Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ३० एप्रिल इ.स.१६६४ सुरत | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

३० एप्रिल इ.स.१६६४
सुरत लुटीचे पडसाद...
इस १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. या लुटीत अगणित द्रव्य महाराजांना लाभले. दुसरीकडे या घटनेने औरंगजेबाचा तिळपापड उडाला होता. खरंतर सुरतेतून मिळणारं उत्पन्न औरंगजेबाच्या बहिणीला (जहांआरा बेगम) मिळण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. त्याकाळी सुरत व्यापाराची राजधानी होती परंतु शिवाजी महाराजांच्या दणक्याने अनेक व्यापारी सुरत सोडून चालले होते. यावर तोडगा म्हणून औरंगजेबाने मोठ्या उदारपणे एक वर्षभर इंग्रजांना व इतर सर्व व्यापाऱ्यांना जकात माफ करण्याचा हुकुम काढला. एवढेच नाही तर पुढेही एक चतुर्थांश जकात दरसाल माफ होईल असे संकेत दिले. बंगालला लिहलेल्या ३० एप्रिल १६६४ च्या पत्रात "आपल्या शहरांतील व्यापाऱ्यांना उत्तेजन मिळावे व झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून एक वर्षाच्या जकाती औरंगजेबाने माफ केल्या असे लिहले आहे".


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/LlgmJxX6G4E?feature=share

३० एप्रिल इ.स.१६६५
(वैशाख वद्य एकादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार रविवार)

दाऊदखानाचा किल्ले राजगडावर हल्ला!
मिरझाजयसिंगच्या नेतृत्वाखाली सुमारे ७००० स्वार स्वराज्य बेचिराख करण्यास पाठवून दिले. महाराज याच सुमारास राजगडावर असताना राजगडला मोगली वेढा पडल्यावर मराठ्यांचा प्रतिकार कसा होईल? मराठयांनी असा काय तिखट प्रतिकार केला की, मोगल सैन्य जेवढे पुढे आले होते तेवढेच मागे सरकले. राजगडावरून पद्मावती, संजीवनी माचीवरून आग ओकणाऱ्या तोफा, बाणांचा अचूक वेध, बंदुकीच्या माऱ्यांचा पाऊस अश्या मराठी रेट्यासमोर मोगली सैन्य टिकेनासे झाले. निरुपाय होऊन दाऊदखान २ कोस मागे हटला.



३० एप्रिल इ.स.१६७४
एप्रिल १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज कंपनीस खालील खणखणीत निरोप पाठविला की, “सिद्दीला बंदरात जागा दिल्यास मी तुमच्याशी युद्ध करून बादशाही आरमार जाळण्याचा शक्य तितका प्रयत्न करीन आणि मुंबई बेट घेण्याकरिता डचांना १० हजार सैन्याची कुमक करीन” याकरता आपण सिद्दीला प्रवेश मुळीच देता कामा नये. छत्रपती बशिवाजी महाराजांच्या या धमकीमुळे मुंबईकर इंग्रज भयभीत झाले. त्यांनी ३० एप्रिल १६७४ रोजी सुरतेस पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज कशा रीतीने इंग्रजांस त्रास देणार आहेत याबद्दल कळविले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहीचे करारनामे इंग्रजांस पाठविले. त्याचे भाषांतर केल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही अटी जाचक आहेत. त्यानंतर हेन्री ऑक्झिंडेनला छत्रपती शिवाजी महाराजांशी तहाचे बाबतीत सूचना देऊन रायगडी राज्याभिषेक समारंभास जाण्यास निरोप दिला.



३० एप्रिल इ.स.१६८४
(वैशाख वद्य एकादशी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार बुधवार)

औरंगजेब बादशहाचे आदिलशाहीवर आक्रमण!
औरंगजेब बादशहाचे आज्ञापत्र स्थानिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून शहाजहानने आदिलशाही व कुतुबशाही ही मांडलीक राज्ये खालसा न करण्याचा निर्णय घेतला होता. औरंगजेब बादशहाने एकदा, ही राज्ये खालसा करण्याचा प्रयत्न करून पाहीला पण तो अयशस्वी ठरला! कारण शहाजहानची औरंगजेबास अडचण येत होती. नंतर महाराज छत्रपती झाल्याने औरंगजेब बादशहाची अजूनच अडचण झाली. कारण विजापुरचा प्रदेश जिंकून महाराज हद्द वाढवून राज्याचा विस्तार करीत होते. मात्र महाराजांच्या महानिर्वाणानंतर पुन्हा एकदा उचल खाल्ली. धर्माचे वेड औरंगजेब बादशहास स्वस्त बसू देत नव्हते. अशातच औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर, छत्रपती संभाजी महाराजांकडे येऊन राहिल्याने औरंगजेब बादशहाच्या अडचणीत अजून भर पडत होती! या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सिकंदर अदिलशहास औरंगजेबाने आज्ञापत्र लिहीले. सिकंदर हा वयाने लहान असल्याने सिकंदरचा कारभारी रुस्तमखान यास औरंगजेब बादशहाने आज्ञापत्र लिहीले त्यानुसार,
१ स्वारी खर्च व रसद काही सबब न सांगता पोहोचविणे.
२ आपल्या मुलूखातून रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
३ गरज असेल तेव्हा मोगलांची मदत करणे.
४ छत्रपती संभाजी महाराजांची मित्रता सोडून त्यांचा समूळ फडशा पाडण्यासाठी तयारी करणे.
५ सर्जाखान यास आपल्या मुलूखातून हाकलून देणे. • या कलमांसह त्याने विजापुरकरांना बांधून ठेवले आणि चांगलाच अंकुश ठेवला.



३० एप्रिल इ.स.१७००
सातारा हस्तगत झाला त्याच दिवशी बादशहाने फतुल्लाखानास ‘परळीचा किल्ला’ (सज्जनगड) काबीज करण्यासाठी पाठवले व मागून म्हणजेच आजच्या दिवशी बादशाहा जातीने तिथे पोहचला.