Get Mystery Box with random crypto!

३० एप्रिल इ.स.१७८४ इतिहासातील राखीपौर्णिमा अहिल्याबा | " छञपती श्री शिवाजी महाराज "

३० एप्रिल इ.स.१७८४
इतिहासातील राखीपौर्णिमा
अहिल्याबाई होळकरांनी जोधपुरच्या राजाशी मैत्रीचे व स्नेहाचे संबंध वाढवण्यासाठी राखी पाठवली होती. राजा मानसिंहाने राखीबंधभाई याचे प्रतीक म्हणून होळकर घराण्यातील राण्यांना अनेक प्रकारे मदत केलेली आढळते. भेट म्हणून ३० एप्रिल १७८४ च्या मकाराणा येथिल सनदेनुसार अहिल्याबाईंना मंदिरासाठी जोधपुरच्या राजाने पांढराशुभ्र संगमरवरी दगड उपलब्ध करुन दिला होता.
https://youtube.com/shorts/LlgmJxX6G4E?feature=share


३० एप्रिल इ.स.१९०८
राजद्रोहाचा खटला
प्रफुल्लचंद्र चक्रवर्ती आणि खुदिराम बोस या तरुणांनी मुझ्झफरपूर येथे युरोपियन क्लब समोर कलकत्याचा प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याच्या बग्गीवर हातबॉम्ब टाकला. पण बग्गीमध्ये किंग्जफोर्ड नव्हताच, दुर्दैवाने त्यात बॅरीस्टर र्प्रिंगल केनेडी याची पत्नी व कन्या मारल्या गेल्या. गाडीवानही ठार झाला. पोलिस पकडायला येताच मोकामे स्टेशनवरतीच प्रफुल्लचंद्रांनी आत्महत्या केली, खुदिराम पकडले गेले व चौकशी - खटला वगैरे कायदेशीर सोपस्कार पार पाडून त्यांना ११ ऑगस्ट १९०८ रोजी फाशी दिली. जबानी व न्यायालयात झाल्याप्रकाराची सगळी जबाबदारी खुदिराम बोसांनी घेतली. अत्यंत शांतपणे वंदे मातरम्‌चा घोष करत ते फासावरती गेले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.