Get Mystery Box with random crypto!

भारतीय हवाई दलासाठी स्वदेशी 83 ‘तेजस’ विमानांच्या खरेदी प्रस्त | CrackedSoft

भारतीय हवाई दलासाठी स्वदेशी 83 ‘तेजस’ विमानांच्या खरेदी प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 13 जानेवारी 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 73 ‘LCA तेजस Mk-1A’ लढाऊ विमाने आणि 10 ‘LCA तेजस Mk-1’ प्रशिक्षण विमानांच्या 45,696 कोटीं रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली.

याव्यतिरिक्त संरचना व पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी 1,202 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे, जेणेकरून विमानांची दुरुस्ती व देखरेख हवाई तळावरच्या डेपोत करणे शक्य होणार आणि आणीबाणीच्या प्रसंगी दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार.

‘तेजस’ विमानाविषयी

‘तेजस Mk-1’ हे देशात अभिकल्पित केलेले, अत्याधुनिक 4+ पिढीचे वजनाने हलके लढाऊ विमान आहे.

विमान इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड एरे (AESA) रडार, बियॉन्ड विज्युअल रेंज (BVR) क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक वारफेअर (EW) स्विट, हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सुविधा अश्या महत्वाच्या सुविधांसह सुसज्ज आहे. त्यामुळे ते भारतीय हवाईदलाची क्षमता वृद्धींगत करणारे एक महत्वाचे साधन ठरते.

50 टक्के स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाच्या श्रेणीतले ते पहिले विमान आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत भारताच्या हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या सार्वजनिक कंपनीने तेजस विमान तयार केले आहे.