Get Mystery Box with random crypto!

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा तिसरा टप्पा (PMKVY 3.0) #PMKVY | CrackedSoft

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा तिसरा टप्पा (PMKVY 3.0)
#PMKVY #current_affairs_Notes

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा (PMKVY 3.0) प्रारंभ 15 जानेवारी 2021 रोजी देशभरातल्या सर्व राज्यांमधल्या निवडक 600 जिल्ह्यांमध्ये केला जाणार आहे.

ठळक बाबी

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली अंमलात आणल्या जाणाऱ्या या योजनेच्या तृतीय टप्प्यात नव्या काळातल्या आणि महामारीशी संबंधित कौशल्यांवर भर दिला जाणार आहे.

कौशल्य भारत अंतर्गत 729 प्रधानमंत्री कौशल केंद्रे (PMKK), नोंदणीकृत बिगर-PMKK प्रशिक्षण केंद्र आणि 200 हून अधिक ITI कुशल व्यवसायिकांची मजबूत फळी तयार करण्यासाठी ‘PMKVY 3.0’ याचा प्रारंभ केला जात आहे.

पार्श्वभूमी

भारताला जगाची "कौशल्य राजधानी" बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी 15 जुलै 2015 रोजी प्रारंभ केलेल्या “कौशल्य भारत अभियानाला” प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही महत्वाकांक्षी योजना सुरू केल्यामुळे मोठी गती मिळाली.