Get Mystery Box with random crypto!

● ऑस्ट्रेलियन ओपन 2022: महिला एकेरी - जागतिक क्रमवारीत अव्वल | VJS eStudy

ऑस्ट्रेलियन ओपन 2022: महिला एकेरी

- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीने इतिहास रचला आहे.
- बार्टीने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.
- तिने आज शनिवारी महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सचा 6-3, 7-6 असा पराभव केला. हा सामना 27 मिनिटांत संपवला.
- विशेष म्हणजे बार्टीने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.
- बार्टीने 28 वर्षीय कॉलिन्सवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. यानंतर कॉलिन्सने दुसऱ्या सेटमध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण बार्टीने हा सेट 7-6 असा जिंकून आपले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
- बार्टीने यापूर्वी 2019 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2021 मध्ये विम्बल्डन जिंकले होते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बार्टीचा विजय-पराजय रेकॉर्ड आता 24-8 असा आहे. 2022 मध्ये तिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला जेथे तिला अमेरिकन खेळाडू सोफिया केनिनने पराभूत केले.

माहिती संपादन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram