Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष १२ एप्रिल इ.स.१६६३ शाहि | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

१२ एप्रिल इ.स.१६६३
शाहिस्तेखानावरील छाप्याच्या संदर्भात काहीशी माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात. ती माहिती पुढीलप्रमाणे आहे :
त्यांत छत्रपती शिवाजी महाराज ४०० निवडक लोकांसह जातीने शाइस्तेखानाच्या तळावर गेला त्याची हकीकत आहे. कांही बहाणा करून ते सलाम करण्यासाठी म्हणून शाइस्तेखानाच्या तंबूंत गेले. आणि लगेच पहारा साफ मारून, शाइस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बिब्या, ४० मोठे दरकदार, मोंगलांचा सेनापती, इत्क्यांचे प्राण हरण करून खुद्द शाइस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून त्याच्या आणखी ६ बायका, आणि दोन मुलगे, शिवाजीने ठार केले. या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त ६ सैनिक मेले आणि ४० जखमी झाले ! १० हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंतसिंग समीप असून पाठलाग न करितां स्तब्ध राहिला. यावरून त्याचे यांत अंग होते असे सगळ्यांना वाटते.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१२ एप्रिल इ.स.१६६५
पुरंदरचा रणसंग्राम - वज्रगडाचा बुरुज ढासळला
पुरंदरावर तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते, अग्नीवर्षाव करीतचं होते. पुरंदर शर्थीने लढतच होता. पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता. त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ती तारीख होती १२ एप्रिल १६६५....



१२ एप्रिल इ.स.१६७३
(वैशाख शुद्ध षष्ठी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार शनिवार)

महाराज पन्हाळगड मुक्कामी!
सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी धर्मवाट देऊन बेहलोलखानास सोडून दिल्याची वार्ता महाराजांना कळली होती. त्यामुळे महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्यात न जाता अथणी आणि हुबळीच्या रोखाने दौडू लागले. हुबळीची लुट करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अथणीवर धाड टाकली. कारवार प्रांतात सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी मांडलेली धुम पाहून बेहलोलखानाने कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार होता. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसाळाही जवळ असल्याने बेहलोलखानाने इथे फारशी हालचाल केली नाही.



१२ एप्रिल इ.स.१६८३
व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहास पाठविलेल्या पत्राचा आशय!
"आपल्या प्रजेला उपद्रव देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांस शासन करण्यासाठी आपण युवराज अहमद आझमशहा यांना मोठे सैन्य देऊन इकडे पाठविले आहे व नबाब कर्नलखान हेही मोठे आरमार घेऊन येत आहेत हे आपल्या पत्रावरून कळते. आपण माझ्याकडे मागणी केली आहे की, आपल्या पुरवठ्याच्या नौकांना मी आमच्या आरमारी जहाजांचे संरक्षण द्यावे व छत्रपती संभाजी महाराजांचे निर्दालन करण्यासाठी आपले जे सरदार इकडे येत आहेत त्यांना मदत करावी. एक काब्रा घोडा आणि टेहाळणीच्या ६ तोफा आपण मला नजराण्यादाखल पाठविल्या आहेत. मोठ्या प्रेमाने पाठविलेल्या ह्या नजराण्याची मला अप्रुकता वाटते.""आपले पत्र येण्यापूर्वी माझे स्वामी पोर्तुगालचे महाराज यांनी मला पत्र पाठवून आपणास मदत करण्याची आज्ञा केली होती. त्या आज्ञेस अनुसरून मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन जनरल तसेच चौल, वसई आणि दमण या तिन्ही कॅप्टनना पत्रे पाठवून आपल्या सैन्याला आमच्या ठाण्याच्या हद्दीतून वाट देण्यास व ह्या सैन्याला आमच्या राज्यात जीवनोपयोगी वस्तू खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते. तसेच आपल्या नौकांना आमच्या नद्यांतून वाहतूक करू देण्यासाठी आमच्या अधिकार्‍यांना सुचना पाठविल्या होत्या. शिवाय आपल्या आरमाराच्या सामोरा जाण्यासाठी दारुगोळ्याने भरलेल्या ६ नौकांना हुकूम केला होता". औरंगजेब बादशहाचा एक दुत वाटाघाटी करण्यासाठी गोव्यास आला तेव्हा व्हिसेरेई त्याला म्हणाला होता की, छत्रपती संभाजी महाराजांशी पोर्तुगीजांचा तह झाल्याने त्याचा भंग होण्यासारखे क्रृत्य आपण होऊ देणार नाही. परंतु वरील पत्र वाचल्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी असलेल्या तहास हरताळ फासून पोर्तुगिजांनी मोगलांना मदत केल्याचे दिसून येते. गोव्याचे पोर्तुगीज हे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब बादशहा या दोघांना खूश ठेवण्याचे संधिसाधूपणाचे राजकारण कसे खेळत होते त्याचा प्रत्यय व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहाला पाठविलेल्या वरील पत्रावरून येतो.