Get Mystery Box with random crypto!

२९ एप्रिल इ.स.१६८५ फरह बख्श बागेजवळ औरंगजेब बादशहाने मुक्काम | " छञपती श्री शिवाजी महाराज "

२९ एप्रिल इ.स.१६८५
फरह बख्श बागेजवळ औरंगजेब बादशहाने मुक्काम केला. दि. २६ एप्रिल इ.स.१६८५ रोजी औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले. फरह बख्श बागेजवळ डेरे देण्यात आले. जमादिलावल महिन्याच्या ५ तारखेसच म्हणजेच, आजच्या दिवशी, २९ एप्रिल इ.स.१६८५ रोजी औरंगजेब बादशहाने त्या ठिकाणी मुक्काम केला.





२९ एप्रिल इ.स.१७०५
१७०५ एप्रिल महिन्यात त्र्यंबक शिवदेव, पंताजी शिवदेव आणि रामजी फाटक यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि तेथील मोगल शिबंदीचा पराभव करून तो किल्ला आपल्या ताब्यात आणला. गडाचा मोगल किल्लेदार देवीसिंग यास कैद केले. हे महाराणी ताराबाईंना समजताच त्यांनी २९ एप्रिल १७०५ रोजी रामजी फाटक यांस पत्र लिहिले, “तुमच्या सेवेचा मुजरा जाहला. तुम्ही मर्दानी सेवक आहात या उपरीही आपण स्वामी कार्य करीत जाणे म्हणजे कुलास उर्जीत होईल.”



२९ एप्रिल इ.स.१८५८
बाबुराव सेडमाकेंनी ब्रिटिश फौजांचा एप्रिल १८५८ मधे सगणपूर व बामनपेट येथे पराभव केला. या यशाने अत्याधिक आनंदित झालेल्या बाबुरावने २९ एप्रिल १८५८ रोजी प्राणहितेच्या तीरावरील अहेरी जमीनदारीमधील चिंचगुडी येथे ब्रिटिशांच्या टेलीग्राफ कॅम्पवर हल्ला केला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.