Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १७ एप्रिल इ.स.१६७५ फोंड् | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१७ एप्रिल इ.स.१६७५
फोंड्याच्या सुभेदाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील एका व्यापाऱ्याला पकडले आणि विनाकारण मराठ्यांना डिवचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला विश्वासू सरदार दत्ताजी पंडित यांना दोन हजार अश्वदळ देऊन फोंड्याकडे पाठविले. दत्ताजी पंडित फोंड्यापर्यंत जाऊन पोहोचता न पोहोचता तेच स्वतः छत्रपती शिवाजी महाराज वायुगतीने निवडक सैन्यदल घेऊन फोंड्यापर्यंत आले आणि त्यांनी फोंड्याला वेढा घातला. हा वेढा चालू असताना छत्रपती बशिवाजी महाराजांनी एक पथक कर्नाटक प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. त्यामुळे दोन आघाड्यांवर तोंड देण्याची पाळी आदिलशहावर आली. १७ एप्रिल १६७५ रोजी किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावून तसेच शिड्या लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा जिकला. हा महत्त्वाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर कुठलीही विश्रांती न घेता छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकात घोडदौड सुरू केली व केवळ १५ दिवसात अंकोला, शिवेश्वर इत्यादी किल्ले जिकून घेतले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/_aH8V7Qs8uU?feature=share

१७ एप्रिल इ.स.१६८२
कारवारचे बंदर छत्रपती शिवरायांनी हस्तगत केले होते व त्याशेजारी ‘अंजदीव’ नावाचे एक लहानसे बेट भर समुद्रात नाक्यावरच होते. सिंधुदुर्गाप्रमाणेच तेथेही आपला जलदुर्ग बांधून किनार्याचा बंदोबस्त ठेवावा अशी महाराजांची इच्छा होती. पोर्तुगीझांना शह देण्यास हे ठिकाण सोयीचे आहे हे जाणून छत्रपती संभाजीराजांनी तेथे आपला सुभेदार पाठवून तटबंदी सुरु केली. त्याचबरोबर गोव्याहून पोर्तुगीज गव्हर्नरने लढाऊ जहाजे पाठवून अंजदीव हस्तगत केले ती तारीख १७ एप्रिल होय.



१७ एप्रिल इ.स.१६८४
छत्रपती संभाजी महाराजां चे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती :-
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) संभाजीची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजीचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे. फर्मानांतील बहुतेक कलमे शिकंदर शहाने मान्य केली पण औरंगजेबाने पाठविलेल्या एकही फर्मानाची शिकंदरकडून अंमलबजावणी होऊ शकली नाही. तेव्हा औरंगजेबास आदिलशहा संभाजी महाराजांशी मैत्री व सख्यत्व करतो असा संशय आला. मराठ्यांविरुद्ध मोहिमेत १६८४ मध्यापर्यंत सर्व आघाड्यांवर अपयशच आले होते. संभाजी राजें च्या विरुद्धच्या युद्धात टिकाव लागेना म्हणून औरंगजेबाने दिनांक ३० ऑक्टोबर १६८४ रोजी आदिलशहीविरुद्ध युद्ध पुकारले.



१७ एप्रिल इ.स.१६८७
कर्नाटकांत १६८६ नंतर हरजी महाडिकला मुघलांविरुद्ध लढा द्यावा लागला कारण मोगलांच्या तुकड्या त्या प्रदेशात उतरू लागल्या तेव्हा मराठ्यांनीही त्या प्रदेशांत बराच मुलूख काबीज केला. सरदार गोपाळ दादाजी व विठ्ठल पल्लवी यास हरजीराजे यांनी मुघलांचा पाठलाग करण्याची आज्ञा दिली. पण त्यांची शक्ती अपुरी पडू नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८६ मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना तिकडे जाण्याची आज्ञा केली. या आज्ञेनुसार ते दोघे फेब्रुवारी
१६८७ मध्ये १२००० सैन्यासह कर्नाटकांत पोहोचले. इ. स. १६८७ च्या सुरुवातीस औरंगजेबाने कुतुबशाही जिंकल्यानंतर कुत्बशाहीचे कर्नाटकांतील मुलूख व किल्ले घेण्यासाठी सरदार रवाना केले होते. १७ एप्रिल १६८७ पर्यंत मुघली सैन्याने बाळापुरमपर्यंत कूच केले. त्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठे सैनिकांकडून प्रतिकार झाला नसावा. कुत्बशाहीतील महत्त्वाचा किल्ला कोंडापिली हा मुघलांनी फितुरीने काबीज केल्याची बातमी २९ जुलैला मद्रासला पोचली होती.



१७ एप्रिल इ.स.१७१७
विजयदुर्ग उर्फ घेरिया संग्राम
'पश्चिम किनार्‍यावर आमच्या अनिरुद्ध संचारास अडथळा करील त्याची मी खोडकीच जिरवणार', असा बून नांवाच्या इंग्रज गव्हर्नरानें आपला निश्चय प्रगट करून दोन वर्षांच्या आंत नऊ उत्कृष्ट लढाऊ जहाजें मुंबईच्या बंदरांत नवीन तयार केलीं. या सर्वांवर मिळून १४८ तोफा व साडेबाराशें लढाऊ खलाशी होते. यांशिवाय जमिनीवरून लढण्यास अडीच हजार यूरोपियन व दीड हजार एतद्देशीय फौज मुद्दाम विजयदुर्ग वगैरे आंग्रयाचे किल्ले पाडाव करण्यासाठी तयार केली.