Get Mystery Box with random crypto!

१२ एप्रिल इ.स.१६८९ छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष | " छञपती श्री शिवाजी महाराज "





१२ एप्रिल इ.स.१६८९
छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे यांना १२ एप्रिल १६८९ रोजी पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये छत्रपतींनी गोळे यांना असे आवाहन केले होते की, “सरदार गोळे यांना आपल्या अनुयायांसहित चरितार्थाकरता योग्य ती व्यवस्था इनाम गांवे जोडून केली जाईल. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारलेली इनामांची ही पद्धती त्यांना आपले मराठे सरदार, सैनिक राखण्यासाठी निश्चित सहाय्यकारी झाली. हे औरंगजेबाच्या कानी येताच त्याने मोगल अधिकाऱ्यांकरवी त्यात गोळे कुटुंबातील चार सदस्यांना आदेश कळविले की, मोगल बादशहाची निष्ठेने सेवा करण्याची अट पाळण्यास जर ते (सरदार गोळे) तयार असतील तर बादशहा त्यांना चार गांवे इनाम देऊन सातगावांची जहागीरही देतील जी निरंतर त्यांना उपभोगावयास मिळेल. परंतु देवदयेने ह्या मसलतीमध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या प्रयत्नास यश आले. गोळे स्वराज्यातच राहिले आणि मोगल बादशहाने रंगवलेली भवितव्याची स्वप्ने भंग पावली. गोळे घराणे हे नेहमीच हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी एकनिष्ठ होते.



१२ एप्रिल इ.स.१७०३
मुघल फौजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला , त्यात औरंगजेबाने स्वतः जातीने हजर राहून सिंहगड जिंकून घेतला. पण फक्त ३ वर्षेच किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला .. १७०६ मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिंहगड जिंकला आणि सिंहगड शेकडो वर्ष मराठ्यांकडेच राहिला.



१२ एप्रिल इ.स.१७३७
मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला.



१२ एप्रिल इ.स.१७५२
१७५२ साल हे मराठ्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने
फार महत्वाचे होते.
१२ एप्रिल १७५२ रोजी सफदरजंगाने बादशहाच्या वतीने मराठी सरदारांशी करार (अहमदनामा) केला.
त्यानुसार इथल्या व परकीय आक्रमणांपासून मोगल बादशहाचे रक्षण करण्याची जबाबदारी पेश्व्यावर पडली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.