Get Mystery Box with random crypto!

● म्युकरमायकोसिस (Mucormycosis) - म्युकरमायकोसिस किंवा ज्याल | VJS eStudy

म्युकरमायकोसिस (Mucormycosis)

- म्युकरमायकोसिस किंवा ज्याला सामान्यपणे काळी बुरशी (Black Fungus) असे म्हटले जाते, तो बुरशी प्रादुर्भावामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होणारा आजार आहे.
- या विकाराला झायगोमायकाॅसिस (Zygomycosis) म्हणूनही ओळखले जाते.
- सभोवतालच्या वातावरणात असलेल्या म्युकरमायसेटीस (Mucormycetes) या सूक्ष्म-जीवांमुळे हा आजार होतो.
- म्युकरमायसेटीस सूक्ष्म-जीव मातीत किंवा पाने, खते अशा सडत/विघटित होत जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळतात.
- म्युकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरु शकतो.
- मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यासच या रोगाचा संसर्ग होतो.
- म्युकरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला किंवा प्राण्यांकडून माणसाला याची लागण होत नाही.

म्युकरमायकोसिसचे प्रकार:

1. Rhinocerebral (Sinus and Brain),
2. Pulmonary (Lung),
3. Gastrointestinal,
4. Cutaneous (Skin),
5. Disseminated.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta