Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष २९ एप्रिल इ.स.१६६१ (वैशा | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२९ एप्रिल इ.स.१६६१
(वैशाख शुद्ध ११, एकादशी, श्रीनृपशालिवाहन शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार)

शृंगारपुर स्वराज्यात दाखल!
शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे जास्तच शेफरला होता.
आदिलशहाच्या हुकूमानुसार महाराजां सोबत अकारण वैर धारण केले होते. शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापुर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपुरकडे वळवला. तिथे सूर्यराव सुर्वे आपल्या दहा हजार लोकांसह शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव देत असे. हा उपद्रव नाहिसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपुरावर अचानक छापा टाकला, पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला.
चकमक चांगली झाली, सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठयांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगड देखील स्वराज्यात दाखल केला. संगमेश्वर येथे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करीत असताना सुर्यरावणे विनाकारण तानाजी काकांच्या छावणीवर हल्ला केला. पण तो हल्ला तानाजी काकांनी क्षणात सावरून उधळून लावला व सुर्वेला पळून जाण्यास भाग पाडले. महाराजांना हे कळताच तानाजी काकांचा सत्कार केला आणि सुर्वेला अजून एक संधी द्यायची ठरविले व ते पत्राद्वारे महाराजांनी सुर्वेला कळविले आणि भेटीसाठी बोलावले. होकार देऊन ही सुर्वे काय भेटीला येईना.
मग, महाराजांनी शृंगारपुरीकडे १५००० खड्या स्वारांसह मोहरा वळविला. घाबरून स्वतःच्या रक्षणासाठी सुर्वे पळून गेला. महाराज शृंगारपुरीत पोहोचले आणि सुर्वे पळून गेल्याचे समजताच महाराज संतापले आणि सुर्वेचे सिंहासन लाथेने उडवून लाविले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२९ एप्रिल इ.स.१६७५
उत्तर कोकणात पोर्तुगीजांकडून दरवर्षी चौथ वसूली करून आता शिवाजी महाराज पोर्तुगीजांकडे आदिलशाही कोकणचा भाग म्हणून साष्टी, बार्देसचीही मागणी करू होते. फोंडा मोहिमेच्या वेळी स्वत: शिवाजी महाराज २९ एप्रिल १६७५ रोजी दुपारी सैन्य घेऊन साष्टी प्रांतातील काही देसायांच्या आणि आदिलशहा सरदार रणमस्त खानाचा पाठलाग करत चांदर गावात शिरले. पुढे कुंकळी गावातील बाजारात सैन्य घेऊन दाखल झाले. कुंकळीत काही घरांची लुटालूट केल्यानंतर या सैन्याचा तळ कुंकळीतील चांभारभाटात मुक्कामास राहिला. यावेळी कुंकळीतील पोर्तुगीज कॅप्टन मानुएल डी मोता हा होता. या कॅप्टनकडे दारूगोळ्याची मागणी केली. तेव्हा कॅप्टनने गव्हर्नरला कळविले तेव्हा गव्हर्नरने सल्लागारांच्या बैठकीत हा विषय मांडला. तेव्हा सल्लागारांनी मत मांडले की, शिवाजीचे सैन्य कुंकळी गावात हेतूपरस्पर शिरले की वाट चुकून शिरले त्याची अगोदर चौकशी करण्यात यावी व त्याचा पुढचा पावित्रा काय आहे याचा तपास करावा. त्या दरम्यान शिवाजीचा जो वकील या शहरी (ओल्ड गोव्यात) सध्या आहे त्यास स्थानबद्ध करून ठेवावे. म्हणजे पुढे जो काय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्या संबंधाने हा वकील आपल्या हाती असला तर त्याचा उपयोग होईल.’ पुढे लवकरच फोंडा जिंकल्यावर मात्र पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांशी मवाळ धोरण स्वीकारले.



२९ एप्रिल इ.स.१६८०
महाराजांच्या महानिर्वाणाबाबतची माहिती!
पाँडेचरीचा संस्थापक आणि राजापुरचा मुख्य अधिकारी फ्रेंच मार्टिन लिहीतो की "छत्रपती शिवाजी महाराज काही दिवसांपूर्वीच वारले. उघड्या मैदानावरील लढाईतील यशापेक्षा आपल्या कुशाग्र बुद्धीने मुत्सद्देगिरीतील क्षमतेमुळे हिंदुस्थानातील उच्चतम व्यक्तींच्या पंक्तीत महाराज विराजमान होते महाराजांचा उत्तराधिकारी ठरविण्यास महाराजांच्या अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराजांचा ज्येष्ठ मुलगा हा महाराजांचा कायदेशीर वारस आहे".



२९ एप्रिल इ.स.१६८२
छत्रपती संभाजी महाराजांची सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार दगड, चुना व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली. त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल सन १६८२ रोजी कळवीले की...
"आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."