांनी खालील ब्राम्हणतेर वृत्तपत्रांना मदत केली

विजयी मराठा

जागृती

दिनमित्र

तरुण मराठा

कैवारी

तेज

राष्ट्रवीर

डेक्कन रयत

जागरूक

हंटर

प्रबोधन
375 views12:48
ओपन / कमेंट
2020-06-19 21:20:38 भास्करराव विठोजीराव जाधव

भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे

रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते

मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते

महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. 

दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. 

१८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली

बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते

शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली

करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते
406 views18:20
ओपन / कमेंट
2020-06-15 17:34:02
402 views14:34
ओपन / कमेंट
2020-06-15 17:29:50
393 views14:29
ओपन / कमेंट
2020-06-15 17:17:12 #Bhauraopatil

कर्मवीर भाऊराव पाटील


जीवन, शिक्षण व समाजकार्य

भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी
एका जैन कुटूंबात झाला.

त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते.

सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय

भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले.

पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले

राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला

साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले

संस्थेचे चिन्ह बोधी व्रुक्ष आहे, याच्या खालीच सिद्धार्थ गौतमांना द्न्यानप्राप्ती झाली होती म्हणुन

सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक "४ ऑक्टोबर १९१९" रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला

महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. 
‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ – या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले "फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल" सुरू केले.

भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.

२५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते सातार्यातील वसतिगृहाचे "श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस" असे नामकरण केले गेले.

१६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

 १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात "छत्रपती शिवाजी कॉलेज" ची, तर १९५४ साली कऱ्हाड येथे "सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज" ची स्थापना केली.

प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले

केंद्र सरकारने पद्मभूषन पुरस्कार दिला

1959 साली पुणे विद्यापीठाने डी लिट ही पदवी दिली

9 मे 1959 या दिवशी पुण्याच्या ससून रुग्णालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले.
389 views14:17
ओपन / कमेंट
2020-06-14 20:14:21 सायमन कमिशन (1927-28)

★ अध्यक्ष :-जॉन सायमन
★ सदस्य: Clement Attlee, Harry Levy-Lawson, Edward Cadogan, Vernon Hartshorn, George Lane-Fox, Donald Howard

★ 8 नोव्हेंबर 1927 इंग्लंड येथे स्थापना.
★ 8 फेब 1928 मुंबईत दाखल, 7 सदस्य सर्व इंग्रज.
★ भारतात दोनदा आले: फेब्रुवारी 1928, ऑक्टोंबर 1928.
★ अहवाल सादर : मे 1930
★ शिफारस :- गोलमेज परिषद

नेहरु रिपोर्ट 1928

★ सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे.
★ भारतमंत्री लॉर्ड बर्केनहेड ने आव्हान दिले की तुम्ही संविेधानासाठी प्रयत्न करा.
★ सचिव् जवाहर लाल नेहरु, अन्य 9 सदस्य होते पैकी एक सुभाषचन्द्र बोस 
★ समिति ने रिपोर्ट 28-30 अगस्त, 1928 सादर केला.
★ पहिल्या दोन बैठका M A अन्सारींच्या अध्यक्षतेखाली झाल्या.
★ तिसरी बैठक मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली झाली.
★ 29 राजनीतिक संगठनांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
★ यात प्रथम वसाहतीअंतर्गत स्वराज्य मागितले व
★ नेहरु व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र्य मागितले.
2.0K views17:14
ओपन / कमेंट