Get Mystery Box with random crypto!

“अस्मि”: भारताची पहिली स्वदेशी 9mm मशीन पिस्तूल #current_affa | CrackedSoft

“अस्मि”: भारताची पहिली स्वदेशी 9mm मशीन पिस्तूल

#current_affairs_Notes #Esprdhapariksha

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) आणि भारतीय भुदलाने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेशी-निर्मित ‘9mm मशीन पिस्तूल’ विकसित केले आहे.

ठळक बाबी

पिस्तूलाचे नाव “अस्मि” असे ठेवण्यात आले आहे.

इन्फंट्री स्कूल (महू) आणि DRDOच्या शस्त्रास्त्र संशोधन व विकास संस्था (ARDE, पुणे) या संस्थेतल्या संशोधकांनी हे पिस्तूल विकसित केले आहे.मशीन पिस्तूल 9mm व्यास असलेला गोळीबार करते.

मशीन पिस्तूलाची उत्पादन किंमत प्रत्येकी 50,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
मेटल थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने बनविलेल्या ट्रिगर घटकांसह विविध भागांच्या रचना आणि नमुन्यामध्ये थ्रीडी प्रिंटिंग प्रक्रिया वापरली गेली आहे.

सशस्त्र दलातील कमांडर्स आणि रणगाडे आणि विमानात तैनात असलेल्या क्रू मेंबर्ससाठी वैयक्तिक शस्त्रे म्हणून या पिस्तूलचा चांगला उपयोग होऊ शकतो.