Get Mystery Box with random crypto!

या सुमारास कान्होजीनें इंग्रजांचें एक प्रचंड लढाऊ जहाज (ससेक्स | " छञपती श्री शिवाजी महाराज "

या सुमारास कान्होजीनें इंग्रजांचें एक प्रचंड लढाऊ जहाज (ससेक्स) धरून नेलें (१७१७). त्यामुळें बून इंग्रज फार चिडला व त्यानें ता. १७ एप्रिल स. १७१७ रोजी वरील जंगी आरमार विजयदुर्ग किल्ल्यावर आणलें. तेथें किल्ला हस्तगत करण्याचा त्यानें कसून प्रयत्‍न केला. परंतु कान्होजी आंग्रयाच्या मारापुढें नामोहरम होऊन मुठींत नाक घेऊन त्याला आरमारासह मुंबईत परत यावें लागलें. इंग्रजांचे दोनशें लोक मेले व तीनशें जखमी झाले.


https://youtube.com/shorts/_aH8V7Qs8uU?feature=share
१७ एप्रिल इ.स.१७२०
बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर दि. १७ एप्रिल १७२० रोजी बाजीरावास छत्रपती शाहूमहाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना मुतालिकीची वस्त्रे करून दिली. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यास शाहूमहाराजांजवळ राहत असत. अंबाजीपंत, त्यांचा मुलगा महादेव, मल्हार तुकदेव ऊर्फ दादा, त्र्यंबक सदाशिव ऊर्फ नाना हे शाहू महाराजांजवळ राहून पेशव्यांची बाजू सांभाळीत.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.