Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण -महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार स | HISTORY - by (पुरी सर. SET in history )

महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण
-महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार सुरुवातीला मिशनऱ्यांकडून झाला.
- मुंबईत 1820 पर्यंत अमेरिकन मिशनऱ्यांच्या शाळांची संख्या 21 होती.
-1824 मध्ये यांनी भायखळा येथे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली जी मुंबई प्रांतातली पहिली शाळा होती
-1831 मध्ये अहमदनगर ला मुलींची शाळा काढली.
-1836 सली अमेरिकन मिशनऱ्यांनी बोर्डींग स्कूल कल्पना प्रत्यक्षात आणली.
एल्फिन्स्टनचे शैक्षणिक कार्य-
एलफिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता.
- एलफिन्स्टने मुंबई प्रांतात आधुनिक शिक्षणाचा पाया घातला.
-एल्फिन्स्टन च्या नेतृत्वाखाली बॉम्बे एज्युकेशन सोसायटी-1815. स्थापना झाली.
-या सोसायटीच्या उद्देश युरोपातील आधुनिक ज्ञान देशी भाषेत प्रसिद्ध करणे गरीब व युरोपीय मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणे हा होता.
- सुरुवातीला बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची शाळा फक्त युरोपियनांसाठी होती, त्यांनी देशी लोकांचा विचार केला नव्हता. त्यामुळे त्यांचा संशय दूर करण्यासाठी दि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अँन्ड स्कूल बुक सोसायटी ची-1822 स्थापना झाली.
- या संस्थेचे अध्यक्ष एलफिन्स्टन तर सचिव जॉर्ज जार्विस होते.
- या संस्थेचा मुख्य हेतू- युरोपातील ग्रंथाचे भारतीय भाषांत अनुवाद करणे त्यांची छपाई करणे व त्यांचे वितरण करणे हा होता.
-1827 साली या संस्थेचे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणून व नंतर पुन्हा 1837 मध्ये एलफिस्टन सोसायटी म्हणून रूपांतर झाले.