Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष २२ जुलै इ.स‌.१६५७ मे महीन | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२२ जुलै इ.स‌.१६५७
मे महीन्यात मराठे अहमदनगरपर्यंत घुसले आणि लुट करुन परतले. औरंगजेब कमालीचा संतापला. त्याचे सैन्य कल्याणीच्या वेढ्यात गुंतले होते त्याचाच फायदा शिवाजीराजांनी घेतला. आदिलशहाने कल्याणीच्या रक्षणार्थ तीस हजार फौज पाठवली. दोन महिने मुघल - आदिलशहा लढत राहीले. २२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२२ जुलै इ.स.१६६६
राजियांनी राजगडाहून आग्राकडे निघताना बरोबर बराच खजिना घेतला होता. राजांना कैद केल्यावर ह्या कैदेतून ते आग्रातील अमीर उमराव बडी मंडळी यांना भेटीदाखल अनेक वस्तू पाठवू लागले. शहरात राजेविषयी चांगले मत तयार झाले. दखनीराजा चांगला दिलदार असल्याचा बोलबाला होऊ लागला. याच सुमारास औरंगजेबाने आपल्या लवाजम्यासह आग्रा शहराबाहेर जाऊन शिकार करण्याचे ठरविले. औरंगजेब दिनांक २२ जुलैपासून आग्रा शहराबाहेर राहिला. त्यामुळे आग्यातील कारभार थंड पडला होता. छत्रपती शिवाजीराजांच्या डेऱ्याभोवतीचा पहारादेखील ढिला पडला होता. शाहीदरबार काही दिवस बंद असल्याने आग्रा शहरात सुटीचे वातावरण होते. यावेळी राजे मिठाईचे पेटारे भरून आग्रातील अमीर उमरावांकडे घरपोच करीत होते. प्रथमतः फुलादखाना कडून हे पेटारे तपासले जात होते. त्याला व त्यांच्या
पहारेवाल्यांनाही महाराजांनी मिठाई दिली असणार असे पेटारे सतत जाऊ लागले. काही दिवस लोटल्यावर राजांच्या मनात आले की, आपल्या बरोबर राहत असलेले एक थोर सत्पुरुष कवींद्र परमानंद नेवासकर यांचा सत्कार करण्याचे ठरविले. हा सत्कार समारंभ दिनांक २२ जुलै १६६६ च्या सुमारास झाला असावा, कारण ह्याचा उल्लेख दिनांक २२ जुलैच्या राजस्थानी पत्रात आहे. दिनांक २२ जुलै रविवारी छत्रपती शिवाजीराजे यांनी राहत्या हवेलीच्या बागेत परमानंदांची यथोचित पूजा केली. त्यांना एक हत्ती व हौबासह एक हत्तीण, दोन उत्तम घोडे व वस्त्रालंकार दिले. त्यांच्यासाठी ठेवून घेतलेले चाळीस स्वार त्यांच्या बरोबर
दिले; आपल्याजवळील मौल्यवान कापड चोपड बांधून राजियांनी कवींद्रापाशी दिले. कवींद्राना परवाना मिळालेला होता. त्याप्रमाणे ते राजांचा निरोप घेऊन निघाले. व आग्रा शहराच्या पश्चिमेकडे सुमारे २३ मैलांवर असलेल्या फत्तेपूर-शिक्री या गावी पोहचले.



२२ जुलै इ.स.१६७५
(श्रावण शुद्ध एकादशी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार गुरुवार)

महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी!
किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख व १७ किल्ले मोगलांना परत करावेत दख्खनची सरदेसाईपणाची वृत्ती महाराजांना मिळावी, जुन्नरचा मोगली सुभेदार कल्याण-भिवंडीला यावा अशी तहाची कलमे ठरली. (युवराज शंभुराजेंचे पंच हजारी मनसबदारीचे कलम बाद झाले.) या तहावर महाराजांच्या वकिलाने बहादुरखानाची सही घेतली. बहादुरखानाने मोठ्या आनंदाने तहाचे वृत्त औरंगजेब बादशहाकडे रवाना केले. औरंगजेब बादशहा यावेळी वायव्य सरहद्दीवर होता. छत्रपती शिवाजी महाराजांशी यशस्वी तह घडवून आणल्याबद्दल औरंगजेब बादशहा बहादुरखानावर प्रसंन्न झाला. बहादुरखानाची बढती करण्यात येऊन तो आता सप्त हजारी मनसबदार झाला. औरंगजेब बादशहाने त्याला एक हत्तीही बक्षिस दिला. त्याचे भाऊ व मुले यांचाही औरंगजेब बादशहाने गौरव केला. बहादुरखानही या सन्मानामुळे खुष झाला. त्याने या निमित्ताने बहादुरगड येथे प्रचंड उत्सव साजरा केला. मेजवान्या, बैठकी यांची एकच रेलचेल उडाली. या आनंदोत्सवात बहादुरखानाने ३० हत्ती, ५०० घोडे, २००० वस्त्रे, तरवारी व अन्य शस्त्रे देणगी दाखल आपल्या सरदार, आधिकारी व सेवक वर्गाला दिल्या. परंतु हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. पहिल्या पंधरवड्यात बहादुरखानाने महाराजांकडे कबूल केलेले १७ किल्ले ताब्यात देण्याबद्दल मागणी केली. परंतु महाराजांनी ते साफ नाकारून बहादुरखानाच्या तोंडाला पाने पुसली. महाराजांनी तहाची वाटाघाट, आदिलशाही मुलुखात बिनधास्तपणे स्वारी काढता यावी एवढ्यासाठीच बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या द्रुष्टीने सुरू ठेवली होती हे आता मोगलांच्या लक्षात आले. अशाप्रकारे महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाले.